AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घटस्फोटानंतर एकट्या महिलेचं आयुष्य कठीण आणि…, सलमान खानच्या पूर्व वहिनीचं मोठं वक्तव्य

Seema Sajdeh Love Life: घटस्फोटानंतर एकट्या महिलेचं आयुष्य आणि आयुष्यात नव्या प्रेमाची एन्ट्री..., सलमान खानच्या पूर्व वहिनीचं खासगी आयुष्याबद्दल मोठं वक्तव्य... गेल्या काही दिवसांपासून सीमा खासगी आयुष्यामुळे चर्चेत...

घटस्फोटानंतर एकट्या महिलेचं आयुष्य कठीण आणि..., सलमान खानच्या पूर्व वहिनीचं मोठं वक्तव्य
| Updated on: Oct 31, 2024 | 12:14 PM
Share

Seema Sajdeh Love Life: अभिनेता सलमान खान याचा लहान भाऊ सोहैल खान याचं खासगी आयुष्य गेल्या काही दिवसांपासून तुफान चर्चेत आहे. सोहैल खान याला घटस्फोट दिल्यानंतर सीमा सजदेह हिने नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. घटस्फोटानंतर सीमा हिने पून्हा एक्स-बॉयफ्रेंडला डेट करण्यास सुरुवात केली आहे. सीमा हिच्या बॉयफ्रेंडचं नाव विक्रम असं आहे. सध्या सीमा ‘लाइव्स वर्सेज बॉलीवुड वाइव्स’ शोच्या तिसऱ्या सीझनमध्ये दिसत आहे. नुकताच सीमाने तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे.

खासगी आयुष्याबद्दल सीमा म्हणाली, ‘आता मी तरुण नाही. माझा एक इतिहास आहे. मला दोन मुलं आहे आणि माझ्या पार्टनरला देखील दोन मुलं आहे. आमच्या नात्यामध्ये अन्य लोकांचा देखाल समावेश आहे… तुम्ही जेव्हा तरुण असता तेव्हा गोष्टी वेगळ्या असतात.’

‘पण आयुष्यात पुढे गेल्यानंतर सर्वांच्या भावनांचा आणि संवेदनांचा विचार करावा लागतो. मी सर्व गोष्टी अशक्य आहेत असं म्हणणार नाही. पण काही गोष्टींसाठी सावधान राहावं लागलं.’ असं देखील सीमा म्हणाली. शिवाय घटस्फोटानंतर एकट्या महिलेच्या आयुष्याबद्दल देखील सीमाने मोठं वक्तव्य केलं.

‘एकट्या महिलेचं आयुष्य फार कठीण आहे.  ही ‘परिस्थिती’  घातक मानसिक आरोग्याची कृती आहे. मी थोड्या जुन्या विचारधारनेची महिला आहे. कारण मी कधीच प्रासंगिक संबंधांवर विश्वास ठेवत नाही. जर कोणासोबत संबंध जोडले असतील तर, मी ते नातं टिकवण्यासाठी काहीही करेल…’ असं देखील सीमा म्हणाली.

विक्रमसोबत असलेल्या नात्यावर सीमा म्हणाली, ‘तो मला पूर्णपणे ओळखतो… विक्रम आणि माझ्या नात्याबद्दल सर्वांना माहिती आहे. आम्ही अशा क्षणी पुन्हा एकत्र आलो यावर विश्वास बसत नाही… आयुष्य एक चक्र आहे..’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. सांगायचं झालं तर, विक्रम आणि सीमा यांचा साखरपुडा झाला होता. पण आयुष्यात सोहैल याची एन्ट्री झाल्यानंतर सीमाने विक्रमला सोडलं आणि सोहैलसोबत लग्न केलं. पण दोघांचं नातं देखील फार काळ टिकलं नाही.

Follow Us
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे...
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्राचे लक्ष!
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत