तुरुंगातून प्रसिद्ध अभिनेत्रीला ‘प्रेमपत्र’, कैदी म्हणाला, ‘बेबी आपली लव्हस्टोरी रामायणासारखी…’
'बेबी आपली लव्हस्टोरी रामायणासारखी...', तुरुंगातून बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीला 'प्रेमपत्र', एकेकाळी खासगी फोटो समोर आल्यामुळे माजली होती खळबळ... कैदी कायम तुरुंगातून लिहित असतो अभिनेत्रीला लव्हलेटर...
अनेक महत्त्वाच्या क्षणी तुरुंगातील एका कौद्याकडून बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीला प्रेमपत्र येत आहे. ज्या अभिनेत्रीला तुरुंगातून प्रेम पत्र आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आहे. 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात गेल्या अनेक महिन्यांपासून सुकेश तुरुंगात आहे. दरम्यान, सुकेश आणि जॅकलिन यांचे खासगी फोटो देखील व्हायरल झाले होते. आता दिवाळीच्या मुहूर्तावर सुकेश याने तुरुंगातून जॅकलिन हिला पत्र लिहिलं आहे. सुकेश याने जॅकलिन हिच्यासोबत असलेल्या ‘लव्हस्टोरी’ला रामायणाप्रमाणे असल्याचं सांगितलं आहे. एवढंच नाही तर, ‘तुरुंगातून बाहेर येताच तुला भेटेल… ‘ असं वचन देखील सुकेश याने जॅकलिन हिला पत्रातून दिलं आहे.
रिपोर्टनुसार सुकेशने पत्रात लिहिलं आहे, ‘बेबी आपली लव्हस्टोरी महान रामायणापेक्षा कमी नाही. कारण माझ्याप्रमाणे भगवान राम देखील माता सीता यांच्यासोबत वनवासातून परतले होते. मी देखील माझी सीता, जॅकलिन हिच्यासाठी या छोट्या वनवासातून परतणार आहे… म्हणजे माझी सीता मला परत मिळेल आणि असं होण्यापासून कोणताच रावण मला थांबवू शकत नाही..’
View this post on Instagram
पुढे सुकेश पत्रात लिहितो, ‘भगवान यांचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत आणि तुझ्यासाठी (जॅकलिन) प्रेम… आता आपली वेळ आहे बेबी… कारण आता मी लवकरच घरी परत येणार आहे. मी फक्त एकत्र राहण्याची आणि पुढच्या वर्षी एकत्र हा सुंदर सण साजरा करण्याची प्रतीक्षा करू शकत नाही. लंकेत तुझ्याशिवाय ही माझी शेवटची दिवाळी असेल.’
‘जगाला वाटत आहे मी वेडा आहे, पण जगाला नाही माहिती आपल्यामध्ये काय नातं आहे…’ असं देखील सुकेश पत्रात म्हणाल आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जॅकलिन आणि सुकेश यांच्या नात्याची चर्चा होत आहे. पण अभिनेत्री कायम यावर बोलणं टाळते…
View this post on Instagram
जॅकलिन हिच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री लवकरच ‘हाऊसफुल 5’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात जॅकलिन हिच्यासोब अभिनेता अक्षय कुमार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमा 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहे.