AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सलमान खानने ऐश्वर्या – आराध्यासोबत फोटोसाठी दिले पोझ? व्हायरल व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव

या दोघांमधील वाद जगजाहीर आहे. मात्र गेल्या काही वर्षांत बऱ्याच कार्यक्रमांमध्ये या दोघांना वेगवेगळं अनेकदा पाहिलं गेलंय. आता इतक्या वर्षांनंतर ऐश्वर्या आणि सलमान एकाच फ्रेममध्ये दिसले आहेत, त्यामुळे चाहत्यांनाही त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये.

सलमान खानने ऐश्वर्या - आराध्यासोबत फोटोसाठी दिले पोझ? व्हायरल व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव
Salman, Aishwarya and AradhyaImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 03, 2023 | 1:12 PM
Share

मुंबई : गेल्या तीन दिवसांत मुंबईतील नीता मुकेश अंबानी यांच्या कल्चरल सेंटरच्या उद्घाटनाला सेलिब्रिटींची मांदियाळी पहायला मिळाली. या कार्यक्रमाला केवळ देशातीलच नव्हे तर परदेशातील नामवंत कलाकार उपस्थित होते. रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, आलिया भट्ट, शाहरुख खान, सलमान खानसह बॉलिवूडमधील बरेच सेलिब्रिटी अत्यंत ग्लॅमरस अंदाजात याठिकाणी पोहोचले होते. याच कार्यक्रमातील एका व्हिडीओने सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. तर काही नेटकरी तो पाहून थक्क झाले आहेत. सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ सलमान खान, ऐश्वर्या राय आणि तिची मुलगी आराध्या या तिघांचा आहे.

सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचं प्रेमप्रकरण आणि वाद जगजाहीर आहे. ब्रेकअपनंतर या दोघांनी एकमेकांसमोर येणं जाणीवपूर्वक टाळलं. मात्र बॉलिवूडमधील ही अशी जोडी आहे, ज्यांना एकत्र पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. अशातच सोशल मीडियावर सलमानचा ऐश्वर्या आणि आराध्यासोबतचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये तिघे एकत्र पापाराझींना फोटोसाठी पोझ देताना दिसत आहेत.

सलमान आणि ऐश्वर्याच्या या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडमध्ये ‘मैंने प्यार किया’चं गाणं ऐकायला मिळत आहे. याच व्हिडीओवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. मात्र हा व्हिडीओ खराखुरा नसून एडिट केलेला आहे, हे नेटकऱ्यांना काही वेळातच लक्षात आलं. मात्र त्यावरील कमेंट्स पोट धरून हसण्यासारखे आहेत. सलमान आणि ऐश्वर्याने या कार्यक्रमात वेगवेगळे पोझ दिले होते. ते दोन्ही व्हिडीओ एकत्र करून हा व्हिडीओ एडिट करण्यात आला आहे.

‘छोटा परिवार, सुखी परिवार’, असं एका युजरने मस्करीत लिहिलं आहे. तर ‘काही हुशार लोकं म्हणतील की हा एडिट केलेला व्हिडीओ आहे’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘भाईची पत्नी आणि आराध्याचं कपाळ या जन्मात तरी दिसणार नाही’, अशीही खिल्ली एका युजरने उडवली आहे.

एकाच फ्रेममध्ये दिसले सलमान आणि ऐश्वर्या

याच कार्यक्रमातील सलमान आणि ऐश्वर्याचा एक फोटो तुफान व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये सलमान आणि शाहरुख हे दोघं ‘स्पायडर मॅन’ फेम अभिनेता टॉम होलँड, झेंडाया आणि नीता अंबानी यांच्यासोबत दिसत आहेत. तर या फोटोच्या बॅकग्राऊंडमध्ये ऐश्वर्या राय तिची मुलगी आराध्यासोबत दिसून येत आहे. त्यामुळे योगायोगाने का होईना, सलमान आणि ऐश्वर्याला एकाच फ्रेममध्ये पाहून चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने...
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने....
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.