Bigg Boss 14 Promo | राखी सावंतमुळे सलमान खानचा पारा चढला!

बिग बॉस 14 ( Bigg Boss 14)चा नुकताच एक प्रोमोसमोर आला आहे. 'वीकेंड का वार' मध्ये सलमान खान (Salman Khan) घरातील सदस्यांचा चागंलाच क्लास घेताना दिसत आहे.

Bigg Boss 14 Promo | राखी सावंतमुळे सलमान खानचा पारा चढला!

मुंबई : ‘बिग बॉस 14’ ( Bigg Boss 14)चा नुकताच एक प्रोमोसमोर आला आहे. ‘वीकेंड का वार’ मध्ये सलमान खान (Salman Khan) घरातील सदस्यांचा चांगलाच क्लास घेताना दिसत आहे. विशेष करून सलमान राखीला बरेच सुनवतो इतकेच नाहीतर सलमान राखीला शो सोडून जायला सांगतो आणि घराचे दरवाजे देखील उघडतात मात्र, राखी बिग बॉसचे घर सोडून जात नाही. सलमान घरातील सदस्यांना म्हणतो की, तुम्ही प्रत्येक टास्क रद्द करतात तुम्ही टास्क सुरू होताच विजेता ठरून टाकतात मग टास्क घ्यायचे कशासाठी यावेळी अली गोनी सलमानला समजवळ्याचा प्रयत्न करतो मात्र, सलमान अलीला शांत बस म्हणताना दिसत आहे. (Salman Khan took a class of members of the Bigg Boss house)

वीकेंड का वारमध्ये सलमान एक-एक करून घरातील सर्व सदस्यांचा क्लास घेणार आहे. बिग बॉसच्या घरात अर्शी खान (Arshi Khan)आणि देवोलीना भट्टाचार्य (Devoleena Bhattacharjee) यांच्या जोरदार वाद होताना दिसले आहे. मात्र, या वादामध्ये देवोलीना भट्टाचार्य बिग बॉस घरातील अनेक वस्तूंची तोडफोड केली आहे, देवोलीनाने अर्शीच्या हातातील अन्न फेकून देते अर्शीला शिवीगाळही करताना दिसत होती.

देवोलीना भट्टाचार्यचे हे रूप बघून घरातील इतर सदस्य आवाक झाले होते. यावेळी अली गोनी तिला समजवण्यासाठी जातो त्यावेळी देवोलीना जोरजोरात ओरडत म्हणते की, अर्शी माझ्या घरच्यांविषयी बोलली आहे. त्यानंतर देवोलीना आपल्या मोर्चा बाथरूमकडे वळवते आणि तेथेही काही वस्तूंची मोडतोड करताना दिसत होती.

संबंधित बातम्या : 

Bigg Boss 14 | बिग बॉसच्या विजेत्याची फिनालेच्या 3 आठवड्यांपूर्वीच घोषणा, कोणी मारली बाजी पाहा?

तुम्ही रिमोटचं बटन दाबता आणि थेट सुरु होतो शिव्यांचा हंगाम, बिग बॉसनं सगळ्या मर्यादा तोडल्या?

Bigg Boss-14 | रितेश विवाहित, त्याला एक मुलगाही, राखी सावंतचा खळबजनक गौप्यस्फोट

(Salman Khan took a class of members of the Bigg Boss house)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI