समंथा रुथ प्रभू हिची दुसऱ्या नवऱ्याकडून देखील फसवणूक! जवळच्या व्यक्तीकडून धक्कादायक सत्य उघडकीस
Samantha Ruth Prabhu : पहिलं लग्न अपयशी ठरंल, दुसऱ्या नवऱ्याकडून देखील मोठी फसवणूक, समंथा रुथ प्रभू हिच्या आयुष्यात नक्की सुरु तरी काय? जवळच्या व्यक्तीकडून मोठं सत्य अखेर उघडकीस...

Samantha Ruth Prabhu Marriage : प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिने 1 डिसेंबर 2025 रोजी दुसरं लग्न केलं आणि नव्या आयुष्याची सुरुवात केली. समांथा हिने दिग्दर्शक राज निदिमोरु याच्यासोबत लग्न केलं आहे. समंथा हिच्या प्रमाणेच राज यांचं देखील दुसरं लग्न आहे. राज याचं पहिलं लग्न श्यामली डे हिच्यासोबत झालं होतं. 2015 मध्ये राज आणि श्यामली यांनी लग्न केलं. पण 2022 मध्ये आलेल्या एका रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला की, दोघांमध्ये काहीतरी बिनसलं आहे. पण 2023 मध्ये श्यामली हिने व्हेंलेटाईनच्या दिवशी खास पोस्ट केली, ज्यामुळे रंगणाऱ्या सर्व चर्चांना पूर्णविराम लागला… पण जेव्हा समंथा आणि राज यांच्या लग्नाचे फोटो समोर आले, तेव्हा श्यामली हिच्या मैत्रिणीने धक्कादायक दावा केला आहे. राज आणि श्यामली यांचा अद्याप घटस्फोट झालेला नाही… असा खुलासा श्यामलीच्या मैत्रिणीने केला.
श्यामलीच्या मैत्रिणीचा धक्कादायक दावा…
श्यामली हिची मैत्रिणी भावना तपाडिया हिने श्यामली हिने शेअर केलेली एक पोस्ट री-शेअर केली आणि म्हणाली, ‘जी लोकं मला विचारत होते… गेल्या वेळी मी जेव्हा चेक केलं, तेव्हा श्यामली आणि राज विवाहित होते… याचा अर्थ असा होतो की, त्यांचा अद्याप घटस्फोट झालेला नाही…’ भावना हिच्या अशा वक्तव्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे…
भडकले समांथा हिचे चाहते…
भावना हिची पोस्ट सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. ज्यामुळे समंथा हिच्या चाहत्यामध्ये संतापाची लाट दिसून येत आहे… राज याने समंथा हिची फसवणूक केली… असं अनेकांचं म्हणणं आहे… समंथा हिला सर्वकाही माहिती असताना तिने राज याच्यासोबत लग्न केलं… असं देखील अनेकांचं म्हणणं आहे… तर यावर अद्याप समंथा, राज आणि श्यामली यांनी मौन बाळगलं आहे..
कोण आहेत भावना आणि श्यामली?
भावना हिने इन्स्टाग्राममध्ये दिलेल्या माहितीनुसार, ती महानायक अमिताभ बच्चन यांच्या KBC मध्ये लेखिका म्हणून काम करते… एवढंच नाही तर, अमिताभ बच्चन तिला सोशल मीडियावर फॉलो देखील करतात… तर श्यामली हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, रिपोर्टनुसार, श्यामली हिने ‘रंग दे बसंती’ आणि अभिनेता अजय देवगण याच्या ‘ओमकारा’ सिनेमा सहाय्यक दिग्दर्शकाचं काम केलं होतं.. त्यानंतर 2014 मध्ये राज आणि डिके दिग्दर्शत ‘हॅप्पी-एंडिंग’ सिनेमाच क्रिएटिव्ह सुपरवायझर म्हणून काम केलं…
