Video : शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राचा ‘#Pawri’ टाईम, पाहा व्हिडीओ

सध्या ‘#Pawri हो रहा हैं’ हे देशभरात ट्रेंड होत आहे. आता शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रानंही यावर व्हिडीओ तयार केला आहे. (Shilpa Shetty and Raj Kundra's Pawri Time)

  • Updated On - 12:13 pm, Wed, 24 February 21
Video : शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राचा ‘#Pawri’ टाईम, पाहा व्हिडीओ

मुंबई : सध्या ‘#pawri हो रहा हैं’ हे देशभरात ट्रेंड होत आहे. यावर काही जण नवनवीन आणि मजेदार व्हिडीओ तयार करत आहेत. स्टार्सपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सगळेच पौरी करताना दिसत आहेत. आता बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीही पौरी मोडमध्ये दिसली आहे. ती सध्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. नुकतंच तिचे पती राज कुंद्रानं एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो मित्रांसह मजा करताना दिसत आहे. (Shilpa Shetty and Raj Kundra’s Pawri Time )

View this post on Instagram

A post shared by Raj Kundra (@rajkundra9)

राज कुंद्रा यांनी इन्स्टाग्रामवर ब्रेकफास्ट करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आणि लिहिलं की ‘पौरी हो रही हैं’. व्हिडीओमध्ये ते म्हणत आहेत – हा आमचा ब्रेकफास्ट आहे, हा व्हूव आहे आणि ही आमची पौरी होत आहे. व्हिडीओमध्ये दिसतंय की हे दोघं आपल्या मित्रांसोबत सुंदर जागेवर ब्रेकफास्ट करताना दिसत आहेत. हे जोडपं सध्या मालदीवमध्ये धमाल करत आहे. राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांचा हा व्हिडीओ चाहत्यांनाही आवडला आहे. पाकिस्तानी मुलगी डॅननीर मोबिनने हा ट्रेंड सुरू केला जो आता संपूर्ण भारतसह अनेक ठिकाणी व्हायरल होतोय आणि लोक खूप मजा करून आपला व्हिडीओ शेअर करत आहेत.

शिल्पा शेट्टीनं शेअर केला व्हिडीओ

याशिवाय स्वत: शिल्पा शेट्टीनंही एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती मस्त सुट्टी काय आहे हे सांगताना दिसत आहे. ‘सुट्ट्या अशाच असाव्यात’. असं कॅप्शन देत तिनं हा व्हिडीओ शेअर केला आहे.

लॉकडाऊन काळात कुटुंबाला दिला वेळ

शिल्पा शेट्टीनं लॉकडाऊन काळात आपल्या कुटुंबासोबत खास वेळ घालवला आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशीही संपर्क साधला. लॉकडाऊननंतर ती पुन्हा एकदा बाहेर पडली आहे आणि सुट्ट्यांचा आनंदही घेत आहे. वर्क फ्रंट बद्दल बोललो तर ती ‘निक्कामा’ आणि ‘हंगामा 2’ या सारख्या चित्रपटांचा एक भाग आहे.

संबंधित बातम्या

Rakhi Sawant | ‘बिग बॉस’मधून बाहेर पडलेल्या राखीवर कोसळला दुःखाचा डोंगर, ‘या’ जवळच्या व्यक्तीला कर्करोगाचे निदान!

राधिका, शनाया आणि गुरुनाथ घेणार प्रेक्षकांचा निरोप; ‘या’ दिवशी मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार

Published On - 12:13 pm, Wed, 24 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI