सलमान-प्रज्ञा जैस्वालचा रोमान्स, गर्लफ्रेंड यूल‍िया वंतूरच्या आवाजाची जादू; गाणं होतंय व्हायरल

सलमान-प्रज्ञा जैस्वालचा रोमान्स, गर्लफ्रेंड यूल‍िया वंतूरच्या आवाजाची जादू; गाणं होतंय व्हायरल
सलमान खान आणि प्रज्ञा जयस्वाल

या गाण्यात सलमान खानचा शीख लूक पाहायला मिळत आहे, तसेच सलमानने पगडी बांधली तेव्हा प्रज्ञा साडीत दिसत आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: महेश घोलप, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 22, 2022 | 6:40 PM

मुंबई – सलमान खान (salman khan) आणि प्रज्ञा जयस्वाल (pragya jaiswal) या दोघांचा ‘मैं चला’ म्युझिक व्हिडिओ (music video) नुकताच रिलीज झाला आहे. सलमान आणि प्रज्ञाशिवाय हे गाणं आणखी एका कारणासाठी एका कारणामुळे प्रसिध्द झाले आहे. गुरु रंधावा (guru randhawa) आणि सलमानची मैत्रीण युलिया वंतूर (Iulia Vantur) यांनी या गाण्याला त्यांचा आवाज दिला आहे. या गाण्यावर अनेकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच सोशल मीडियावर या गाण्याची चर्चा सुध्दा आहे.

या गाण्यात सलमान खानचा शीख लूक पाहायला मिळत आहे, तसेच सलमानने पगडी बांधली तेव्हा प्रज्ञा साडीत दिसत आहे. तसेच गाण्यातला सलमानचा लुक त्याच्या Antrim The Final Truth या चित्रपटाची आठवण करून देतो. तर प्रज्ञा जयस्वालचा लुक दबंगमधील सोनाक्षी सिन्हासारखाच दिसत आहे. गाण्याचं शुटिंग झाडं आणि नदीजवळ करण्यात आलं असून ही जोडी देशी रोमान्समध्ये दिसत आहे.

गाण्यात यांची मुख्य भुमिका

गुरू आणि युलियाच्या आवाजाची जादू आपल्याला गाण्यामध्ये ऐकायला मिळाली आहे. नेहमी प्रमाणेच गुरु रंधावा आपल्या आवाजाने जादू पसरवताना दिसतोय. गुरूच्या आवाजातील गोडवा आणि मृदूपणा या गाण्याशी सुसंगत आहे. युलिया वंतूरनेही अप्रतिम गायले आहे. तिचा मखमली आवाज प्रज्ञा जैस्वालवरती परफेक्ट दिसतो. मैं चला या गाण्याचे बोल आणि संगीतकार शब्बीर अहमद यांनी केले आहे तसेच दिग्दर्शन शबिना खान आणि दिग्दर्शक गिफ्टी यांनी केले आहे.

गाणं चाहत्यांच्या पसंतील

मैं चला हे गाणं युट्यूबवरती नुकतचं रिलीज करण्यात आलं आहे. युट्यूबवरती गाण रिलीज केल्यानंतर त्या गाणावर अनेकांनी सकारात्मक कमेंट सुध्दा केल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘गुरूचा आवाज आणि सलमानचा सदैव मोहक लुक एकमेकांना पूरक आहेत, प्रज्ञाही खूप छान दिसत आहे.’ दुसर्‍या युजरने लिहिले की, ‘गुरु आणि युलिया, दोघांचाही आवाज अतिशय गुळगुळीत, निवांत आणि छान आहे, गाण्याचे बोल देखील चांगले आहेत. ‘या गाण्याचं दिग्दर्शनही खूप छान केले आहे असा एक चाहता म्हणतोय

 रसिका सुनिल आणि आदित्य बिलगी यांच्या एंगेजमेंटला एक वर्ष पूर्ण, त्यानिमित्त खास फोटो, नक्की बघा…

बोलके डोळे, निरागस चेहरा, बॉलिवूडमध्ये बबली गर्ल नावाने प्रसिद्ध, या अभिनेत्रीला ओळखलं का?

लाडात थोडं गोड होऊनी मिठीत येणार का, जुईली-रोहितच्या लग्नाची धूम


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें