AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समृद्धी केळकरने शेतातील 40 फूट खोल विहिरीत मारली उडी; पोटात आला मोठ्ठा गोळा

समृद्धी केळकरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ती विहिरीत उडी मारताना दिसून येत आहे. मालिकेच्या एका सीनसाठी तिने चक्क 40 फूट खोल विहिरीत उडी मारली आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

समृद्धी केळकरने शेतातील 40 फूट खोल विहिरीत मारली उडी; पोटात आला मोठ्ठा गोळा
समृद्धी केळकरImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 09, 2025 | 1:16 PM
Share

स्टार प्रवाह वाहिनीवर नुकत्याच सुरु झालेल्या ‘हळद रुसली कुंकू हसलं’ या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. मालिकेतल्या प्रत्येक कलाकाराचं कौतुक होताना दिसतंय. या मालिकेतील जिगरबाज कृष्णा प्रेक्षकांना विशेष भावतेय. कृष्णाने तिची लाडकी गाय स्वातीला वाचवण्यासाठी एक धाडसी निर्णय घेतला आहे. शेतातल्या विहिरीत स्वाती पडल्याचं कळताच मागचा पुढचा कोणताही विचार न करता कृष्णाने या विहिरीत उडी मारली. मालिकेतला हा अतिशय कठीण प्रसंग कृष्णा म्हणजेच अभिनेत्री समृद्धी केळकरने जिद्दीने पूर्ण केला.

या अनुभवाविषयी सांगताना समृद्धी म्हणाली, “मला पोहायला येतं. मात्र इतक्या खोल पाण्यात मी कधीही उतरले नव्हते. या सीनविषयी कळताच तो कसा शूट होणार याची उत्सुकता होती. अखेर शूटचा तो दिवस उजाडला. कोल्हापुरातल्या एका शेतातल्या 40 फूट खोल विहिरीत उडी मारण्याचा सीन होता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे एका टेकमध्ये हा सीन पूर्ण करायचा होता. मी कोणताही बॉडी डबल न वापरता हा सीन करण्याचं ठरवलं होतं.”

“मनाची तयारी केली आणि मी विहिरीत उडी मारली. हा अनुभव मी कधीही विसरणार नाही. मालिकेच्या संपूर्ण टीमने यासाठी खूप मेहनत घेतली आणि माझी काळजीही घेतली. दोन पट्टीचे पोहणारे विहिरीत माझ्यासोबत होते. मला धाडसी प्रयोग करायला नेहमीच आवडतं. या सीननंतर माझा आत्मविश्वास द्विगुणीत झाला आहे असंच म्हणेन,” असं ती म्हणाली.

या सीनचा एक व्हिडीओसुद्धा तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओचं कॅप्शनसुद्धा तिने कृष्णाच्याच अंदाजात लिहिलंय. ‘त्ये कसाय माहित्ये का? इहिरीत उडी मारायची आहे कळल्यानंतर पोटात मोठ्ठा गोळा आला. पन कृष्णेच्या कोल्हापूरी छातीतलं बळ जागं झालं अन् आई अंबाबाईचं नाव घेऊन अस्सल शेतातल्या 30-40 फूट खोल इहिरीत मारली उडी! पार इषय हार्ड करून टाकला. भीतीने पाय मागं घेतला.. म्या न्हाय! वन टेक होता ओ. अख्ख्या टिमचा फुल्ल सपोर्ट,’ असं तिने म्हटलंय. ‘हळद रुसली कुंकू हसलं’ या मालिकेत समृद्धी केळकरसोबत अभिषेक रहाळकर मुख्य भूमिकेत आहे. ही मालिका दुपारी 1 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

Follow Us
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल