AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आजोबा टायगर पतौडींच्या पावलांवर तैमुरचं पाऊल; लंडनमध्ये घेतोय क्रिकेट ट्रेनिंग

अभिनेता सैफ अली खान आणि तैमुर यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये सैफ तैमुरला क्रिकेटविषयी आणि त्याच्या कौटुंबिक इतिहासाविषयी समजावून सांगताना दिसतोय.

आजोबा टायगर पतौडींच्या पावलांवर तैमुरचं पाऊल; लंडनमध्ये घेतोय क्रिकेट ट्रेनिंग
Saif Ali Khan and TaimurImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 02, 2024 | 2:43 PM
Share

अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर यांचा मोठा मुलगा तैमुरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तैमुर क्रिक्रेट खेळताना दिसतोय. यावेळी त्याच्यासोबत त्याचे वडील सैफसुद्धा उपस्थित आहे. एका व्हिडीओमध्ये तैमुरला त्याचे प्रशिक्षक क्रिकेट खेळण्याविषयी प्रशिक्षण देताना पहायला मिळत आहे. तर दुसऱ्यामध्ये सैफ त्याच्या पतौडी कुटुंबाच्या क्रिकेटचा इतिहास मुलाला सांगताना दिसतोय. सैफचे वडील मन्सूर अली खान पतौडी हे सुद्धा भारतीय क्रिकेटर आणि भारतीय क्रिकेट टीमचे माजी कर्णधार होते.

इंटरनॅशनल क्रिकेट मास्टर्स युकेकडून शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये सैफ तैमुरला परगण्यांच्या संकल्पनांविषयी समजावून सांगताना दिसतोय. तो म्हणतो, “परगण्या या क्लबसारख्या असतात. ससेक्स, वूस्टरशर यांसारखे ते क्लब्स असतात. तुझे पणजोबा वूस्टरशरसाठी खेळायचे तर तुझे आजोबा ससेक्ससाठी खेळायचे.” सैफ आणि तैमुर हे लंडनमध्ये आहेत. लॉर्ड्स कॉम्प्लेक्समध्ये आठ वर्षीय तैमुरने नेट क्रिकेट खेळण्याचाही आनंद घेतला. यावेळी तैमुरने बॉलिंग केली तर सैफने बॅटिंग केली. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. तैमुरसुद्धा त्याच्या आजोबा आणि पणजोबांच्या पाऊलांवर पाऊल टाकत क्रिकेट क्षेत्रात करिअर करणार, असं नेटकऱ्यांनी म्हटलंय.

क्रिकेट आणि बॉलिवूड क्षेत्रात सैफ अली खानच्या कुटुंबीयांचा मोठा इतिहास आहे. सैफने आई शर्मिला टागोर यांच्या पावलांवर पाऊल टाकत अभिनयक्षेत्रात करिअर करायचं ठरवलं. तर सैफचे वडील मन्सूर अली खान पतौडी हे टायगर पतौडी म्हणूनही ओळखले जायचे. ते भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार होते. बीसीसीआयकडून त्यांचा सीके नायुडू लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड देऊन सन्मान करण्यात आला होता. सैफचे आजोबा इफ्तिखर अली खान पतौडी हे सुद्धा 1946 मध्ये भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार होते.

सध्याच्या घडीला देशभरात क्रिकेटर विराट कोहली आणि त्याची पत्नी, अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची जितकी क्रेझ आहे, तितकीच क्रेझ एकेकाळी अभिनेत्री शर्मिला टागोर आणि दिवंगत क्रिकेटर टायगर पतौडी यांच्याविषयी होती. शर्मिला यांनी दिग्गज क्रिकेटपटू मन्सूर अली खान पतौडी यांच्याशी लग्न केलं होतं. मॅचनंतरच्या पार्टीदरम्यान या दोघांची एकमेकांशी भेट झाली होती. 27 डिसेंबर 1968 रोजी या दोघांनी लग्न केलं होतं. शर्मिला आणि टायगर यांना सैफ अली खान, सबा अली खान, सोहा अली खान ही तीन मुलं आहेत.

बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने...
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने....
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.