सलमान खानच्या आई 83 व्या वर्षी पडता पडता वाचल्या, व्हिडीओ पाहून म्हणाल…
Salman Khan mother Video: सलमान खानच्या आई सलमा खान यांचा एका व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय, 83 व्या वर्षी सलमा खान पडता पडता वाचल्या, व्हिडीओ व्हायर... चाहत्यांकडून चिंता व्यक्त...

Salman Khan mother Video: अभिनेता सलमान खान आणि त्याचं कुटुंब कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं. आता देखील सलमान खान याची आई सलमा खान यांचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये सलमा खान पडता – पडत्या वाचल्या… सलमा खान यांचा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये, सलमा खान बाहेर आहेत आणि कारच्या दिशेने जात असताना त्या पडल्या असल्या. पण सलमा यांच्या पाठी उभी असलेली महिला त्यांना सावरते आणि त्यांना कारच्या दिशेने घेऊन जाते. व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओवर नेटकरी कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत.
View this post on Instagram
सलमा खान यांच्या व्हिडीओ कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, ‘व्हिलचेयरसोबत का नाही ठेवत.’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘संभालकर सलमा जी…’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘पूर्ण बॉलिवूडची आई आहेत…’, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘सर्वांच्या प्रार्थना तुमच्या सोबत आहेत…’ व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
सलमान खान ज्या पद्धतीने आपल्या आई-वडिलांची काळजी घेतो त्याचं सर्वजण कौतुक करतात. मुलगा असेल तर तो सलमानसारखा असावा… असं देखील लोकं म्हणतात. अनेकदा अभिनेता आई – वडिलांसोबत दिसतो. त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात.
View this post on Instagram
सलमान खान याच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, भाईजानचा आगामी सिनेमा ‘सिकंदर’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. सिनेमा ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. सिनेमात अभिनेत्री रश्मिका मंदाना देखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकरणार आहे. ‘सिकंदर’ शिवाय अन्य सिनेमांमध्ये देखील अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.
