Saiyaara Sequel: ‘सैयारा’चा सिक्वेल येणार? सिनेमाशी संबंधीत मोठ्या व्यक्तीने दिली माहिती
अहान पांडे आणि अनीत पड्डा यांच्या ‘सैयारा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपला दबदबा कायम ठेवला आहे. या चित्रपटाची वेगळीच क्रेझ पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत चित्रपटाच्या सिक्वेलबाबतही चर्चा सुरू आहे की, सिक्वेल येणार की नाही? आता चित्रपटातील खलनायक, म्हणजेच अभिनेता शान आर. ग्रोव्हर याने याबाबत खुलासा केला आहे.

‘सैयारा’च्या प्रचंड यशाने प्रेक्षकांसह निर्मातेदेखील थक्क झाले असतील. या चित्रपटाने यंदाच्या मोठ्या हिट चित्रपटांचे विक्रम मोडत पुढे सरकत आहे. चित्रपटाच्या सिक्वेलबाबतही बातम्या समोर येत आहेत. आता या चित्रपटात खलनायक महेशची भूमिका साकारणाऱ्या शान आर. ग्रोव्हरने सिक्वेलबाबत मोठा खुलासा केला आहे.
‘सैयारा’च्या जबरदस्त यशानंतर चाहते आता सिक्वेलची अपेक्षा करू लागले आहेत. चित्रपटात कृष (अहान पांडे) आणि वाणी (अनीत पड्डा) यांच्या प्रेमकथेला एक सुखद अंत मिळाला, पण खलनायक महेश अय्यरच्या भूमिकेबाबत चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न कायम आहेत. आता ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेता शान आर. ग्रोव्हरने चित्रपटातील आपल्या अनुभवाबद्दल सांगताना अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत.
वाचा: ‘सैयारा’ने रचला इतिहास! शाहरुख-सलमानलाही टाकले मागे, कमावले इतके कोटी
सीक्वेल येणार का?
‘सैयारा’मध्ये शान आर. ग्रोव्हरने अनीत पड्डाच्या बॉयफ्रेंडची भूमिका साकारली आहे. अलीकडेच झूमला दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितले की, “माझ्या भूमिकेच्या बाबतीत, पुढे खूप काही करता येईल. महेशचे अचानक गायब होणे थोडे विचित्र वाटले. जर भूमिकांच्या प्रवासाला वेगळे वळण दिले गेले, जसे की वाणीने महेशला शेवटचे भेटण्याची इच्छा व्यक्त केली, तर यातून कृषसाठीही एक नवीन कॅरेक्टर आर्क तयार होऊ शकते. आतापर्यंत सिक्वेलबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. सर्व काही YRF आणि मोहित सूरी यांच्यावर अवलंबून आहे की ते यावर पुढे काय करू इच्छितात.”
महेशसारखी माणसे खऱ्या आयुष्यातही असतात…
आपले म्हणणे पुढे सांगताना त्याने हा खुलासाही केला की, त्याने आणि अनीत पड्डाने आपल्या भूमिकांमधील भावनिक जोड समजून घेण्यासाठी वर्कशॉप्सही केल्या होत्या. “चित्रपटात दाखवले आहे की आम्ही पाच वर्षे रिलेशनशिपमध्ये होतो. स्क्रीनवर अशी केमिस्ट्री दाखवणे आमच्यासाठी सोपे नव्हते,” असे त्याने सांगितले. आपल्या ग्रे शेड्स असलेल्या भूमिकेबाबत त्याने म्हटले, “अशा भूमिका करणे सोपे नसते. मी खऱ्या आयुष्यात महेशसारखा अजिबात नाही. माझ्या एका मैत्रिणीने अनीतची परफॉर्मन्स पाहून रडायला सुरुवात केली, कारण तिच्यासोबतही असेच काहीसे घडले होते. पण सत्य हे आहे की, महेशसारखी माणसे खऱ्या आयुष्यातही असतात.”
