अंबानींच्या पार्टीत सलमानने मलायकामुळे अर्जुन कपूरकडे केलं साफ दुर्लक्ष?

सोशल मीडियावर सध्या अंबानींच्या कार्यक्रमाचीच जोरदार चर्चा आहे. याच कार्यक्रमातील सलमान खानचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो अभिनेता अर्जुन कपूरकडे साफ दुर्लक्ष करताना दिसून येत आहे.

अंबानींच्या पार्टीत सलमानने मलायकामुळे अर्जुन कपूरकडे केलं साफ दुर्लक्ष?
Salman Khan and Arjun KapoorImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 05, 2024 | 4:32 PM

जामनगर : 5 मार्च 2024 | अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री-वेडिंग फंक्शन हा अजूनही सोशल मीडियावर विविध कारणांमुळे चर्चेत आहे. या भव्यदिव्य प्री-वेडिंगच्या योजनेपासून पाहुण्यांच्या यादीपर्यंत.. प्रत्येक गोष्टीने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं होतं. या कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटींना एकत्र पाहिलं गेलं. सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान या तिघांनी एकत्र मिळून डान्ससुद्धा केला. मात्र या सर्वांत दोन सेलिब्रिटींमधील कटुता सोशल मीडियावर विशेष दिसून आली. अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शनमधील एका व्हिडीओची सध्या जोरदार चर्चा होतेय. यामध्ये सलमान खान हा अभिनेता रणवीर सिंह आणि महेंद्र सिंह धोनी यांची भेट घेताना दिसतोय. मात्र यावेळी त्याने धोनीच्या बाजूलाच उभ्या असलेल्या अर्जुन कपूरकडे साफ दुर्लक्ष केलंय.

अर्जुन कपूर हा सध्या अभिनेत्री मलायका अरोराला डेट करतोय. मलायका ही सलमानचा भाऊ अरबाज खानची पूर्व पत्नी आहे. त्यामुळे सलमान आणि अर्जुन यांच्यातील संकोचलेपणा याठिकाणी दिसून आला. सलमानने अर्जुनकडे दुर्लक्ष केलं तर अर्जुनने त्याची भेट घेण्यासाठी पुढाकार घेतला नाही. त्यानेसुद्धा सलमानपासून दूरच राहणं पसंत केलं. मात्र बाजूलाच उभ्या असलेल्या महेंद्र सिंह धोनी आणि त्याची पत्नी साक्षी धोनी यांच्याशी तो गप्पा मारत असतो.

हे सुद्धा वाचा

अर्जुन कपूर आणि सलमान यांच्यात आता मलायकामुळे शीतयुद्ध असलं तरी एकेकाळी अर्जुनला बॉलिवूड इंडस्ट्रीत लाँच करण्यासाठी सलमानने मोठी मदत केली होती. ‘इशकजादे’ हा पहिलावहिला प्रोजेक्ट सलमानने अर्जुनला मिळवून दिला होता. किंबहुना अर्जुनने अभिनयात करिअर करण्याचा पहिला सल्लासुद्धा सलमाननेच दिल्याचं बोनी कपूर यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. इतकंच नव्हे तर एकेकाळी अर्जुन हा सलमानची बहीण अर्पिता खानला डेट करत असल्याचीही चर्चा होती.

मलायका अर्जुनला गेल्या काही वर्षांपासून डेट करतेय. मध्यंतरीच्या काळात या दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र त्यानंतर अर्जुन आणि मलायकाला एकत्र डिनर डेटला गेल्याचं पाहिल्यानंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला. अर्जुन आणि मलायका ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वाधिक चर्चेत असणारी जोडी आहे. या दोघांना कुठेही एकत्र पाहिलं तरी सोशल मीडियावर त्याची आवर्जून चर्चा होते.

म्हणून मुस्लिम महिलांना बुरखा वाटले, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर
म्हणून मुस्लिम महिलांना बुरखा वाटले, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर.
अजितदादा गटातील माजी नगरसेवकाच्या पिस्तूलमधून चुलत भावाने केला गोळीबार
अजितदादा गटातील माजी नगरसेवकाच्या पिस्तूलमधून चुलत भावाने केला गोळीबार.
'लाडकी बहीण' योजनेत 12 'भामट्या' भावांनी भरला अर्ज , कशी झाली पोलखोल?
'लाडकी बहीण' योजनेत 12 'भामट्या' भावांनी भरला अर्ज , कशी झाली पोलखोल?.
तर खुलासा करा, राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यानंतर मुंडेंचे आव्हान
तर खुलासा करा, राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यानंतर मुंडेंचे आव्हान.
वादग्रस्त वक्तव्यानंतर स्पष्टीकरण, विरोधकांच्या टीकेवर राणे म्हणाले..
वादग्रस्त वक्तव्यानंतर स्पष्टीकरण, विरोधकांच्या टीकेवर राणे म्हणाले...
अजित पवार बारामतीतूनच लढणार? दादा गटाचे 20 उमेदवार ठरले, बघा यादी
अजित पवार बारामतीतूनच लढणार? दादा गटाचे 20 उमेदवार ठरले, बघा यादी.
सुषमा अंधारेंना किती शिवसेना माहिती?त्या टीकेवर यामिनी जाधवांचा पलटवार
सुषमा अंधारेंना किती शिवसेना माहिती?त्या टीकेवर यामिनी जाधवांचा पलटवार.
'भाजपात गेलो होतो, पण...'; नाराजी व्यक्त करत माजी आमदाराची घरवापसी
'भाजपात गेलो होतो, पण...'; नाराजी व्यक्त करत माजी आमदाराची घरवापसी.
पूरस्थितीवर आमदार-खासदार असंवेदनशील? पाहणीसाठी गेले अन् स्टंटबाजी
पूरस्थितीवर आमदार-खासदार असंवेदनशील? पाहणीसाठी गेले अन् स्टंटबाजी.
'राऊत भैसाटलेले, त्यांच्या बुद्धीला लकवा', भाजपच्या नेत्याचा पलटवार
'राऊत भैसाटलेले, त्यांच्या बुद्धीला लकवा', भाजपच्या नेत्याचा पलटवार.