लेकीचा घटस्फोट जिव्हारी लागला;समांथाच्या वडिलांनी तिचे अन् नागाचैतन्यच्या लग्नाचे फोटोही केले होते शेअर

प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू यांच्या वडिलांचे निधन झाले आहे. समांथाने सोशल मीडियावर या दुःखद बातमी शेअक केली. तिच्या वडिलांच्या जाण्याने ती पुरती खचल्याचे दिसून येत आहे. तसेच तिच्या वडिलांना तिची काळजी वाटायची हे समांथाने अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं होतं. कारण तिचा घटस्फोट हा त्यांच्या फार जिव्हारी लागला होता. तिने आणि नागाचैतन्यने पुन्हा एकत्र यावं अशी त्यांची इच्छा होती.

लेकीचा घटस्फोट जिव्हारी लागला;समांथाच्या वडिलांनी तिचे अन् नागाचैतन्यच्या लग्नाचे फोटोही केले होते शेअर
Follow us
| Updated on: Nov 30, 2024 | 1:06 PM

अभिनेत्री समांथा रुथ प्रभूच्या वडीलांचे काल म्हणजे 29 नोव्हेंबर 2024 रोदी निधन झाले .वडील जोसेफ प्रभू यांचे निधन झाल्याची दुःखद बातमी समांथाने सोशल मीडियावर शेअर केली आहे. समांथाला तिच्या वडिलांच्या निधनामुळे नक्कीच मोठा धक्का बसला आहे. वडिलांच्या निधनानंतर समांथाने पोस्ट शेअर करत “पुन्हा भेट होईपर्यंत बाबा…” असं लिहित तुटलेल्या हृदयाचा इमोजी टाकला आहे.

वडिलांच्या निधनामुळे समांथा मात्र पुरती खचल्याचे पाहायला मिळत आहे. समांथाना ही बातमी शेअर करताच नेटकऱ्यांकडून तिच्यासाठी पोस्ट येऊ लागल्या. वडिलांचाही लेकीवर फार जीव होता. तसेच समांथाचे वडील तिच्या घटस्फोटाच्या घटनेमुळे फार नाराज होते. चाहत्यांप्रमाणे त्यांच्यासाठीही समांथाचा घटस्फोट हा एक धक्काच होता.

लेकीचा घटस्फोट वडिलांच्या फार जिव्हारी लागला होता

ऑक्टोबर 2021 मध्ये समांथा आणि नागा चैतन्य हे विभक्त झाले. पण तिच्या वडिलांना हे स्विकारायला फार वेळ लागला. तसेच घटस्फोट झाल्यानंतर त्यांनी जवळपास एक वर्षानंतर समांथा आणि नागा चैतन्य यांच्या लग्नातील काही जुने फोटो फेसबुकवर शेअर करत याबद्दल खंत व्यक्त केली होती.

लेकीचा घटस्फोट त्यांना फारच मनाला लागला होता. तसेच समांथा आणि नागा चैतन्यने सगळं विसरून पुन्हा एकत्र येत नवीन अध्याय सुरू करावा अशी त्यांनी आशाही व्यक्त केली होती. या इच्छेमध्ये त्यांचे लेकीवरचे प्रेम आणि काळजी नक्किच दिसत होती. चाहत्यांप्रमाणे समांथाच्या वडिलांचीदेखील इच्छा अपूर्णच राहिली आहे. समांथाच्या वडिलांच्या निधनाच्या बातमीनंतर चाहते मात्र तिला आधार देताना दिसतायत.

समांथा वडिलांच्या अन् तिच्या नात्याबद्दल नेहमी भरभरून बोलायची

समांथाचे वडील, हे तेलुगू अँग्लो-इंडियन होते. समांथाच्या आयुष्यात आणि तिच्या जडणघडणीत तिच्या वडिलांचा मोठा वाटा होता. समांथा तिच्या वडिलांबद्दल नेहमीच भरभरून बोलत असे. मनोरंजन क्षेत्रातील प्रवासात त्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल ती नेहमी कृतज्ञता व्यक्त करायची. तसेच तिने एका मुलाखती दरम्यान तिच्या वडिलांशी असलेल्या नात्याबद्दल वक्तव्य केले होते. एका माध्यमाला दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या वडिलांबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या होत्या.

शिंदेंच्या आमदारानं घेतली शपथ पण एकही शब्द वाचता आला नाही?
शिंदेंच्या आमदारानं घेतली शपथ पण एकही शब्द वाचता आला नाही?.
'रवी राणाही आमदारकीचा राजीमाना देतील', नवनीत राणांचं विरोधकांना आव्हान
'रवी राणाही आमदारकीचा राजीमाना देतील', नवनीत राणांचं विरोधकांना आव्हान.
'...हा म्हणजे संविधानाचा अवमान', चंद्रशेखर बावनकुळेंचा 'मविआ'वर घणाघात
'...हा म्हणजे संविधानाचा अवमान', चंद्रशेखर बावनकुळेंचा 'मविआ'वर घणाघात.
निकालानंतर खासगी संस्थेकडून सर्व्हेक्षण, 'सामना'तून थेट आकडेच प्रसिद्ध
निकालानंतर खासगी संस्थेकडून सर्व्हेक्षण, 'सामना'तून थेट आकडेच प्रसिद्ध.
'मी असताना राज ठाकरेंची गरज काय? त्यांना महायुतीत घेतल्यानं नुकसानच..'
'मी असताना राज ठाकरेंची गरज काय? त्यांना महायुतीत घेतल्यानं नुकसानच..'.
'मारकडवाडीचा खरा मास्टर माईंड तर...', राम सातपुतेंनी थेट घेतलं नाव
'मारकडवाडीचा खरा मास्टर माईंड तर...', राम सातपुतेंनी थेट घेतलं नाव.
मनसे कार्यकर्ते ठाकरेंकडे येताच उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोमणा
मनसे कार्यकर्ते ठाकरेंकडे येताच उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोमणा.
राहुल नार्वेकर हेच पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष, बिनविरोध होणार निवड
राहुल नार्वेकर हेच पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष, बिनविरोध होणार निवड.
EVMवर निवडून आलेल्या मविआच्या सर्वांनी राजीनामा द्या, कोणाचं वक्तव्य?
EVMवर निवडून आलेल्या मविआच्या सर्वांनी राजीनामा द्या, कोणाचं वक्तव्य?.
'सांगा काय चुकल?,' फडणवीसांच्या 'त्या' सल्ल्यावर शरद पवारांचा थेट सवाल
'सांगा काय चुकल?,' फडणवीसांच्या 'त्या' सल्ल्यावर शरद पवारांचा थेट सवाल.