AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raja Shivaji : ‘राजा शिवाजी’मधील सलमानच्या एण्ट्रीवर टाळ्यांचा कडकडाट; व्हिडीओ तुफान व्हायरल

'राजा शिवाजी'मधील सलमान खानच्या भूमिकेविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याच्या एण्ट्रीचा सीन सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये सलमानने जिवा महालाची भूमिका साकारली होती.

Raja Shivaji : 'राजा शिवाजी'मधील सलमानच्या एण्ट्रीवर टाळ्यांचा कडकडाट; व्हिडीओ तुफान व्हायरल
Salman Khan in Raja ShivajiImage Credit source: Instagram
| Updated on: May 01, 2026 | 8:36 AM
Share

अभिनेता रितेश देशमुखचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट आज 1 मे 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली आयुष्यावर आधारित या चित्रपटात बॉलिवूड आणि मराठी कलाकारांची मोठी फौज पहायला मिळणार आहे. रितेशनेच या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून त्यानेच छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर जिनिलिया देशमुख, अभिषेक बच्चन, बोमन इराणी, फरदीन खान, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, विद्या बालन यांसारख्या कलाकारांच्याही यात भूमिका आहेत. विशेष म्हणजे अभिनेता सलमान खानने यात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे. आता या चित्रपटातील सलमानच्या कॅमिओचा सीन सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सलमानच्या एण्ट्रीवर थिएटरमध्ये एकच टाळ्यांचा कडकडाट होतो. ‘राजा शिवाजी’मध्ये सलमानने जिवा महाला यांची भूमिका साकारतोय.

गेल्या काही महिन्यांपासून सलमानच्या भूमिकेविषयी गुप्तता पाळण्यात आली होती. ‘बिग बॉस मराठी 6’च्या ग्रँड फिनालेमध्ये रितेशने त्याच्या भूमिकेविषयी घोषणा केली होती. आता थिएटरमध्ये सलमानची एण्ट्री पाहून प्रेक्षकांना फारच आनंद झाला आहे. त्याच्या एण्ट्रीच्या सीनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. या सीनमधील सलमानचा लूक विशेष लक्ष वेधून घेतो. भगव्या रंगाचा फेटा आणि कुर्ता, हातात तलवार असा हा त्याचा दमदार लूक आहे. शत्रूच्या मानेवर तलवार रोखून तो म्हणतो, ‘शिवाजी नाही, शिवाजी राजं म्हणायचं..’ आणि थिएटरमध्ये एकच जल्लोष होतो.

‘राजा शिवाजी’च्या प्रमोशनिमित्त दिलेल्या मुलाखतीत रितेशने सलमानच्या निवडीचा किस्सा सांगितला होता. या चित्रपटात सलमानसाठी कोणतीच भूमिका निश्चित नव्हती, मात्र त्याने आग्रह धरून यात भूमिका मागून घेतली, असं रितेशने सांगितलं. “मी या चित्रपटासाठी सलमानशी संपर्क साधला नव्हता. आम्ही नवीन वर्षाच्या दिवशी भेटलो होतो. मला त्याने विचारलं की, मी या चित्रपटाचं शूटिंग कधी सुरू करणार आहे? तेव्हा मी त्याला म्हणालो की या महिन्यातच सुरू होत आहे. सलमान म्हणाला, मग मी कोणती भूमिका त्यात साकारतोय? जेव्हा मी सलमानला सांगितलं की माझ्याकडे त्याच्यासाठी कोणतीही भूमिका नाही, तेव्हा त्याने या प्रोजेक्टचा भाग होण्याचा आग्रह धरला. तो म्हणाला, नाही नाही नाही.. तू माझ्याशिवाय हा चित्रपट बनवू शकत नाही. मला त्यात असायलाच हवं. मग त्याच्यासाठी भूमिकेचा विचार केला आणि अशा प्रकारे तो या चित्रपटाचा भाग बनला”, असं रितेश म्हणाला.

Follow Us
हे जैनांचं नाही, आगरी-कोळी, मराठी बांधवांचं शहर; मनसेचा कोणाला टोला?
MNS On Narendra Mehata : मीरा-भाईंदरच्या ओळखीवरून राजकीय रणकंदन! हे जैनांचं नाही, आगरी-कोळी आणि मराठी बांधवांचं शहर; मनसेचा नेमका कोणाला टोला?
मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने...
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने खळबळ; संजय राऊतांनी थेट...
ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग
LPG Price : ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग; ऑक्टोबरमधील हे मोठे बदल जाणून घ्या
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
Mumbai Toll Tax : मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी टोल महागले....
ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि...
Raj Thackeray : Uddhav Thackeray : ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि संविधान.....
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड