‘तिच्या आई-वडिलांमुळे आमचा संसार उद्ध्वस्त…’, घटस्फोटावर संजूबाबाचं मोठं वक्तव्य
Sanjay Dutt on Divorce: 'तिच्या आई-वडिलांमुळे आमचा संसार उद्ध्वस्त...', गंभीर आजारात संजूबाबाने सोडली बायकोची साथ? घटस्फोटावर संजय दत्तचं मोठं वक्तव्य, अभिनेत कायम खासगी आयुष्यामुळे असते चर्चेत

Sanjay Dutt: अभिनेता संजय दत्त याने जवळपास 308 महिलांना डेट केलं. तर अभिनेता एक दोन नाही तर तीन वेळा विवाहबंधनात अडकला. आता संजूबाबा तिसरी पत्नी मान्यता आणि जुळ्यामुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. पण एक काळ असा देखील होता, जेव्हा संजूबाबाने खाजगी आयुष्यात अनेकदा चढ – उतारांचा सामना केला. संजूबाबाच्या पहिल्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याचं पहिलं लग्न 1987 मध्ये आभिनेत्री ऋचा शर्मा हिच्यासोबत झालं होतं.
लग्नाच्या एक वर्षानंतर ऋचा शर्मा हिने गोंडस मुलीला जन्म दिला. पण मुलीच्या जन्मानंतर संजूबाबाच्या खासगी आयुष्यात वादळ आलं. ऋचा शर्मा हिला ब्रेट ट्यूमरचं निदान झालं. त्यानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि दोघाचं घटस्फोट झाला.
View this post on Instagram
दोघांच्या घटस्फोटाचं कारण कोणाला देखील समजलं नाही. पण असं म्हणतात की, ऋचा हिला गंभीर आजाराची लागण झाल्यानंतर संजय दत्तने पत्नीला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. पण एका मुलाखतीत संजूबाबाने स्वतःवर झालेले सर्व आरोप फेटाळले.
अभिनेता म्हणाला, ‘या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. मी असा पुरुष नाही की, स्वतःच्या बायकोवर प्रेम करणं बंद करेल. तिच्या कठीण काळात तिला सोडून जाईल. हे आरोप फक्त आणि फक्त माझं मत समोर आणण्यासाठी करण्यात आले. मी ज्या प्रकारे ऋचाला धैर्य दिला तसं तिला कोणीच देवू शकलं नसतं…’
‘आमच्या लग्नाचा, नात्याचा अंत झाला आहे. आम्ही आता पुन्हा एकत्र नाही राहू शकत. माझ्या मनात ऋचाबद्दल कोणतीच वाईट भावना नाही. पण तिच्या आई – वडिलांनी आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. ते आमच्या नात्यात सतत दखल द्यायचे. त्यांनी मझ्यावर अनेक आरोप लावले.’
फक्त ऋचाच्या आई – वडिलांनी नाही तर, तिच्या बहिणीने देखील अभिनेत्यावर गंभीर आरोप केले. ‘ऋचाच्या बहिणीमुळे देखील आमच्या नात्यात कटूपणा आला. जे काही होतं ते नवऱ्या – बायकोमधील होतं, ती कोण होती आमच्या दोघांमध्ये बोलणारी?’ असं देखील अभिनेता म्हणाला होता.
