सलमान खानने ऐश्वर्याच्या खांद्याचं हाड मोडलं आणि, कतरिना सोबत…, कोणी केला धक्कादायक खुलासा?

Salman Khan Love Life: सेलिब्रिटी अभिनेत्रींसोबत सलमान कशी होती वागणूक, कोणी केला मोठा खुलासा, 'सलमान खानने ऐश्वर्याच्या खांद्याचं हाड मोडलं आणि, कतरिना सोबत...', अभिनेता खासगी आयुष्यामुळे कायम असतो चर्चेत...

सलमान खानने ऐश्वर्याच्या खांद्याचं हाड मोडलं आणि, कतरिना सोबत..., कोणी केला धक्कादायक खुलासा?
| Updated on: Aug 18, 2025 | 12:57 PM

अभिनेता सलमान खान वयाच्या 59 व्या वर्षी देखील एकटाच आयुष्य जगत आहे. अभिनेत्याच्या आयुष्यात अनेक सेलिब्रिटी अभिनेत्रींची एन्ट्री झाली. पण कोणत्याच अभिनेत्रीसोबत भाईजानचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. अनेक अभिनेत्रींनी सलमान खान याच्यावर गंभीर आरोप देखील केलं. अभिनेत्री संगीता बिजलानी, सोमी अली, ऐश्वर्या राय, कतरिना कैफ यांच्यासोबत सलमान खान याच्या नावाची चर्चा रंगली. पण ऐश्वर्या हिच्यासोबत असलेल्या नात्याची चर्चा आजही सोशल मीडियावर रंगलेली असते.

सलमान खान याने असंख्या सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावली आहे. पण त्याच्या अफेअरच्या चर्चा आजही चाहत्यांमध्ये चर्तेत असतात. सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या खासगी आयुष्याच्या चर्चा आजही चाहत्यांमध्ये सुरु असतात. शिवाय सोशल मीडियावर देखील त्यांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

एका मुलाखतीत सलमान खान याची एक्स गर्लफ्रेंड सोमी अली हिने सलमान खान याच्यावर गंभीर आरोप केले होते. सोमी सलमानच्या वागणुकीवर म्हणाली, ‘सलमान खान याने मला जी वागणूक दिली, ती इतर कोणाला देखील दिली नव्हती. त्याने जेवढ्या यातना मला दिल्या, मला नाही वाटत तेवढ्या यातना त्याने संगीता किंवा कतरीना हिला दिल्या असतील…’

‘त्याने ऐश्वर्या हिला देखील वाईट वागणूक दिलेली. मला असं वाटतं की त्याने ऐश्वर्या हिच्या खांद्याचा हाड मोडलेला. कतरीना हिच्यासोबत त्याने काय केलं मला माहिती नाही… सलमान खान याच्यापेक्षा लॉरेन्स बिश्नोई चांगला आहे… असं मी म्हणेल. कारण सलमान याने मला प्रचंड त्रास दिलेला.’

पुढे अभिनेत्री म्हणाली ‘माझी पाठ प्रचंड दुखायची आणि मी दीर्घकाळ अंथरुणाला खिळून होते… माझी वाईट अवस्था पाहून तब्बूला प्रचंड वाईट वाटायाचं. पण माझ्या वाईट काळत सलमान मला कधीच भेटायला आला नाही.’ असं देखील सोमी म्हणाली होती.

सलमान खान आणि कतरिना यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर,कतरीना हिने कधीच सलमान खान याच्यासोबत असलेल्या नात्याचा स्वीकार केला नाही. पण आजही दोघे चांगले मित्र आहेत. सलमान खान याच्या सोबत अनेक सिनेमांमध्ये अभिनेत्रीने स्क्रिन देखील शेअर केली आहे.

कतरिना हिने अभिनेता विकी कौशल याच्यासोबत लग्न केलं. दोघांच्या लग्नाच्या चर्चा सुरु झाल्यानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. आता विकी आणि कतरीना कायम एकमेकांसोबत सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत प्रेम व्यक्त करताना दिसतात.