मुलाच्या संगोपनाची काळजी… डोळे भरून येतील अशी सानियाची पोस्ट, घटस्फोटानंतर…
Sania Mirza Post : सानिया मिर्झा ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. सानिया मिर्झा हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. सानिया मिर्झा हिच्या खासगी आयुष्यामध्ये मोठे वादळ आल्याचे बघायला मिळतंय. सानिया मिर्झा हिच्या पतीने तिसऱ्यांदा निकाह केलाय.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सानिया मिर्झा ही सतत चर्चेत आहे. सानिया मिर्झा हिच्या आयुष्यामध्ये मोठे वादळ आल्याचे बघायला मिळतंय. 14 वर्षांनंतर सानिया मिर्झा हिचे लग्न तुटले आहे. सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांचा निकाह हैद्राबाद येथे 2010 मध्ये झाला. अत्यंत शाही थाटात यांचा निकाह पार पडला. सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांना एक मुलगा देखील आहे. सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा घटस्फोट होणार असल्याची चर्चा सतत रंगताना दिसली.
अचानकपणे शोएब मलिक याने त्याच्या सोशल मीडियावर त्याच्या तिसऱ्या निकाहचे फोटो शेअर केले. ज्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. शोएब मलिक याने पाकिस्तानी अभिनेत्री सना खान हिच्यासोबत लग्न केले. नुकताच सानिया मिर्झा ही मुंबईमध्ये एका शोमध्ये स्पाॅट झाली. पापाराझी यांना फोटोसाठी खास पोझ देताना देखील सानिया मिर्झा दिसली. ज्याचे फोटो व्हायरल झाले.
आता नुकताच सानिया मिर्झा हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीये. या पोस्टमध्ये सानिया मिर्झा ही थेट पालनपोषणावर बोलताना दिसलीये. शोएब मलिक याच्यासोबत घटस्फोट घेणे सानिया मिर्झा हिच्यासाठी नक्कीच सोपे नव्हते. शोएब मलिक याचे विवाहबाह्य संबंध असल्यामुळेच सानिया मिर्झा हिने घटस्फोट घेतल्याचे सांगितले जाते.

सानिया मिर्झाने तिच्या इंस्टा स्टोरीवर पोस्ट शेअर करत म्हटले की, जेंव्हा एक झपकी घेता तेंव्हा 8 वर्षांचे होता, त्यानंतर 28 वर्षांचे होता. त्यानंतर तुम्ही थेट पालक होता. त्यांना बेडवर चढू द्या. त्यानंतर ते गाणे म्हणतील. ते ज्यांनी 10 वेळा निवेदन दिले. जेंव्हा ते तुम्हाला गळ्याला लावतात, तेंव्हा त्यांना जोरात पकडा.
बऱ्याच वेळा मुलांचे संगोपन करताना डोक्यावर जास्त जोर पडतो. पण तुम्हाला तुमची आत्मा मिळते का? अशी थेट एक पोस्ट सानिया मिर्झा हिने सोशल मीडियावर शेअर केली आहे. सानिया मिर्झा या पोस्टमध्ये खूप जास्त भावूक झाल्याचे दिसत आहे. सानिया मिर्झा ही तिच्या मुलाचे संगोपन करत आहे. सानिया मिर्झाचा मुलगा पाच वर्षांचा आहे. आता सानिया मिर्झाची ही पोस्ट तूफान चर्चेत आहे.
