Salman Khan: हुबेहुब सलमानसारखा तयार झाला आणि त्याच्याच समोर उभा राहिला; कशी होती भाईजानची प्रतिक्रिया?
Salman Khan: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सलमान सारखा दिसणारा सुफयान हा भाईजानच्या पुढे उभा आहे. त्याला पाहून भाईजानची काय प्रतिक्रिया होती? पाहा...

सध्या सर्वत्र प्रसिद्ध चित्रपट निर्माता साजिद नडियाडवाला यांचा मुलगा सूफयानची जोरादार चर्चा सुरु आहे. सुफयानच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे. एका कार्यक्रमातील त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण त्यांची तुलना बॉलिवूडचा भाईजना सलमान खानशी करत आहे. सूफयानला एका कार्यक्रमामध्ये 90च्या दशकातील हुबेहुब सलमान खान प्रमाणे दिसत आहे. त्यामुळे त्याला पाहून सलमानची काय प्रतिक्रिया असेल असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पाहताक्षणी सूफयानला पाहून असे वाटते की जणू ९० च्या दशकातील सलमान खान समोर आहे. कारण त्याचे डोळे, नाक, ओठ, लूक्स आणि फिजिक्स बऱ्याच अंशी सलमान खानसारखे दिसत आहेत. सूफयानचा व्हिडीओ समोर आल्यानंतरच सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होऊ लागला. आता जेव्हा सलमान खान त्याला या लूकमध्ये भेटला तेव्हा नेमकं काय म्हणाला? पाहा…
कशी आहे सलमानची प्रतिक्रिया?
सोशल मीडिया युजर्सही त्याचा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रतिक्रिया देत आहे. विचार करा जर सलमान खानने त्याला या लूकमध्ये पाहिले तर? काय असेल त्याची प्रतिक्रिया? सलमान खानचा सुफयानशी बोलतानाचा देखील व्हिडीओ समोर आला आहे. सलमान सुफयानला पाहातो आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवतो. त्यानंतर तो त्याला घट्ट मिठी मारतो. हा सलमानचा हा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे.
View this post on Instagram
व्हिडीओमध्ये सूफयान ब्लू टी-शर्ट आणि डेनिम घातलेला दिसत आहे. त्याचबरोबर त्याने कानात बालीही घातली आहे. सूफयानचा हा लूक तसाच वाटत आहे जसा कधीकाळी सलमान खानचा असायचा. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक सोशल मीडिया युजर्स म्हणाले की हा तर सलमान खानचा यंगर व्हर्जन आहे. तर काही लोकांचे म्हणणे आहे की सूफयान आपल्या वडिलांशी साजिद नडियाडवालासारखा दिसत आहे.
या जोडप्याचा एक मोठा मुलगाही आहे, ज्याचे नाव सुभान आहे. सुभान लवकरच बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहेत. अहवालांनुसार सुभान बॉलिवूडमध्ये ‘ऐसी दीवानगी’ चित्रपटातून पदार्पण करणार आहे. हा चित्रपट शशांक खैतान दिग्दर्शित करणार आहेत. तर सूफयानबद्दल बोलायचे तर त्यांनी अजून बॉलिवूडमध्ये पदार्पणाचा विचार केलेला नाही. २०२२ मध्येही सूफयानचे नाव खूप चर्चेत होते. खरं तर, या दरम्यान महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकरसोबत त्याच्या अफेअरच्या चर्चा सुरू होत्या.
