AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salman Khan : सलमान खानला नेमका कोणता आजार? स्वत:च केलेला खुलासा

Salman Khan : अभिनेता सलमान खानचा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून चाहते त्याच्या तब्येतीविषयी काळजी व्यक्त करत आहेत. सलमानला नेमकं झालंय तरी काय, तो असा का दिसतोय, असा प्रश्न चाहते विचारत आहेत.

Salman Khan : सलमान खानला नेमका कोणता आजार? स्वत:च केलेला खुलासा
Salman KhanImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 21, 2026 | 8:07 AM
Share

बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात सलमान खान त्याच्या फिटनेस आणि रुबाबदार व्यक्तिमत्त्वासाठी ओळखला जातो. मात्र रविवारी जेव्हा सलमानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, तेव्हा सर्वांनाच त्याची अवस्था पाहून आश्चर्याचा मोठा धक्का बसला. सलमानला कोणता आजार झाला की काय, त्याची तब्येत बरी आहे का नाही, असे सवाल चाहत्यांनी उपस्थित केले. या नव्या व्हिडीओदरम्यान आता सलमानने काही वर्षांपूर्वी त्याच्या प्रकृतीबद्दल केलेल्या खुलाशाचीही चर्चा आहे. 60 वर्षीय सलमान एक नव्हे तर तीन गंभीर आजारांचा सामना करत आहे. ब्रेन एन्युरिझ्म, एवी मालफॉर्मेशन आणि ट्राइजेमिनल न्यूराल्जिया अशी या आजारांची नावं आहेत. यापैकी दोन आजार मेंदूशी संबंधित आहेत, तर तिसऱ्या आजारामुळे चेहऱ्याच्या नसांमध्ये वेदना होतात. या आजाराला ट्रायजेमिनल न्यूराल्जिया असं म्हणतात. हा आजार ‘सूसाइड डिसिस’ नावानेही ओळखला जातो.

ट्रायजेमिनल न्यूराज्लिया (TN) ही एक अशी स्थिती आहे, ज्यामुळे चेहऱ्याला तीव्र वेदना होतात. हे सहसा तेव्हा घडतं जेव्हा तुमच्या ब्रेनस्टेमजवळील (मेंदूला मणक्याशी जोडणारा भाग) रक्तवाहिनी तुमच्या ट्रायजेमिनल नसेवर दाब देतं. ही नस तुमच्या डोक्याला आणि चेहऱ्याला संवेदना पुरवते. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, ट्रायजेमिनल न्यूराज्लियामुळे चेहऱ्याच्या एका भागात वेदना होतात. या वेदना इतक्या तीव्र असतात की जणू काही एखाद्याला विजेचा धक्का बसलाय, असंच वाटू लागतं. काही सेकंदांत या वेदना कमीसुद्धा होतात.

सलमान खानची पोस्ट-

हा आजार कोणाला होऊ शकतो?

ट्रायजेमिनल न्यूराल्जिया हा एक असा आजार आहे, जो कोणालाही होऊ शकतो, मग ते लहान मूल असो किंवा 50 वर्षांपेक्षा जास्त वयाची व्यक्ती. हा आजार होण्यासाठी कोणताही निश्चित कालावधी नाही. या आजाराच्या उपचारासाठी चार पद्धती आहेत. सर्वांत आधी सर्वसामान्य पद्धत म्हणजे औषधोपचार. रुग्णांना सुरुवातीला अशी औषधं दिली जातात, जी नसांची तीव्र वेदना कमी करतात. जर औषधांचा रुग्णावर परिणाम होत नसेल, तर वेदना निर्माण करणाऱ्या नसेमध्ये थेट इंजेक्शन दिलं जाऊ शकतं. याशिवाय रेडिओफ्रिक्वेन्सी एब्लेशन आणि थेट शस्त्रक्रिया यासुद्धा उपचारपद्धती आहेत.

Follow Us
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
ST Bus | वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश
राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! तटकरेंच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार
Sunil Tatkare | राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! सुनील तटकरे यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार; नियुक्तीवरच सवाल
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या...
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या कार्यक्रमाला, ठाकरे गटाकडून थेट...
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा; बड्या नेत्यांची उपस्थिती?
छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! VIDEO पाहून तुम्हीही...
Karjat | छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! कर्जतच्या रस्त्यांची पोलखोल; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल…
एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही!
Laxaman Hake | एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही! लक्ष्मण हाके भडकले; OBC आरक्षणावरून सरकारलाही घेरलं