Pahalgam Terror Attack: शाल विक्रेते, घोडेस्वार आणि दहशतवादी यांच्यात थेट कनेक्शन, शुभम द्विवेदी यांच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा
Pahalgam Terror Attack: शुभम द्विवेदी यांच्या पत्नीचा धक्कादायक दावा, सूट, शाल विक्रेते, घोडेस्वार यांचा पहलगाम हल्ल्या मोठा वाटा, दहशतवाद्यांना शस्त्रे कोणी पुरवली? संशयिताबद्दलही मोठा खुलासा

Pahalgam Terror Attack: जम्मू – काश्मीर येथील पहलगाम याठिकाणी 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांनी आपले प्राण गमावले. या भयानक हल्ल्यानंतर देशात संतापाची लाट उसळलेली असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तान विरोधात कठोर निर्णय घेतले आहेत. सांगायचं झालं तर, हल्ल्यात दशतवाद्यांनी पर्यटकांना हिंदू आहे की मुस्लिम असा प्रश्न विचारला आणि हिंदू पर्यकटांची गोळ्या झाडून हत्या केली. यामध्ये कानपूर येथील शुभम द्विवेदी यांची देखील हत्या करण्यात आली. हल्लानंतर शुभम यांची पत्नी एशान्या यांनी हल्ल्याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. तेथे असलेले दहशतवादी एके-47 घेवून आले नव्हते, तर त्यांनी तेथे शस्त्रे पुरवण्यात आली होती…असा दावा देखील त्यांनी केला.
नुकताच झालेल्या मुलाखतीत एशान्या म्हणाल्या, त्यांचे दिवंगत पती शुभमने घोड्याच्या मालकाला विचारलं की वर नेटवर्क आहे की नाही, तो म्हणाला की पूर्ण नेटवर्क आहे. जर त्याने नेटवर्क नाही म्हणून सांगितलं असतं तर आम्ही तेथे गेलेच नसतो. हल्ला झाला नव्हता तोपर्यंत आम्ही काश्मीरमध्ये सुरक्षित होतो. आम्हाला काश्मीर सुरक्षित वाटत होता…
दहशतवाद्यांना शस्त्रे पुरवण्यात आली…
एशान्या म्हणाल्या, ‘थोड्या अंतारावर आम्हाला भारतीय सेनेतील जवान दिसत होते त्यामुळे आजूबाजूच्या लोकांवर आम्हाला संशय आलाच नाही. आता मला लक्षात येत आहे ती, तेथील लोकं विचारत होती, तुमच्यासोबत कोण कोण आहे. त्या लोकांनी साधे कपडे म्हणजे जिन्स घातली होती. त्यांच्याकडे कोणतेच शस्त्र नव्हते. दहशतवाद्यांना शस्त्रे पुरवण्यात आली. तेथे जी लोकं शूट, शॉल विकत होते त्यांनीच दहशतवाद्यांना शस्त्रे पुरवली असावीत… असं मला वाटत आहे.’
‘एक माणूस तिथे एकटाच मेंढ्या चरत होता. तो इतक्या मोठ्या शेतात एकटाच मेंढ्या चरत होता. ज्याला काहीच अर्थ नव्हता. मला माहित नाही की तो संशयास्पद होता की नाही, पण त्याने पूर्णपणे झाकलेले कपडे घातले होते. कोणास ठाऊक, तो कपड्यांमध्ये काहीतरी लपवत असेल?”
पुढे एशान्या म्हणाल्या, ‘आमचे कुटुंबिय वर जाण्यासाठी घाबरत होते. पण घोडेस्वारने सांगितलं पठारावर फार सुंदर वातावरण आहे. यामुळे घोडे मालकासोबत आमचे वाद देखील झाले. माझे सासरे त्याला म्हणाले, हवं तर तू पूर्ण पैसे घे… पण आम्ही पठारावर जाणार नाही… तेव्हा तो म्हणू लागला पैशांची गोष्ट काहीही नाही. जवळपास 10 मिनिटं वाद झाल्यानंतर आम्ही पठारावर गेलो…’ अशी सत्य परिस्थिती एशान्या यांनी सांगितली आहे.
