रणवीर सिंह – फरहान अख्तरच्या वादात सलमानची उडी; अखेर ‘भाईजान’च तोडगा काढणार?

अभिनेता रणवीर सिंह आणि फरहान अख्तर यांच्यातील वाद मिटवण्यासाठी आता 'भाईजान' अर्थात सलमान खानने पुढाकार घेतल्याची माहिती समोर येत आहे. यासाठी सलमानने दोघांशीही चर्चा केली असून त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे.

रणवीर सिंह - फरहान अख्तरच्या वादात सलमानची उडी; अखेर भाईजानच तोडगा काढणार?
सलमान खान, रणवीर सिंह आणि फरहान अख्तर
Image Credit source: Instagram
| Updated on: May 29, 2026 | 9:21 AM

अभिनेता-दिग्दर्शक-निर्माता फरहान अख्तरच्या आगामी ‘डॉन 3’ या चित्रपटाचं शूटिंग सुरू होण्याच्या तीन आठवडे आधी माघार घेतल्याने फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजने (FWICE) अभिनेता रणवीर सिंहविरोधात नॉन-कोऑपरेशन डायरेक्टिव्ह जारी केले. यावरून रणवीरच्या चाहत्यांमध्ये आणि इंडस्ट्रीत एकच चर्चा सुरू आहे की, हा वाद कसा मिटवला जाणार? अशातच या वादात आता बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात अभिनेता सलमान खानची एण्ट्री झाली आहे. रणवीर आणि फरहान यांच्यातील हा वाद सोडवण्यासाठी सलमान मध्यस्थी करणार असल्याचं म्हटलं जात आहे. सलमानला फिल्म इंडस्ट्रीचा ‘गॉडफादर’ असं म्हटलं जातं. कारण तो नेहमीच कठीण काळात लोकांच्या पाठिशी उभा राहतो.

‘डॉन 3’वरून रणवीर सिंह आणि फरहान अख्तर यांच्यात वाढता वाद पाहून सलमानने मध्यस्थी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ‘बॉलिवूड हंगामा’ने दिलेल्या वृत्तानुसार, सलमानला रणवीर एक अभिनेता आणि व्यक्ती म्हणून खूप आवडतो. तर अख्तर कुटुंबही त्याच्या तितकंच जवळचं आहे. त्याने दोन्ही पक्षांशी संवाद साधला असून आपापल्या प्रोजेक्ट्सच्या भविष्याला धक्का न लावता आपले प्रश्न सोडवण्याचं आवाहन केलं आहे.

यावेळी सलमानने फरहानला समजावून सांगितलं की, इंडस्ट्रीत अनेक दशकांपासून क्रिएटिव्ह मतभेद असणं ही एक सामान्य बाब आहे. रणवीरचा दृष्टीकोन समजून घेण्यासाठी त्याने त्याच्याशीही बरात वेळ चर्चा केली. या संपूर्ण प्रक्रियेत कोणालाही दुखावलं जाऊ नये यासाठी त्याने समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला. मिळालेल्या माहितीनुसार, सलमानने दोन्ही पक्षांना हा वाद मिटल्यानंतर एक इंडस्ट्री म्हणून विचार करून दुसऱ्या प्रोजेक्टवर एकत्र काम करण्यास सांगितलं आहे.

फरहान आणि रणवीर या दोघांनीही सलमानची मतं समजून घेतली आहेत आणि त्याचा सल्ला गांभीर्याने घेतला आहे. आता ते कोणताही पुढील वाद न होऊ देता सामंजस्यपूर्ण तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत. सलमानला या प्रकरणात कोणतीही कायदेशीर गुंतागुंत नको आहे. तसंच चित्रपट एजन्सींनीही घाईने निर्णय घ्यावेत असंही त्याला वाटत नाही. झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी सलमान फरहानच्या पाठिशी उभा आहे आणि ‘धुरंधर’च्या यशाचा फायदा घेण्यासाठी रणवीरला नवीन प्रोजेक्ट करण्यास प्रोत्साहनही देत आहे.

Follow Us