Vastu Shastra : लग्नपत्रिका छापताना कधीच करू नका ही चूक, …अन्यथा सुखी संसार होईल उद्ध्वस्त
Vastu Shastra: वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, सामान्यपणे वास्तुशास्त्र हे सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा अशा दोन गोष्टींवर कार्य करते, लग्नपत्रिका छापताना आपण काही चुका करतो, त्याबद्दल देखील वास्तुशास्त्रात माहिती देण्यात आली आहे.

वास्तुशास्त्रात केवळ तुमचं घर कसं असावं? याबद्दलच माहिती देण्यात आलेली नाहीये, तर अनेकदा आपल्या काही छोट्या-छोट्या चुकांमुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. घरात जर वास्तुदोष निर्माण झाला तर आपल्याला अनेक संकटाचा सामना करावा लागू शकतो, जसं की गृहकलह, आर्थिक समस्या, आरोग्यच्या समस्या या सारखी संकटं येऊ शकतात, हा वास्तुदोष कसा दूर करायचा? याबद्दल देखील अनेक सोपे उपाय वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आले आहेत. लग्न हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सोहळा असतो. हिंदू धर्मात जे 16 संस्कार असतात, त्यातील एक संस्कार म्हणजे विवाह. त्यामुळे अनेकांची अशी इच्छा असते की आपल्या मुलाचा किंवा मुलीचा विवाह मोठ्या थाटामाटात आणि धुमधडाक्यात झाला पाहिजे. त्यामुळे आजकाल लग्नावर लाखो रुपये खर्च केले जातात, काही जण तर कर्ज काढून लग्न करतात.
आपण विवाहासाठी जी लग्नपत्रिका छापतो, तीचं काम फक्त लोकांना विवाहासाठी निमंत्रण देणं एवढंच असतं, मात्र तरी देखील अनेक लोकांचा असा प्रयत्न असतो, की लग्नपत्रिका ही चांगली छापली गेली पाहिजे, ती आकर्षक असावी, त्यामुळे तिच्या छपाईवर देखील लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र लग्नपत्रिका छापताना आजकाल अनेक जण एक मोठी चूक करतात. वास्तुशास्त्रानुसार लग्नपत्रिकेवर कधीही वधू , वराचा फोटो असू नये, त्यामुळे दृष्टीदोष निर्माण होतो. नवदाम्पत्याच्या आयुष्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे लग्नपत्रिका छापताना कधीही त्यावर वधू किंवा वराचा फोटो असू नये, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
पत्रिकेचा रंग
अनेक जण आपल्या लग्नाची पत्रिका ही आकर्षक दिसावी यासाठी विविध रंगांचा वापर करून ती तयार करतात. मात्र वास्तुशास्त्रानुसार लग्नाची पत्रिका ही नेहमी लाल, पिवळा, पांढरा आणि केशरी याच कलरमध्ये असावी, कारण हे सर्व रंग सुख समृद्धीचे प्रतिक आहेत. त्यांना शुभ मानलं जातं, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
