AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आर्यन खानच्या सीरिजविरोधात समीर वानखेडेंची कोर्टात धाव; नेमकं काय आहे प्रकरण?

समीर वानखेडेंनी आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' या सीरिजविरोधात दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे. नेटफ्लिक्स आणि रेड चिलीज यांच्याविरोधात त्यांनी याचिका दाखल केली आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे, ते जाणून घेऊयात..

आर्यन खानच्या सीरिजविरोधात समीर वानखेडेंची कोर्टात धाव; नेमकं काय आहे प्रकरण?
Sameer Wankhede and Aaryan KhanImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 25, 2025 | 3:25 PM
Share

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानने ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ या सीरिजद्वारे करिअरची सुरुवात केली. आर्यन खान दिग्दर्शित ही सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ही सीरिज प्रदर्शित होताच त्यातील एका दृश्याची सोशल मीडियावर तुफान चर्चा झाली. यामध्ये समीर वानखेडेंसारखी एक भूमिका दाखवण्यात आली आहे. ही भूमिका साकारणारा अभिनेतासुद्धा हुबेहूब वानखेडेंसारखाच दिसतोय. समीर वानखेडे यांनी कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्जप्रकरण आर्यन खानला अटक केली होती. या प्रकरणात आर्यनला जवळपास महिनाभर तुरुंगात राहावं लागलं होतं. त्यानंतर त्याला क्लीन चिट मिळाली. आता ‘बॅड्स ऑफ बॉलिवूड’मध्ये दाखवलेली नक्कल पाहून समीर वानखेडेंनी थेट कोर्टात धाव घेतली आहे.

आर्यन खानच्या ‘बॅड्स ऑफ बॉलिवूड’ या सीरिजवर कायमस्वरुपी बंदी घालण्याच्या मागणीसाठी वानखेडेंनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आर्यन खान दिग्दर्शित 8 भागांची ही सीरिज 18 सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली होती. समीर यांनी त्यांच्या याचिकेत असा आरोप केला आहे की सीरिजमधील एक विशिष्ट दृश्यातून त्यांची खिल्ली उडवण्यात आली आहे. ‘बॅड्स ऑफ बॉलिवूड’च्या पहिल्या भागातच ड्रग्जविरोधात आवाज उठवणारा एक अधिकारी दाखवण्यात आला आहे, जो हुबेहूब समीर वानखेडेंसारखाच दिसतो. ‘वॉर अगेन्स्ट ड्रग्ज’ आणि ‘एनसीजी’चा भाग असल्याचा दावा करत तो बॉलिवूडच्या एका पार्टीत छापा टाकतो. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये कशा पद्धतीने ड्रग्जचा वापर होतो, याविषयी तो ओरडतो. या सर्व गोष्टींचा उल्लेख समीर वानखेडे आणि त्यांनी आर्यनविरोधात केलेल्या कारवाईशी संबंधित असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी दिल्या होत्या. यावरून बरेच मीम्ससुद्धा व्हायरल झाले होते.

ऑक्टोबर 2021 मध्ये समीर वानखेडे यांनी त्यांच्या टीमसोबत कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकला होता. या छाप्यात एनसीबीने क्रूझमधून 13 ग्रॅम कोकेन, पाच ग्रॅम मेफेड्रॉन, 21 ग्रॅम गांजा, MDMAच्या 22 गोळ्या आणि रोख 1.33 लाख रुपये जप्त केले होते. एनसीबीने 14 जणांना रोखलं होतं आणि काही तासांच्या चौकशीनंतर 3 ऑक्टोबर रोजी दुपारी आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुम धामेचा यांना अटक केली होती.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?