
दाक्षिणात्य अभिनेत्री समांथाच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. प्रसिद्ध अभिनेता नागा चैतन्यसोबतच्या घटस्फोटानंतर तब्बल 4 वर्षांनी समांथा लग्नबंधनात अडकली. तिने 1 डिसेंबर 2025 रोजी “द फॅमिली मॅन” चा दिग्दर्शक राज निदिमोरूसोबत लग्न केलं. या दोघांचे रिलेशन खूप वर्षांपासून सुरु असल्याचं म्हटलं जातं. अखेर त्यांनी त्यांचे नाते अधिकृत करत तामिळनाडूतील लिंगा भैरवी मंदिरात अगदी साधेपणाने हा लग्नसोहळा पार पडला आणि त्यांचे फोटोज काही क्षणातच इंटरनेटवर व्हायरल झाले.
लग्नातील जेवणाचा मेन्यू देखील समोर
त्यांचे लग्नाचे फोटो समोर येताच सोशल मीडियावर सर्वांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. समंथाच्या नव्या सुरुवातीसाठी तिचे फॅन्स फार खुश आहेत. तसेच समांथाने तिचा हा लग्नसोहळा वैदिक आणि अतिशय कमी लोकांमध्ये केला. तिच्या साडीपासून ते तिने ज्या ‘भूत शुद्धी पद्धती’ने विवाह केला ती पद्धत, तसेच ज्या मंदिरात तिने लग्न केलं त्या देवीचे मंदिर, त्या मंदिराचे महत्त्व अशा सर्व गोष्टींचा चर्चा झाली आणि आताही चाहते ते सर्च करून पाहत आहेत.
पण याचं दरम्यान समांथा आणि राज यांच्या लग्नातील जेवणाचा मेन्यू देखील समोर आला आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, जिथे मोठमोठे सेलिब्रिटी आपल्या लग्नात शाही जेवणाचा थाट ठेवतात तिथेच समंथाने आपल्या लग्नाच्या मेन्यूत अगदी साध्या आणि पारंपारिक मेन्यूची निवड केली होती. लग्नातील कर्नाटक शैलीतील शाकाहारी मेजवानीने सर्वांचे लक्ष वेधले. यात कोणकोणत्या पदार्थांचा समावेश होता ते चला जाणून घेऊया.
काय होता जेवणाचा मेन्यू?
जेवणाच्या या ताटात प्रथिनेयुक्त डाळ, पौष्टिक रागी मुड्डे आणि बहुमुखी अक्की रोटी सारखे पदार्थ सामील होते. सेलिब्रिटींच्या लग्नात सामान्यतः अपेक्षित असलेल्या महागड्या, बहु-खंडीय बुफेच्या अगदी उलट, जोडप्याने जाणूनबुजून हा ग्रामीण, साधा आणि पारंपरिक मेन्यू निवडला. कोशिंबीर, भात, मसाला वडा, गाजर-शेंगांची भाजी आणि सोप्पू पाल्या म्हणजेच पालेभाजी या पदार्थांचा यात समावेश दिसून आला. लग्नासाठी निवडलेल्या या साध्या मेन्यूने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
जेवणाच्या मेन्यूत दडले अनेक पोषक घटक
तसेच हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की, मेन्यू फक्त पारंपरिक आणि साधा नव्हता तर आरोग्याच्या दृष्टीनेही यात अनेक पोषक तत्वांचा समावेश करण्यात आला होता. त्या प्रत्येक पदार्थाचे शरीराला होणारे फायदे समजल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल आणि विचारपूर्वक निवडलेल्या या जेवणाच्या मेन्यमुळे समांथाचे कौतुकही वाटेल.त्या पदार्थांबद्दल जाणून घेऊयात.
डाळ – प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत असलेली डाळ शाकाहारी लोकांच्या आहारासाठी एक उत्तम पर्याय ठरते.
अक्की रोटी – यात फायबर, प्रथिने, खनिजे आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात आढळतात.
बीन्स कॅरट पाल्या – बीन्स, गाजर आणि पालेभाज्या यांचे मिश्रण शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.
सोप्पू पाल्या- ही कर्नाटकातील एक पारंपरिक आणि आरोग्यदायी भाजी आहे, जी पालेभाज्यांपासून तयार केली जाते.
रागी मुड्डे – रागीमध्ये प्रथिने, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम आणि फायबर असते ज्यामुळे ते एक पौष्टिक सुपरफूड मानले जाते.
कोशिंबीर – कोशिंबिरीतील भाज्या आणि दह्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतासारख्या समस्या कमी होतात.
मसाला वडा – डाळी आणि मसाल्यांपासून ऊर्जा मिळते, ज्यामुळे शरीराला ताकद मिळते