AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘भाईजान’ पुन्हा एकदा कोरोना वॉरिअर्सच्या मदतीला धावला, ‘फ्रंटलाइन वर्कर्स’साठी पाठवले फूड किट्स!

देशभरात कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. गेल्या वर्षी सलमान खान (Salman Khan) याने कोरोनाशी दोन हात करत असताना गरजूंना अन्नधान्याचे किट आणि पैसे दान केले होते. आता पुन्हा एकदा सलमान मदतीसाठी पुढे आला आहे.

‘भाईजान’ पुन्हा एकदा कोरोना वॉरिअर्सच्या मदतीला धावला, ‘फ्रंटलाइन वर्कर्स’साठी पाठवले फूड किट्स!
सलमान खान
| Updated on: Apr 22, 2021 | 10:55 AM
Share

मुंबई : देशभरात कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. गेल्या वर्षी सलमान खान (Salman Khan) याने कोरोनाशी दोन हात करत असताना गरजूंना अन्नधान्याचे किट आणि पैसे दान केले होते. आता पुन्हा एकदा सलमान मदतीसाठी पुढे आला आहे. रिपोर्टनुसार सलमान खान फ्रंटलाईन कामगारांसाठी फूड किट्स पाठवत आहे. तो सर्वांना या फूड किटचे वाटप करत आहे. युवा सेनेचे नेते राहुल कनल यांनी याबाबत माहिती दिली आहे. राहुल म्हणाले की, सलमान पोलीस अधिकारी, बीएमसी कर्मचारी आणि आरोग्य कर्मचार्‍यांच्या मदतीसाठी पुन्हा एकदा पुढे आला आहे (Salman Khan distributing Food kits to frontline workers during corona pandemic).

एका प्रसिद्ध वृत्तपत्राशीशी बोलताना राहुल म्हणाले की, सलमान जे फूड किट देत आहे त्यात मिनरल वॉटर, चहा, बिस्किटे आणि स्नॅक्सचा समावेश आहे. उपमा, पोहे, वडा पाव आणि पावभाजी या पदार्थांचा देखील यात समावेश आहे. पुढे ते म्हणाले, ‘आम्ही मिळून एक हेल्पलाईन नंबर देखील सुरू केला आहे, ज्यावर फ्रंटलाईन कामगार (Frontline Workers) कॉल करू शकतात आणि मदतीसाठी विचारणा करू शकतात. त्यानंतर आम्ही त्यांच्या भागात जाऊन त्यांना मदत करू. त्यांच्या कामाबद्दल धन्यवाद म्हणण्याची ही सलमानची खास शैली आहे. हे सर्व 15 मेपर्यंत सुरू राहणार आहे.’

आतापर्यंत सलमानने वरळी आणि जुहूमधील फ्रंटलाइन वर्कर्सना मदत केली असून येत्या काही आठवड्यांत मुंबईतील इतर शहरांमध्येही मदत दिली जाईल, असेही राहुल यांनी सांगितले.

‘राधे’चा ट्रेलर होणार लाँच

‘भाईजान’ अर्थात सलमान खानच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल बोलायचे, तर आज म्हणजे 22 एप्रिलला त्याच्या ‘राधे’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. त्यांचे चाहते या चित्रपटाची कितीतरी दिवस प्रतीक्षा करत आहेत. या चित्रपटामध्ये सलमानबरोबर दिशा पाटनी, रणदीप हूडा आणि जॅकी श्रॉफ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत (Salman Khan distributing Food kits to frontline workers during corona pandemic).

विशेष म्हणजे हा चित्रपट एकाच दिवशी थिएटर आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. 13 मे रोजी हा चित्रपट रिलीज करून सलमान खान चाहत्यांना ईदची खास भेट देणार आहे.

जॉन अब्राहमशी टक्कर!

याक्षणी, सलमान खानचा ‘राधे’ बॉक्स ऑफिसवर जॉन अब्राहमच्या ‘सत्यमेव जयते 2’शी स्पर्धा करण्यास सज्ज झाला आहे. ‘राधे’ हा चित्रपट 13 मे रोजी रिलीज होत आहे आणि ‘सत्यमेव जयते 2’ देखील त्याच दिवशी रिलीज होईल. यापूर्वी ‘सत्यमेव जयते 2’ 14 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु नंतर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली. पडद्यावर कोणता चित्रपट रसिकांचे मन जिंकतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

(Salman Khan distributing Food kits to frontline workers during corona pandemic)

हेही वाचा :

ऑनस्क्रीन बहिणी, ऑफस्क्रीन मात्र दुश्मनी, श्रीदेवीशी न बोलल्याची खंत वाटते, जया प्रदांनी सांगितला किस्सा!

आदेश भाऊजींचे पुन्हा Work From Home, देवमाणूस बेळगावात, झी मराठीच्या मालिकांचं शूट कुठे?

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.