AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लहान मुलांच्या गाडीत बसलेली चिमुकलीच नंतर बनली संजय दत्तची पत्नी; दोघांमध्ये 20 वर्षांचं अंतर

संजय दत्तचं आयुष्य अनेक वाद आणि आव्हानांनी भरलेलं असलं, तरी मान्यतासोबतच्या नात्याने त्याला स्थैर्य दिल्याचं तो म्हणाला. या दोघांच्या वयात तब्बल वीस वर्षांचं अंतर आहे.

लहान मुलांच्या गाडीत बसलेली चिमुकलीच नंतर बनली संजय दत्तची पत्नी; दोघांमध्ये 20 वर्षांचं अंतर
Sanjay DuttImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 09, 2026 | 12:00 PM
Share

Sanjay Dutt: बॉलिवूडचा ‘मुन्नाभाई’ अर्थात अभिनेता संजय दत्त याचं वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहिलं आहे. त्याच्या चित्रपटांपासून ते प्रेमसंबंध, लग्न आणि आयुष्यातील कठीण प्रसंगांपर्यंत अनेक गोष्टी चाहत्यांसाठी उत्सुकतेचा विषय ठरल्या आहेत. आता संजय दत्तने पत्नी मान्यता दत्तसोबतच्या नात्याबद्दल एक खास खुलासा केला आहे. मान्यता माझ्यापेक्षा तब्बल 20 वर्षांनी लहान असल्याचं सांगतानाच, तिने त्याला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा ती लहान बाळ होती आणि प्रॅममध्ये (बाळाची गाडी) होती, अशी आठवण संजूबाबाने सांगितली. त्याच्या या वक्तव्यामुळे दोघांच्या वयातील अंतर आणि प्रेमकहाणी पुन्हा चर्चेत आली आहे.

मान्यता- संजय दत्त यांच्यात 20 वर्षांचं अंतर

संजय दत्तने अलीकडेच एका मुलाखतीत त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मनमोकळेपणाने संवाद साधला. यावेळी त्याने मान्यता दत्तसोबतच्या नात्याबद्दलही सांगितलं. तो म्हणाला, “मान्यताने मला सांगितलं होतं की, तिने मला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा ती प्रॅममध्ये (लहान बाळाची गाडी) होती. आम्हा दोघांच्या वयात जवळपास वीस वर्षांचं अंतर आहे.” मात्र, वयातील हे अंतर त्यांच्या नात्यात अडथळा ठरलं नाही. एकमेकांना समजून घेताना आणि एकत्र आयुष्य जगण्याचा निर्णय घेताना त्यांचं नातं अधिक घट्ट झालं. काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. फेब्रुवारी 2008 मध्ये संजय आणि मान्यता विवाहबंधनात अडकले. आज दोघंही आपल्या संसारात आनंदी असून, त्यांचं नातं अनेकदा चर्चेत असतं.

पहा फोटो-

View this post on Instagram

A post shared by Sanjay Dutt (@duttsanjay)

संजय दत्तच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. व्यसनाधीनतेशी संघर्ष, कायदेशीर अडचणी आणि तुरुंगवास अशा कठीण प्रसंगांचा त्याला सामना करावा लागला. मात्र, या काळात मान्यता त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. संजयने तिच्या या साथीबद्दल या मुलाखतीत कौतुक केलं आहे. त्याने मान्यताची तुलना त्याची आई आणि दिवंगत अभिनेत्री नरगिस दत्त यांच्याशी केली. आईनंतर कठीण प्रसंगांत खंबीरपणे साथ देणारी व्यक्ती म्हणजे मान्यता असल्याचं त्याने सांगितलं. तुरुंगवासाच्या काळातही तिने कुटुंबाची जबाबदारी सांभाळली आणि त्याला मानसिक आधार दिला.

संजय दत्त आणि मान्यता यांना दोन मुलं आहेत. तर संजयची पहिली पत्नी रिचा शर्मा हिच्यापासून त्याला त्रिशला ही मुलगी आहे. त्रिशलासोबतच्या नात्याबद्दलही संजयने भाष्य केलं आहे. काही काळ त्यांच्यात अंतर निर्माण झालं होतं; मात्र आता त्यांचं नातं सुधारत असल्याचं त्याने सांगितलं. आपल्या मुलीचा अभिमान वाटत असल्याची भावनाही त्याने व्यक्त केली.

Follow Us
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वपक्षीय नेते एकवटले; ठाण्यात आज....
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वपक्षीय नेते एकवटले; ठाण्यात आज मोर्चा निघणार
राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; इंडिया आघाडीत मोठ्या घडामोडी
Rahul Gandhi : राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; इंडिया आघाडीत मोठ्या घडामोडी - सूत्र
नाना पाटेकर यांच्या निधन प्रकरणी मोठी अपडेट समोर; गोवा पोलिसांकडून....
Nana Patekar : नाना पाटेकर यांच्या निधन प्रकरणी मोठी अपडेट समोर; गोवा पोलिसांकडून....
मुंबईकरांनो, उकाड्यासाठी तयार राहा; ऑक्टोबरमध्ये तापमान 37.6 अंशांवर
Mumbai Heat Wave : मुंबईकरांनो, उकाड्यासाठी तयार राहा; ऑक्टोबरमध्ये तापमान 37.6 अंशांवर, हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी
केंद्रीय पथक आज शेतीच्या बांधावर; दुष्काळी स्थितीचा अहवाल थेट.....
Maharashtra Drought : केंद्रीय पथक आज शेतीच्या बांधावर; दुष्काळी स्थितीचा अहवाल थेट दिल्लीत पाठवणार
महापौरांच्या प्रसिद्धीसाठी जनतेच्या पैशांतून 25 लाख? महापालिकेच्या....
Mumbai Ritu Tawade : महापौरांच्या प्रसिद्धीसाठी जनतेच्या पैशांतून 25 लाख? मुंबई महापालिकेच्या प्रस्तावावरून वाद 
सोने-चांदीच्या आयातीवर तब्बल एवढे टक्के कर लागू होणार
Gold-Silver : सोने-चांदीच्या आयातीवर तब्बल एवढे टक्के कर लागू होणार; सरकारच्या निर्णयाचा नेमका अर्थ काय?
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाना यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं
Nana Patekar Passes Away : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं