AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Old Is Gold | घराची स्वच्छता करताना दिवंगत काकीच्या सामानात सापडली ‘मौल्यवान’ गोष्ट, तुम्हीही एकदा बघाच!

अल्ट न्यूजचे संस्थापक सॅम जावेद यांनी त्याच्या सोशल मीडिया प्रोफाईलवर त्यांच्या दिवंगत काकीच्या काही ‘मौल्यवान’ गोष्टी शेअर केल्या आहेत.

Old Is Gold | घराची स्वच्छता करताना दिवंगत काकीच्या सामानात सापडली ‘मौल्यवान’ गोष्ट, तुम्हीही एकदा बघाच!
सुवर्णकाळाचा मौल्यवान ठेवा!
| Updated on: Feb 24, 2021 | 1:01 PM
Share

मुंबई : बऱ्याचदा आपण काही गोष्टी स्वतःजवळ खूप काळ जपून ठेवतो. त्या गोष्टींशी आपल्या आठवणी जोडल्या गेलेल्या असतात. मात्र, काळाच्या ओघात या आठवणी मागे पडून जातात आणि आपणही त्या कधीकधी विसरून जातो. पुन्हा केव्हातरी साफ सफाई करताना म्हणा किंवा अडगळीची खोली रिकामी करताना आपल्याला त्या गोष्टी पुन्हा एकदा सापडतात. त्यावेळी होणाऱ्या आनंदाची तुलना आपल्याला जगातील इतर कुठल्याही आनंदाशी करता येत नाही. त्यातही त्या गोष्टी आपल्या कुटुंबातील दिवंगत व्यक्तींच्या असतील, तर त्यात त्यांच्या आयुष्यभराच्या आठवणी जपलेल्या असतात. असंच काही घडलंय अल्ट न्यूजचे संस्थापक सॅम जावेद यांच्या सोबत…(Sam Jawed Shares Old collection album of his late aunt will memories you a golden era of cinema)

अल्ट न्यूजचे संस्थापक सॅम जावेद यांनी त्याच्या सोशल मीडिया प्रोफाईलवर त्यांच्या दिवंगत काकीच्या काही ‘मौल्यवान’ गोष्टी शेअर केल्या आहेत. घरतील सामानाची साफसफाई करताना त्यांना त्यांच्या दिवंगत काकीची एक खूप मौल्यवान वस्तू सापडली आणि या वस्तूला पाहून झालेला आनंद त्यांनी सगळ्यांसोबत शेअर केला आहे.

काय आहे ही वस्तू? आणि त्यात नेमकं दडलंय तरी काय?

सोशल मीडियावर पोस्ट करत सॅम म्हणतात, ‘माझ्या काकूचे बर्‍याच वर्षांपूर्वी निधन झाले. तिच्या सामानांपैकी एक जुना अल्बम होता, जो तिला खूप आवडायचा. गेल्या अनेक वर्षांपासून हा अल्बम हरवला होता, तळघरात कुठेतरी दफन झाला होता. नुकताच साफसफाईदरम्यान तो सापडला.

1950 आणि 60च्या दशकात एका लहानशा शहरातली, लहान मुलगी चित्रपटांद्वारे पूर्णपणे मोहित झाली होती. मात्र, आईच्या नापसंतीमुळे, तिने आपला मोकळा वेळ चित्रपटातील कलाकारांना फॅन मेल लिहिण्यात घालवला आणि यातून तिने कलाकारांच्या स्वाक्षऱ्या, फोटो असणाऱ्या पत्रांचा संग्रह तयार केला.

दुर्दैवाने, त्यातील बहुतेक फोटो आता खराब स्थितीत आहेत. परंतु त्यातील काही सुव्यस्थित फोटो मी या पोस्टमध्ये टाकत आहे. मला खात्री आहे की, तिलाही तिचा हा संग्रह सगळ्यांना दाखवायला आवडला असता.’

(Sam Jawed Shares Old collection album of his late aunt will memories you a golden era of cinema)

सुवर्णकाळाचा मौल्यवान ठेवा!

सॅम जावेद यांनी शेअर केलेल्या या पोस्टमध्ये त्यांच्या काकीने संग्रह केलेले कलाकारांचे फोटो, त्यांच्या स्वाक्षऱ्या आणि त्यांची पत्र देखील आहेत. या अमुल्य ठेव्यामध्ये चित्रपटांचा ‘सुवर्ण काळ’ अक्षरशः जिवंत ठेवण्यात आला आहे. सॅम जावेद यांनी हा मौल्यवान ठेवा सगळ्या रसिक प्रेक्षकांपर्यंत आणि चाहत्यांपर्यंत सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून पोहचवला असून, याला प्रचंड लाईक्स मिळत आहेत. तसेच लोक कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया डेत आहेत.

तुम्हीही पाहा ‘हा’ मौल्यवान सुवर्णकाळ!

मनोरंजन विश्वाच्या सुवर्ण काळाची सफर करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा!

 (Sam Jawed Shares Old collection album of his late aunt will memories you a golden era of cinema)

हेही वाचा :

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.