Bigg Boss 19 : मी फिनालेमध्ये आलोच नसतो.., कोणावर भडकला सलमान? ‘रिॲलिटी काय ते बघ’ म्हणत झापलं

Bigg Boss 19 Grand Finale : शोबाबत तुझी इतकीच नाराजी होती आणि जर मी तुझ्याजागी असतो, तर फिनालेमध्ये आलोच नसतो.. अशा शब्दांत सलमान खानने या स्पर्धकाला सुनावलं आहे. या स्पर्धकाने बिग बॉसच्या घराबाहेर गेल्यानंतर नाराजी व्यक्त केली होती.

Bigg Boss 19 : मी फिनालेमध्ये आलोच नसतो.., कोणावर भडकला सलमान? रिॲलिटी काय ते बघ म्हणत झापलं
Salman Khan
Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 07, 2025 | 10:15 PM

Bigg Boss 19 Grand Finale : ‘बिग बॉस 19’च्या ग्रँड फिनालेदरम्यान सूत्रसंचालक सलमान खानने एका स्पर्धकाला चांगलंच सुनावलं. या स्पर्धकाने बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर शोची प्रचंड बदनामी केल्याचं सलमानने म्हटलंय. जर इतकाच नाराज होतास आणि जर मी तुझ्याजागी असतो तर पुन्हा या मंचावर आलोच नसतो, अशा शब्दांत सलमानने त्या स्पर्धकाला फटकारलं. या स्पर्धकाचं नाव आहे बसीर अली. अभिनेता आणि मॉडेल बसीरने बिग बॉसमधून बाद झाल्यानंतर प्रसारमाध्यमांसमोर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. वीकेंड का वार एपिसोडमध्ये मला पुरेसा वेळ दिला जात नसल्याची तक्रार त्याने केली होती.

फिनालेच्या एपिसोडमध्ये बसीरला उद्देशून सलमान म्हणाला, “हा बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतरही घरातच होता. हा ‘बिग बॉस-बिग बॉस’ बाहेर खेळत होता.” त्यावर बसीर म्हणाला, “सर आतमध्ये खेळण्याची संधीच मिळाली नाही.” हे ऐकून सलमानचा आणखीच पार चढला. “आम्ही तर तुला संधी दिली होती. परंतु तुझ्या चाहत्यांनी तुला मतं दिली नाहीत. आता फिनालेमध्ये तुला ही संधी दिल्याबद्दल तू कोणाचे आभार मानशील,” असा सवाल सलमानने केला. तेव्हा बसीरने “मी बिग बॉसचा ऋणी आहे,” असं उत्तर दिलं. “नक्कीच, पण हे तुझ्या तोंडून इथे असताना कधीच ऐकू आलं नाही. ज्या शोने तुला इतका मोठा प्लॅटफॉर्म दिला, तू त्याच शोबद्दल बाहेर जाऊन वाईट बोलतोस. वीकेंड का वार एपिसोडमध्ये आम्ही तुला वेळ देत नाही, अशी तुझी तक्रार होती. पण आता फिनालेमध्ये तुला इतका वेळ दिला. जर तुला इतका नाराज होतास, कलर्स टीव्ही, बिग बॉस यांच्याबद्दल तुझ्या मनात इतका राग होता, तर तुझ्याजागी मी असतो तर फिनालेमध्ये आलोच नसतो.”

बसीर त्याच्या शब्दावर अडून होता. “सर हा माझाही प्रवास आहे. बिग बॉस माझ्यासाठी किती मोठी गोष्ट होती, हे तुम्हालाही माहीत आहे,” असं तो सलमानला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा सलमान त्याला सुनावतो, “मग तू तुझ्या प्रवासाशी इतका कटू का झाला? आम्ही तर तुला बाहेर काढलं नव्हतं. तुला सर्वांत कमी मतं मिळाली होती. जर तुझ्या डोक्यात तुझी फॅन फॉलोइंग इतकी आहे तर हे पहा.. तितकी नाही आहे. थोडं रिॲलिटीकडे बघ. जर माझ्या इतक्या तक्रारी असल्या, तर मी परत आलोच नसतो. काहीही झालं असतं तरी मी आलो नसतो. मग तो माझा प्रवास असो, दुसऱ्या कोणाचा असो, कुठलाही शो असो, कोणतीही गोष्ट असो.. मी पायच ठेवला नसता. याचा अर्थ तुला या शोची गरज आतासुद्धा आहे.”