लता दीदींचं ‘ते’ गाणं, ज्यांमुळे असंख्य लोकांनी आत्महत्येचा निर्णय घेतला मागे, 57 वर्षांनंतरही प्रसिद्ध
Lata Mangeshkar Song: लता दीदींच्या 'त्या' एका गाण्यामुळे वाचले अनेकांचे प्राण, आयुष्याच्या एका टप्प्यावर अनेकांनी दीदींचं गाणं ऐकून आत्महत्येचा निर्णय घेतला मागे... आज 57 वर्षांनंतरही लोकं ऐकतात गाणं

Lata Mangeshkar Song: भारतरत्न, गानकोकिळा, गाणसम्राज्ञी अशी अनेक विशेषणं कमी पडतील अशा लता मंगेशकर आज आपल्यात नाही. पण लता दीदींनी त्यांच्या आवाजातून, त्यांच्या गाण्यांमधून अनेकांना जगण्यासाठी नवी उमेद दिली. असंख्य सिनेमांसाठी लता दीदी यांनी गाणी गायली आहेत. सिनेमात गाणी महत्त्वाची भूमिका बजावतात. काहींनी सॅड सॉन्ग ऐकायला आवडतात. तर अनेकांनी रोमँटिक गाणी ऐकायला आवडतात. पण लता दीदींनी असं एक गाणं गायलं होतं, ज्यामुळे अनेकांनी आत्महत्या करण्याचा निर्णय देखील मागे घेतला होता.
सध्या ज्या सिनेमातील गाण्याची चर्चा रंगली आहे, तो सिनेमा 1968 मध्ये प्रदर्शित झाला होता आणि सिनेमाचं नाव ‘सरस्वतीचंद्र’ होतं. सिनेमात नूतनने कुमुद सुंदरीची भूमिका साकारली होती तर मनीषने सरस्वतीचंद्राची भूमिका साकारली होती.
सिनेमाचं दिग्दर्शन गोविंद सरैया यांनी केलं होते. सरस्वतीचंद्र सिनेमाची कथा लोकप्रिय गुजराती लेखक गोवर्धनराम माधवराम त्रिपाठी यांच्या कादंबरीवर आधारित होती. हा त्या काळातील एक उत्तम सिनेमा ठरला ज्याचा लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम झाला.
सिनेमातील गाण्यांनी प्रेक्षकांना सर्वात जास्त भावनिक केलं. त्यात एक गाणं होतं, ‘छोड दे सारी दुनिया किसी के लिए’, जे लोकांच्या जीवनात खूप महत्वाचं ठरलं. हे गाणं दिवंगत पार्श्वगायिका आणि कोकिळा लता मंगेशकर यांनी गायलं होतं.
त्या काळात प्रेमात अडकलेल्या आणि वेगळे झालेल्यांसाठी हे गाणे एक मोठा आधार बनलं. हे गाणं ऐकल्यानंतर लोकांना वाटलं की कोणीतरी आहे जे त्यांचे दुःख समजून घेत आहे. रिपोर्टनुसार हे गाणं ऐकल्यानंतर आत्महत्या करणाऱ्यांनी देखील स्वतःचा विचार बदलला आणि नव्या आयुष्याची सुरुवात केली.
लता दीदी यांनी बॉलिवूडमध्ये अनेक सिनेमांसाठी गायन केलं. सोशल मीडियावर आजही दीदी यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. आज दीदी आपल्यात नसल्या तरी, आयुष्यात कितीही संकटं आली तरी पुढे चालत राहायचं… हे दीदी यांनी शिकवलं आहे. सांगायचं झालं तर, एका कलाकाराचं निधन कधीच होत नाही. कलाकाराची कला कायम जिवंत असते. लतादीदी देखील त्यांच्या संगीताच्या माध्यमातून प्रत्येक भारतीयाच्या मनात जिवंत आहेत.
