AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वासराने बिलगावं गायीला तशीच मुलाची सानियाला घट्ट मिठी, फोटो पाहून काळजात नक्कीच कालवाकालव होईल

टेनिस स्टार सानिया मिर्झाचा घटस्फोट गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. अशातच तिने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. वासराने गायीला बिलगावं तशीच मुलाने सानियाला घट्ट मिठी मारली आहे. या फोटोवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होतोय.

वासराने बिलगावं गायीला तशीच मुलाची सानियाला घट्ट मिठी, फोटो पाहून काळजात नक्कीच कालवाकालव होईल
Sania MirzaImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 17, 2024 | 3:39 PM
Share

मुंबई : 17 फेब्रुवारी 2024 | भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत आहे. पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब मलिक याने तिसऱ्या निकाहचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत सर्वांना मोठा धक्का दिला होता. त्यानंतर सानियाच्या कुटुंबीयांकडून स्पष्ट करण्यात आलं की तिने शोएबला ‘खुला’ (इस्लाममधील घटस्फोट) दिला आहे. घटस्फोटानंतर सानियाची प्रत्येक सोशल मीडिया पोस्ट नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. असाच एक फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तिचा आणि शोएबचा मुलगा इझहान आईला घट्ट मिठी मारताना दिसत आहे.

सानियाने पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये दोन लहान मुलं तिला बिलगून घट्ट मिठी मारताना दिसत आहेत. त्यापैकी एक हा सानिया आणि शोएबचा मुलगा इझहान आहे. या फोटोला तिने ‘लाइफलाइन्स’ असं कॅप्शन दिलं आहे. एखाद्या वासराने गायीला बिलगावं तशीच ही दोन्ही मुलं सानियाला बिलगली आहे. सानियाने पोस्ट केलेला हा फोटो फार भावूक असल्याचं नेटकरी म्हणत आहेत. अनेकांनी कमेंट करत तिला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. ‘तू फक्त स्ट्राँग खेळाडूच नाही तर स्ट्राँग भारतीय महिलासुद्धा आहेस’, असं एकाने म्हटलंय. तर ‘घटस्फोटाचा परिणाम निरागस मुलांनाही भोगावा लागतो’, असं दुसऱ्या युजरने लिहिलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Sania Mirza (@mirzasaniar)

शोएबला खुला दिल्यानंतर सानिया तिच्या मुलासह भारतात परतली आहे. नुकतीच तिने कोलकातामधील एका कार्यक्रमातही हजेरी लावली होती. शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांनी 2010 मध्ये हैदराबादमध्ये मुस्लीम पद्धतीने निकाह केला होता. त्यानंतर पाकिस्तानमधील सियालकोटमध्ये वलिमा पार पडला होता. लग्नाच्या आठ वर्षांनंतर सानियाने मुलाला जन्म दिला. सानिया आणि शोएबचा मुलगा इझहान आता पाच वर्षांचा आहे. शोएबच्या विवाहबाह्य संबंधांना वैतागून सानियाने त्याला ‘खुला’ दिला, असं म्हटलं जात आहे. शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी निकाह केला आहे.

शोएब आणि सना हे गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. याविषयी पाकिस्तानी पत्रकार नईम हनिफने एका पॉडकास्टमध्ये सांगितलं, “एका टेलिव्हिजन रिॲलिटी शोदरम्यान सना आणि शोएब यांची पहिल्यांदा भेट झाली होती. या शोदरम्यान दोघांची खूप चांगली मैत्री झाली आणि हळूहळू या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. त्यानंतर शोएब जेव्हा कधी टीव्हीवर यायचा, तेव्हा तो सनालाही सोबत आणण्याबद्दल आग्रह करायचा.”

Follow Us
शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा
Sanjay Raut | शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा...
Rain Update | महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी
ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का?
Sanjay Raut | ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का? तृणमूल-राष्ट्रवादीचा दाखला देत राऊतांनी आयोगाला सुनावलं
शरद पवारांचं फडणवीसांना पत्र; राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग
Sharad Pawar | शरद पवारांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र; राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये दीपोत्सव, विशेष प्रार्थना
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा...
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा पलटवार!
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या...
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या देखाव्याने वेधलं लक्ष