नव्या वर्षी सलमान खान आणि ऐश्वर्या राय येणार आमने-सामने; दोघांमध्ये असणार ‘कांटे की टक्कर’

अखेर अनेक वर्षांनंतर सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्यात होणार 'कांटे की टक्कर'

नव्या वर्षी सलमान खान आणि ऐश्वर्या राय येणार आमने-सामने; दोघांमध्ये असणार कांटे की टक्कर
नव्या वर्षी सलमान खान आणि ऐश्वर्या राय येणार आमने-सामने; दोघांमध्ये असणार 'कांटे की टक्कर'
| Updated on: Jan 01, 2023 | 4:24 PM

Salman Khan – Aishwarya Rai Bachchan : अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांच्यामधील वाद प्रत्येकाला माहिती आहे. अशात जर, सलमान अणि ऐश्वर्या आमने-सामने आले तर… चित्र काय असेल… या गोष्टीचा आपण फक्त अंदाज व्यक्त करु शकतो. सांगायचं झालं तर नव्या वर्षी म्हणजे २०२३ मध्ये अनेक बिग बजेट सिनेमे रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहेत. यामध्ये सलमान आणि ऐश्वर्या दोघांचे सिनेमे आहेत. म्हणून यंदाच्या वर्षी सलमान आणि ऐश्वर्या बॉक्स ऑफिसवर एकमेकांसमोर येवू शकतात.

सलमान आणि ऐश्वर्या यांच्या सिनेमा प्रदर्शनामध्ये एक आठवड्याचं अंतर आहे. महत्त्वाचं म्हणजे बॉलिवूडमध्ये कोणता सिनेमा बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी करेल, ही गोष्ट फक्त आणि फक्त चाहत्यांवर आधारलेली आहे. म्हणून यंदाच्या वर्षी दोघांमध्ये ‘कांटे की टक्कर’ प्रेक्षकांना अनुभवता येईल.

 

 

सलमान खान कायम सिनेमा ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित करतो. त्यामुळे सलमानचा आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमा देखील २०२३ मध्ये ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे ऐश्वर्या राय स्टारर ‘पीएस २’ सिनेमाच्या प्रदर्शिनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. ‘पीएस २’ सिनेमा २८ एप्रिल २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

 

 

दोन सिनेमाच्या प्रदर्शनामध्ये अंतर आहे. पण सलमानचा सिनेमा आधी प्रदर्शित होणार असल्यामुळे याचा फायदा बॉक्स ऑफिसवर दिसू शकतो. पण ऐश्वर्या रायच्या पीएस सिनेमाच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं होतं. म्हणून यंदाच्या वर्षी सलमान आणि ऐश्वर्या बॉक्स ऑफिसवर एकत्र येवू शकतात. असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.