Salman Khan : ऐश्वर्या रायला मारहाण, ‘त्या’ प्रश्नावर सलमानचा चढलेला पारा, हाताने तोडलेला टेबल, जुनी मुलाखत व्हायरल

Salman Khan - Aishwarya Rai : ऐश्वर्या रायसोबतच्या एका वादाबाबत विचारलेल्या प्रश्नावर सलमान खानने स्पष्ट प्रतिक्रिया दिलेली. अभिनेत्याने रागाच्या भरात हाताने टेबलावर जोरदार प्रहार केला होता; या घटनेशी संबंधित एक जुनी मुलाखत सध्या व्हायरल होत आहे.

Salman Khan : ऐश्वर्या रायला मारहाण, त्या प्रश्नावर सलमानचा चढलेला पारा, हाताने तोडलेला टेबल, जुनी मुलाखत व्हायरल
Salman Khan - Aishwarya Rai
| Updated on: Aug 11, 2026 | 3:03 PM

Salman Khan – Aishwarya Rai : अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता सलमान खान यांच्या नात्याबद्दल आज सर्वांना माहिती आहे. दोघे अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. दोघांच्या नात्याबद्दल असं देखील समोर आलं की, सलमान याने ऐश्वर्याचा मानसिक आणि शारीरिक छळ देखील केलेला. आता अभिनेत्याची एक जुनी मुलाखत पुन्हा चर्चेत आली आहे. ज्यामध्ये सलमान याला ऐश्वर्यासोबत अफेअर आणि हिसंक वागणुकीबद्दल विचारण्यात आलेलं. तेव्हा अभिनेत्याने जोरात टेबलावर हात आपटला आणि सर्व अफवा फेटाळून लावल्या.

मुलाखतीत प्रभू चावला यांनी सलमान याला विचालेलं, ‘तुझ्या आयुष्यात महिलांसोबत वाद कायम होत असतात? जसं की ऐश्वर्यासोबत तुझे मतभेद झाले..’, यावर सलमान खान याने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं. ‘सर… ती माझी मैत्रीण होती आणि आता आमती मैत्री संपलेली..’, एवढंच नाही तर, सलमान याने हे देखील कबूल केलं होतं की, ऐश्वर्यासोबत त्याचं नातं मैत्री पलिकडे होतं…

सलमान खान म्हणालेला, ‘ती माझी चांगली मैत्रीण होती आणि आता ती माझ्या आयुष्यात नाही, तर तिच्याबद्दल का बोलायचं? ती तिच्या आयुष्यात आता पुढे गेली आहे. ज्या गोष्टी होत्या त्या जुन्या झाल्या आहे. त्यामुळे फिरून त्याच ठिकाणी का यायचं आहे. आयुष्य पुढे जात राहतं…. ‘ सलमान याने असं देखील स्पष्ट केलं की, त्यांच्यात आता वैर नाही. ‘झगडे होतात आणि त्यामुळे ब्रेकअप होतं.. तेव्हा दोघांने रस्ते वेगळे होऊन जातात. ‘

त्या गंभीर आरोपांवर भाष्य करताना प्रभू चावला म्हणाले, “तू वादावाद करतो आणि प्रकरण मारामारीपर्यंत पोहोचतं; पण तू असं वागणारा व्यक्ती वाटत नाही.” हे ऐकताच सलमानने अचानक पूर्ण ताकदीनिशी आपला हात टेबलावर आपटला आणि म्हणाला, “सर, मी जर खरोखरच तसं केलं असतं, तर कोणी ते सहन करू शकले असतं का?”

ऐश्वर्याने सलमानवर केलेले गंभीर आरोप

एका जुन्या मुलाखतीत ऐश्वर्या हिला देखील सलमान खान याच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल विचारण्यात आलं होतं. तेव्हा अभिनेत्री सलमानवर अनेक गंभीर आरोप केलेल, ऐश्वर्या म्हणालेली, ‘ब्रेकअपनंतर तो मला सतत फोन करायचा. अनेकदा सलमान खान याने मारहाण देखील केलेली. पण नशिबाने माझ्या चेहऱ्यावर कोणत्या जखमा झाल्या नाहीत. दुसऱ्या दिवशी मी अशा प्रकारे कामासाठी जायची, जसं काही झालंच नाही…’ असं देखील ऐश्वर्या म्हणालेली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us