माही घटस्फोटानंतर सलमान खान याच्या जवळच्या व्यक्तीला करतेय डेट? अर्पिता खानकडून मोठा खुलासा…
जय भानुशाली याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर माही सलमान खान याच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीला करतेय डेट? भाईजानच्या बहिणीकडून मोठा खुलासा... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त माहीच्या खासगी आयुष्याची चर्चा...

टीव्ही अभिनेत्री माही विज गेल्या काही दिवसांपासून तिच्या घटस्फोटामुळे चर्चेत आहे. मुलगी तारा हिच्या जन्मानंतर माही आणि अभिनेता जया भानुशाली यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, घटस्फोटानंतर माहीची एक पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली. ज्यामध्ये अभिनेनी मित्र नदीम याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत मनातील भावना शब्दात व्यक्त केल्या. त्यानंतर नदीम आणि माही यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी देखील जोर धरला… अभिनेत्रीला ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागला… पण स्पष्टीकरण देत अभिनेत्रीने अफवा पसरवणाऱ्यांना चांगलंच सुनावलं.
त्यानंतर पूर्व पती जय भानुशाली, अभिनेत्री अंकिता लोखंडे यांनी देखील माहीला पाठिंबा दिला. आता अभिनेता सलमान खान याची लहान बहीण अर्पिता हिने देखील माहीसाठी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. अर्पिता हिची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

इन्स्टाग्रामवर स्टोरीवर पोस्ट करत भाईजानची बहीण अर्पित खान शर्मा म्हणाली, ‘नदीम जर तुझ्या सारख्या उत्तम व्यक्तीला वाईट बोललं जाऊ शकत तर, मला आश्चर्य वाटतं… आपण कोणत्या जगात राहत आहोत..’ सध्या अर्पिता हिची पोस्ट देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ज्या लोकांना माहिती नाही, त्यांना सांगायचं झालं तर, सलमान खान आणि नदीम एकमेकांचे चांगले मित्र आहेत. नदीम अनेकदा सलमान खान याच्या वाढदिवसच्या पार्टीत देखील दिसला आहे… शिवाय खान कुटुंबासोबत देखील नदीम याला अनेकदा स्पॉट करण्यात आलं आहे. नदीम हा माही आणि जय यांचा देखील चांगला मित्र आहे. तर त्यांची मुलगी तारा नदीम याला अब्बा म्हणून हाक मारते..
जय भानुशाली-अंकिता लोखंडे यांनीही साथ दिली
माही विजला ट्रोल केल्यानंतर, अंकिता लोखंडेने अभिनेत्रीच्या समर्थनार्थ एक लांब पोस्ट शेअर केली आणि नदीम, जय आणि माहीचा चांगला मित्र असल्याचं म्हटलं.जय भानुशालीने तीच पोस्ट पुन्हा शेअर केली आणि म्हटलं की, विधानात कोणताही खलनायक नव्हता, पण लोक त्याला खलनायक बनवत आहेत.
