ना ऐश्वर्या राय, ना सोमी अली; सलमान खानची पहिली गर्लफ्रेंड माहितीये का? आता शाळेत आहे शिक्षिका,पाहा फोटो
सलमान खानची पहिली गर्लफ्रेंड ही ना ऐश्वर्या, ना अनिता आणि नाही सोमी अली आहे. त्याची पिहली गर्लफ्रेंड ही अगदी सामान्य आयुष्य जगणारी मुलगी आहे. सलमान आणि ती लग्न करणार होते पण काही कारणामुळे हे नात तुटलं. आणि आता ती मुंबईतील एका शाळेत शिक्षिका आहे.

सलमान खान हा चित्रपटांपेक्षाही त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सतत चर्चेत असतो. तो आता 59 वर्षांचा आहे. सलमान त्याच्या कारकिर्दीत निःसंशयपणे एक सुपरस्टार आहे आणि त्याने भरपूर संपत्ती आणि प्रसिद्धी मिळवली आहे.मात्र तो अद्यापही सिंगलच आहे. त्याचे अनेक अभिनेत्रींशी नाव जोडले गेले आहे. परंतु त्यापैकी एकही नात लग्नापर्यंत गेलं नाही. आज सलमानच्या जवळजवळ सर्वच एक्स गर्लफ्रेंड विवाहित आहेत आणि ऐश्वर्या सोडली तर सर्वजणी त्याच्याशी संपर्कात आहेत. पण हे बऱ्याचजणांना माहित नसेल की सलमानची पहिली गर्लफ्रेंड कोण होती ते?
सलमानची पिहिली गर्लफ्रेंड कोण आहे माहितीये?
अनेकांना त्याची पहिली गर्लफ्रेंड सोमी अली किंवा अनिता वाटू शकते पण या दोघीही नसून त्याची पहिली गर्लफ्रेंड ही चित्रपटांमध्ये काम करत नव्हती. त्यांचं नात अगदी लग्नापर्यंत गेले होते. पण काही कारणास्तव ते तुटलं. आणि आता त्याची ही पहिली गर्लफ्रेंड एका शाळेत शिक्षिका म्हणून काम करत आहे.
सलमान खानची पहिली गर्लफ्रेंड अशोक कुमार यांची नात आणि कियारा अडवाणीची मावशी आहे. तिचे नाव शाहीन जाफरी आहे, जी आता शाहीन अग्रवाल म्हणून ओळखली जाते. शाहीनची आई भारती जाफरी यांनी एका मुलाखतीत सलमान आणि शाहीनच्या प्रेमकथेबद्दल सांगितले होते.
अशोक कुमार यांची नात
भारती जाफरी ही अशोक कुमार यांची मुलगी आहे आणि तिचे लग्न प्रसिद्ध अभिनेता सईद जाफरी यांचा भाऊ हमीदशी झाले होते. हमीदचे पहिले लग्न तुटले होते आणि शाहीन ही त्याच्या पहिल्या बायकोची मुलगी होती, जिला भारतीने स्वतःच्या मुलीसारखे वाढवले. हमीदशी लग्न केल्यानंतर भारतीने अनुराधा या मुलीला जन्म दिला.
दोन्ही कुटुंबालाही त्यांचं हे नात खूप आवडायचं
भारती जाफरी आता या जगात नाही. 2022 मध्ये तिचे निधन झाले. 2018 मध्ये एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की, सलमान स्टार होण्यापूर्वी तो आणि शाहीन एकमेकांना डेट करत होते. दोघेही एकमेकांच्या घरी खूप जायचे आणि दोन्ही कुटुंबालाही त्यांचं हे नात खूप आवडायचं.
- salman khan first girlfriend Shaheen Jaffrey
आम्हाला वाटलं होतं सलमान तिच्याशी लग्न करेल
भारती जाफरी म्हणाली होती, ‘शाहीन आणि सलमान एकमेकांना त्यांच्या किशोरावस्थेपासून ओळखत होते. आम्ही सलमान खानला कुटुंबाचा एक भाग मानत होतो. आम्ही अनेकदा त्याच्याकडून बेकरीतून ब्रेड मागवायचो. सलमानचे कुटुंब शाहीनलाही त्यांच्या कुटुंबाचा एक भाग मानत होते. सर्वांना वाटू लागले होते की एक दिवस सलमान आणि शाहीन लग्न करतील. पण नंतर सलमान मिस इंडिया संगीता बिजलानीच्या प्रेमात पडला. हे 1985 मध्ये घडले. त्यामुळे शाहीन आणि सलमानचे ब्रेकअप झाले. त्यानंतर सलमानने 1986 मध्ये संगीता बिजलानीला डेट करायला सुरुवात केली.
ब्रेकअपनंतर तिने एका व्यावसायिकाशी लग्न केलं
सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर शाहीन जाफरी एका एअरलाइनमध्ये काम करू लागली. तिथे तिची भेट एक व्यावसायिका विक्रम अग्रवालशी झाली. दोघांमध्ये प्रेम झालं आणि 1994 मध्ये त्यांनी लग्न केलं. लग्नानंतर शाहीनला एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
मुंबईतील या शाळेत शिक्षिका
आता शाहीन अग्रवाल मुंबईतील वरळी येथे राहते. ती दक्षिण मुंबईतील कॅथेड्रल आणि जॉन कॅनन हायस्कूलमध्ये ड्रामा और डिक्शन (नाटक आणि शब्दलेखन) शिकवते. याशिवाय ती शॉर्ट स्टोरीज देखील लिहिते.
