Salman Khan | प्रदर्शनापूर्वीच सलमान खानच्या चित्रपटाचा विक्रम, कोट्यावधींमध्ये ‘राधे’ची डील!

सलमान खानच्या ‘राधे’ या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभुदेवांने केले आहे. या कथित डीलनुसार सलमानने संपूर्ण चित्रपट ‘झी स्टुडिओ’ला विकला आहे.

Salman Khan | प्रदर्शनापूर्वीच सलमान खानच्या चित्रपटाचा विक्रम, कोट्यावधींमध्ये ‘राधे’ची डील!

मुंबई : बॉलिवूडचा ‘दबंग’ सलमान खानच्या आगामी ‘राधे’ या चित्रपटाविषयी एक मोठी बातमी समोर आली आहे. सलमान खानने यंदाच्या वर्षातली अर्थात 2020ची सर्वात मोठी ‘डील’ केल्याचे कळते आहे. त्याचा आगामी चित्रपट ‘राधे’ तब्बल 230 कोटींमध्ये ‘झी स्टुडिओ’ने विकत घेतल्याचे कळते आहे. कोणत्याही चित्रपटाची ही आतापर्यंतची सर्वात महागडी डील असल्याचे बोलले जात आहे (Salman Khan sold his upcoming movie Radhye to zee studios for 230 cr).

एका प्रसिद्ध वेबसाईटच्या वृत्तानुसार सलमानचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 2021च्या ‘ईद’च्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार होता. आता तो ‘झी 5’वर ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. सलमान खानचा ‘राधे’ हा चित्रपट त्याच्या खास ‘टपोरी’ शैलीचा चित्रपट आहे. सलमानच्या याच अंदाजावर त्याचे चाहते प्रेम करतात. सलमान खान या चित्रपटात ‘मोस्ट वॉन्टेड भाई’च्या भूमिकेत दिसणार आहे.

सर्व अधिकारांची विक्री!

सलमान खानच्या ‘राधे’ या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभुदेवांने केले आहे. या कथित डीलनुसार सलमानने संपूर्ण चित्रपट ‘झी स्टुडिओ’ला विकला आहे. ज्यामध्ये थिएटरचे अधिकार, ग्लोबल रिलीज, म्युझिक, ओटीटी आणि सॅटेलाईट हक्क पूर्णपणे ‘झी’ कंपनीला देण्यात आले आहेत. ‘झी’ कंपनीनेदेखील त्यांचे हे आतापर्यंतचे सर्वात मोठे डील असल्याचे म्हटले आहे. सलमानचा हा चित्रपट 230 कोटींहून अधिक व्यवसाय नक्की करेल, असा विश्वास ‘झी’ कंपनीने व्यक्त केले आहे.

सलमानच्या मागील काही चित्रपटांची अवस्था

सलमानचे सध्याच्या काळात प्रदर्शित झालेले चित्रपट ‘भारत’, ‘रेस 3’, ‘दबंग 3’ हे अपेक्षेप्रमाणे बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवू शकले नाही. त्यामुळे आता सलमान खानचा इरा संपला, असे मत समीक्षकांनी व्यक्त केले होते. परंतु, सलमान खानने ‘राधे’ या चित्रपटाची ही मोठी डील करून, टीका करणाऱ्या सगळ्यांना तगडे उत्तर दिले आहे (Salman Khan sold his upcoming movie Radhye to zee studios for 230 cr).

मेहुणा आयुषसोबत ‘अंतिम’ चित्रपट

सलमान खान, मेहुणा अर्थात अभिनेता आयुष शर्मासोबत ‘अंतिम : द फायनल ट्रुथ’ या चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे. या चित्रपटात दोघांमध्ये अ‍ॅक्शन सीन्स चित्रित केले जात आहेत. आयुष शर्मा या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

अंतिमच्या शूटिंगला सुरुवात

सलमान खानने कुठेही काहीही उघड न करता अत्यंत गुपचूपपणे महेश मांजरेकरच्या ‘अंतिम’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली. सलमान खान गेल्या 6 डिसेंबरपासून या चित्रपटाचे चित्रीकरण करत आहेत. या चित्रपटात आयुष कुख्यात गुंडाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात सलमान खान आणि आयुषसोबत निकेतन धीरही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सलमान खान या चित्रपटात एका शिख पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे.

(Salman Khan sold his upcoming movie Radhye to zee studios for 230 cr)

हेही वाचा :

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI