अनंत – राधिका लवकर गुडन्यूज देत सलमान खानची ‘ही’ इच्छा करतील पूर्ण? भाईजानची पोस्ट चर्चेत

Salman Khan: अनंत - राधिका यांच्याकडून सलमान खानला मोठी अपेक्षा, भाईजानची इच्छा दोघे करतील पूर्ण, खास फोटो पोस्ट करत अभिनेत्याने व्यक्त केली इच्छा... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सलमान खान याच्या पोस्टची चर्चा...

अनंत - राधिका लवकर गुडन्यूज देत सलमान खानची ही इच्छा करतील पूर्ण? भाईजानची पोस्ट चर्चेत
| Updated on: Jul 16, 2024 | 8:01 AM

भारतातील नामवंत उद्योगपती आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानी यांचं लग्न राधिका मर्चंट यांच्यासोबत मोठ्या थाटात पार पडलं. दोघांच्या लग्नात अनेक सेलिब्रिटी आणि दिग्गज व्यक्तींनी हजेरी लावली होती. लग्न आणि लग्नानंतरचे सर्व कार्यक्रम पार पडल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी राधिका – अनंत यांना वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. एवढंच नाही तर, अभिनेता सलमान खान याने देखील खास फोटो पोस्ट करत अनंत – राधिका यांना नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. शिवाय अभिनेत्याने एक इच्छा देखील व्यक्त केली.

एक्सवर अनंत – राधिका यांचा एक फोटो पोस्ट करत सलमान खान म्हणाला, ‘अनंत आणि राधिका… मिस्टर आणि मिसेज अनंत अंबानी… मी तुमच्या मनात एकमेकांसाठी आणि एकमेकांच्या कुटुंबासाठी असलेलं प्रेम पाहिलं आहे. या ब्रह्मांडने तुम्हा दोघांचा स्वीकार केला आहे. तुमच्या दोघांच्या आनंदासाठी आणि आरोग्यासाठी प्रार्थना करतो… देवाची कृपा सदैव तुम्हा दोघांवर कायम राहो…’

 

पुढे मनातील इच्छा व्यक्त करत सलमान खान म्हणाला, ‘जेव्हा तुम्ही आई – वडील व्हाल, तेव्हा तुमच्यासोबत खूप डान्स करायचा आहे… यासाठी मी आता प्रतीक्षा करु शकत नाही…’ असं देखील सलमान खान पोस्टच्या शेवटी म्हणाला. सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त सलमान खान याच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

अभिनेत्याच्या पोस्टवर नेटकरी देखील कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘भाई आता तू पण लग्न कर, आम्ही आता प्रतीक्षा नाही करु शकत…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘भाई तू कधी करणार लग्न?’ चाहते कायम सलमान खान याला त्याच्या लग्नाबद्दल विचारत असतात.

सलमान खान याच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, भाईजान लवकरच ‘सिकंदर’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात सलमान खान याला नव्या अंदाजात पाहाण्यासाठी चाहते देखील उत्सुक आहेत.