AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समांथा अन् राज निदिमोरूच्या लग्नबद्दल अनेकांनी व्यक्त केली नाराजी; या अभिनेत्रीने समांथावरच केला दुसऱ्याचा संसार मोडल्याचा आरोप

समांथा रुथ प्रभूच्या राज निदिमोरूसोबतच्या दुसऱ्या लग्नामुळे सर्वांनाच धक्का बसला. सोशल मीडियावर तर या बातमीमुळे खळबळ उडाली आहे. अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या, पण मात्र काहींनी नाराजी व्यक्त केली आहे. एका अभिनेत्रीने पोस्ट करत थेट समांथावर स्वत:चे घर बसवण्यासाठी दुसऱ्याचा संसार मोडल्याचा आरोप केला आहे.

समांथा अन् राज निदिमोरूच्या लग्नबद्दल अनेकांनी व्यक्त केली नाराजी; या अभिनेत्रीने समांथावरच केला दुसऱ्याचा संसार मोडल्याचा आरोप
poonam kaurImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 02, 2025 | 8:30 PM
Share

सध्या दक्षिणेकडील आणि बॉलिवूडमधून समांथा रूथ प्रभूच्या दुसऱ्या लग्नाबद्दल जोरदार चर्चा सुरु आहे. नागा चैतन्यसोबत घटस्फोट घेतल्यानंतर जवळजवळ चार वर्षांनी समांथाने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसह तिच्या दुसऱ्या लग्नाची आनंदाची बातमी दिली. समांथाने “द फॅमिली मॅन 3” चे दिग्दर्शक राज निदिमोरूशी लग्न केले आणि इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले. समांथाच्या या अचानक आलेल्या फोटोमुळे नक्कीच सर्व चाहत्यांना आनंदाचा धक्का बसला. सर्वांनी तिचे अभिनंदन केलं आहे. पण काही जणांनी मात्र या दोघांच्या लग्नावर आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली आहे. दक्षिणेकडील एका लोकप्रिय अभिनेत्रीने तर थेट समांथावरच दुसऱ्याचा संसार मोडल्याचा आरोप केला आहे. पण यामागे नक्की काय कारण आहे जाणून घेऊयात.

समांथाने त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर करताच काहींनी व्यक्त केली नाराजी

समांथा आणि राज यांनी कोइम्बतूरमधील ईशा सेंटरमध्ये अतिशय खाजगी लग्न केले. ज्यामध्ये फक्त कुटुंब आणि जवळच्या मित्रांना आमंत्रित केले होते. सोशल मीडियापासून आपले वैयक्तिक आयुष्य दूर ठेवणाऱ्या समांथाने त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर करताच सोशल मीडिया तिला भरभरून शुभेच्छा मिळाल्या आहेत. या सगळ्यामध्ये, एका पोस्टने मात्र सर्वांचे लक्ष वेधले. ज्यामध्ये एका अभिनेत्रीने समांथासाठी नाराजी व्यक्त करणारी पोस्ट लिहिली आणि तिच्यावर काही आरोपही केले आहेत. सध्या या अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल होत आहे.

स्वतःचे घर बांधण्यासाठी दुसऱ्याचे घर उध्वस्त करणे…

ही अभिनेत्री म्हणजे पूनम कौर. पूनमने ट्विटरवर समांथा आणि राज यांच्या लग्नाबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने त्यांच्या लग्नाला विरोध दर्शवला आहे. तिने पोस्टमध्ये कोणाचेही नाव घेतले नाही. तिने लिहिले, “स्वतःचे घर बांधण्यासाठी दुसऱ्याचे घर उध्वस्त करणे… हे दुःखद आहे. एका मजबूत, सुशिक्षित आणि स्वतःमध्ये रमलेल्या महिलेचा सशुल्क जनसंपर्क मोहिमांद्वारे गौरव केला जात आहे. पैशानेच कमकुवत आणि हताश पुरुष खरेदी करता येतात.” अशा पद्धतीची खोचक पोस्ट करत पूनमने नाव न घेता समांथावर राजचा पहिला संसार मोडण्याचा आरोप केला आहे.

या ट्विटवरून जोरदार चर्चा 

तिने तिच्या पोस्टमध्ये कोणाचाही उल्लेख केला नसला तरी, या ट्विटमुळे जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अनेकांनी ती कोणाचा उल्लेख करत आहे असा प्रश्न उपस्थित केला आहे, तर काहींनी ती ती समंथा आणि राजबद्दलच बोलत असल्याचं म्हणत आहे. अनेक युजर हे समांथाच्या बाजूने पूनमच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत आहेत.

युजर्सच्या कमेंट्स 

एका युजरने म्हटले “जर हे सॅमच्या लग्नाशी संबंधित असेल, तर राज हा खरेदी करण्यासारखी कॅन्डी नाही. त्याला आयुष्यात काय हवे आहे याची त्याला समज आहे. पूर्ण आदराने, कोणालाही दोष न देणे आणि आदराने आणि प्रेमाने जगणे आणि इतरांनाही जगू देणे चांगले.” तर एकाने लिहिले आहे की, “तुमच्यासारख्या व्यक्तीकडून असे ट्विट पाहणे खरोखरच निराशाजनक आहे. तुम्ही एकदाही असेच प्रयत्न केले होते, पण अयशस्वी झालात. मला वाटते की तुम्हाला इतरांच्या वैयक्तिक समस्यांवर भाष्य करण्याचा अधिकार नाही, कारण तुम्ही वर्षानुवर्षे सत्य लपवत आहात. कृपया तुम्हाला येणाऱ्या कमेंट्सना प्रतिसाद द्या.” अशा अनेक कमेंट्स करत नेटकऱ्यांनी पूनमवरच आरोप केले आहे.

राज निदिमोरू अजूनही श्यामलीशी विवाहित आहे का? 

दरम्यान, राजच्या पहिल्या पत्नी श्यामली डेच्या मैत्रिणीहिनेही एक पोस्ट केली होती. यामुळे समंथा आणि राजच्या लग्नावर एक महत्त्वाचा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. सोशल मीडिया पोस्टमध्ये, मैत्रिणीने खुलासा केला की ती जेव्हा श्यामलीला भेटली होती तेव्हा ती विवाहितच होती. मग राज निदिमोरू अजूनही श्यामलीशी विवाहित आहे का? असा सवालही तिने उपस्थित केला होता.

भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.