Salman Khan: सलमान खानचा ‘तो’ निर्णय अन् अवघ्या काही तासांतच…नेमकं काय घडलं?
Salman Khan Instragram Story: बॉलिवूड अभिनेतासलमान खानने आता एक मोठा निर्णय घेतला आहे, नेहमीप्रमाणे इन्सटाग्राम स्टोरीवर शेअर करत त्याने माहिती दिली आहे.

Salman Khan News: सलमान खान सोशल मीडियावर बराच सक्रीय असतो. तो त्याला जे जे वाटते ते बिनधास्त सोशल मीडियावर शेअर करत असतो, अनेकदा पहाटे, मध्यरात्रीही तो असं काहीतरी लिहून टाकतो की चाहत्यांनाच धडकी भरते, तो नेहमीच त्याच्या प्रतिक्रिया परखडपणे मांडत असतो. आता यादरम्यान भाईजानने एक मोठा निर्णय घेतला आहे.
सलमान खानने यूट्यूब चॅनेल सुरु केले आहे. सलमानने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीजद्वारे या नवीन चॅनलची घोषणा केली. त्याने एक छोटा व्हिडिओ देखील शेअर केला. त्यातून स्पष्ट होते की, या चॅनलवर केवळ एकाच प्रकारचा नाही, तर विविध प्रकारचा कंटेंट असेल.
चॅनल सुरू करण्याची घोषणा करताना सलमान खानने लिहिले, “चला सुरुवातीपासून सुरुवात करूया… माझे अधिकृत यूट्यूब चॅनल. A ते Z पर्यंत सर्व काही येथे उपलब्ध असेल.” विशेष म्हणजे, चॅनल सुरू झाल्याच्या अवघ्या एका तासातच सबस्क्राइबर्सची संख्या १४,००० च्या पुढे गेली आहे. सलमानच्या चॅनलवर आधीपासूनच शॉर्ट्स उपलब्ध आहेत.
सलमान खानने आपल्या यूट्यूब चॅनलच्या बायोमध्ये स्वतःला चित्रपट अभिनेता, कलाकार, चित्रकार आणि मानवतावादी म्हणून संबोधले आहे. सलमान नेमके कसे व्हिडिओ शेअर करणार आहे याबद्दलची माहिती आणखी समोर आलेली नाही, पण भाईजान बद्दलच्या सर्व गोष्टी चाहत्यांना जाणून घ्यायला प्रचंड आवडतात.
मात्र, चॅनलच्या लॉन्चमुळे चाहत्यांमध्ये येत्या काळात काय पाहायला मिळेल याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. असे मानले जाते की सलमान त्याचे शूटिंगचे अनुभव, फिल्म सेटवरील पडद्यामागील क्षण, वैयक्तिक अपडेट्स आणि प्रमोशनल व्हिडिओ शेअर करेल. यातून चाहत्यांना त्याच्या आयुष्यातील असे पैलू देखील पाहायला मिळू शकतील, जे सहसा चित्रपट किंवा टीव्ही शोमधून उघड होत नाहीत.
सलमान खान सध्या बिग बॉस होस्ट करत आहे. आता पुढील कोणत्या चित्रपटातून तो चाहत्यांच्या भेटीला येतो हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. चाहते त्याच्या आगामी चित्रपटासाठी नक्कीच उत्सुक असतील यात काही शंका नाही.
