लग्नाबद्दल सलमान खान याने केले मोठे विधान, अरबाजच्या लग्नानंतर थेट म्हणाला, माझे अजूनही..
बाॅलिवूड अभिनेता सलमान खान हा कायमच चर्चेत असतो. सलमान खान याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. सलमान खान याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. नुकताच सलमान खान याने लग्नाबद्दल मोठे भाष्य केले.

मुंबई : बिग बाॅस 17 धमाका करताना दिसत आहे. विशेष म्हणजे बिग बाॅस 17 बद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळतंय. बिग बाॅस 17 च्या मंचावर आता नवीन वर्षाचे जोरदार स्वागत केले जाणार आहे. सलमान खान हा बिग बाॅस 17 ला होस्ट करताना दिसतोय. गेल्या आठवड्यांमध्ये सलमान खान हा मुनव्वर फारूकी याचा क्लास लावताना दिसला. बिग बाॅस 17 बद्दल चाहत्यांमध्ये मोठे क्रेझ असले तरीही या सीजनला टीआरपीमध्ये म्हणावा तसा धमाका करण्यात अजूनही यश मिळाले नाही.
आता बिग बाॅस 17 च्या मंचावर नवीन वर्षाचे जोरदार स्वागत हे केले जाणार आहे. बिग बाॅस 17 चा एक प्रोमो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. या प्रोमोमध्ये सलमान खान हा चक्क आपल्या लग्नाबद्दल भाष्य करताना दिसतोय. नुकताच अरबाज खान याचे दुसरे लग्न झाले आहे. यावरच सलमान खान हा बोलताना दिसला.
नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी धर्मेंद्र, मीका सिंह आणि कृष्णा अभिषेक हे बिग बाॅस 17 च्या मंचावर पोहचले. यावेळी हे धमाल करताना दिसले. कृष्णा अभिषेक हा म्हणतो की, माझ्याकडून तुम्हाला ही शाॅल गिफ्ट…परत तो अरबाज खान याला म्हणतो की, तुला शाॅलची काय गरज आहे, तुझे लग्न तर आताच झाले आहे ना…
त्यावर सलमान खान हा म्हणतो की, माझे तर लग्नच झाले नाहीये. लगेचच अरबान खान म्हणाला की, माझे लग्न पण संपले आहे. इतकेच नाही तर यावेळी धर्मेंद्र हे अरबान खान, सलमान खान आणि कृष्णा अभिषेक यांच्यासोबत यमला पगला दिवाना या गाण्यावर जबरदस्त डान्स करतात. आता या येणाऱ्या एपिसोडबद्दल चाहत्यांमध्ये क्रेझ बघायला मिळतंय.
पहिल्यांदाच सलमान खान हा आपल्या लग्नाबद्दल असे जाहिरपणे बोलताना दिसला आहे. हे पहिल्यांदा नाहीये की, धर्मेंद्र हे बिग बाॅस 17 च्या मंचावर आलेत. यापूर्वीही अनेकदा धर्मेंद्र हे बिग बाॅस 17 च्या मंचावर धमाल करताना दिसले आहेत. मलायका अरोरा हिच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर आता दुसऱ्यांदा लग्न बंधनात अरबाज खान हा अडकला आहे.
