AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सतत शांत दिसणारी सारा तेंडुलकर पापाराझींवर भडकली, सर्वांसमोर म्हणाली ‘घाणेरडे…’

सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सध्या पापाराझींवर संतापल्याची बातमी समोर आली आहे. ज्यामध्ये तिच्या वहिनीच्या व्हिडीओ लिहिलेल्या कॅप्शनमुळे तिने चांगलेच पापाराझींना सुनावले आहे.

सतत शांत दिसणारी सारा तेंडुलकर पापाराझींवर भडकली, सर्वांसमोर म्हणाली 'घाणेरडे...'
| Updated on: May 21, 2026 | 6:30 PM
Share

क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर यांची मुलगी सारा तेंडुलकर तिच्या सौंदर्यासोबतच शांत आणि संयमी स्वभावासाठी ओळखली जाते. मात्र यावेळी पापाराझींच्या एका कृतीमुळे तिचा संताप अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्टमुळे सारा तेंडुलकरने पापाराझींना सार्वजनिकरित्या चांगलेच सुनावले आहे.

गेल्या काही काळात पापाराझी अनेकदा सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्यात अति हस्तक्षेप करत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. विशेषतः अभिनेत्री आणि महिला सेलिब्रिटींशी संबंधित व्हिडिओंवर आक्षेपार्ह किंवा बॉडी-शेमिंग करणारे कॅप्शन देण्याचे प्रकार वाढले आहेत. याआधीही अनेक अभिनेत्रीांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती.

अशातच एका पापाराझी अकाउंटने सारा तेंडुलकर आणि तिची वहिनी सानिया चंडोक यांचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला. या व्हिडिओसोबत वापरण्यात आलेले कॅप्शन अत्यंत आक्षेपार्ह आणि बॉडी-शेमिंग करणारे असल्याचे सांगितले जात आहे. ही पोस्ट पाहताच सारा संतापली आणि तिने थेट इंस्टाग्राम स्टोरीवर त्या अकाउंटला टॅग करत जोरदार प्रतिक्रिया दिली.

‘हे पत्रकारिता नाही, आम्हाला एकटे सोडा’

साराने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये संबंधित पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर केला आणि लिहिले, ‘तुम्ही अत्यंत घाणेरडे आहात. याला पत्रकारिता म्हणत नाहीत. आम्हाला आमच्या आयुष्यात शांततेत राहू द्या.’ तिने पुढे आणखी संताप व्यक्त करत म्हटले की, तुम्ही पोस्ट डिलीट केली तरी तुमची घाणेरडी मानसिकता बदलत नाही. साराच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर अनेकांनी तिच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. अनेक युजर्सनी पापाराझींनी सेलिब्रिटींच्या वैयक्तिक मर्यादांचा आदर करायला हवा अशी मागणी केली आहे.

सारा तेंडुलकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे ग्लॅमरस फोटो, फॅशन स्टाईल आणि लाइफस्टाईल पोस्ट्स नेहमी चर्चेत असतात. इंस्टाग्रामवर तिचा मोठा चाहतावर्ग असून तिच्या प्रत्येक पोस्टला लाखो लाइक्स आणि कमेंट्स मिळतात.

याआधीही अनेक सेलिब्रिटींनी व्यक्त केली नाराजी

पापाराझींच्या अशा वागणुकीबाबत नाराजी व्यक्त होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेक बॉलिवूड कलाकारांनी याविरोधात आवाज उठवला आहे. करिश्मा कपूर, जान्हवी कपूर आणि जया बच्चन यांनी अनेकदा पापाराझींच्या अतिरेकावर नाराजी व्यक्त केली आहे.

तर अलीकडेच सलमान खान देखील पापाराझींवर संतापल्याची घटना चर्चेत आली होती. त्याने सार्वजनिकरित्या इशारा दिल्यानंतर काही पापाराझींना माफी मागावी लागल्याचेही सांगितले गेले.

Follow Us
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत,
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत, शंभुराज देसाई घेणार भेट
तर तुमचं राजकीय करिअर संपेल! मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
Manoj Jarange : तर तुमचं राजकीय करिअर संपेल! मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
माझगावमध्ये मोरया गणपती मिरवणुकीत गोंधळ, अंडी फेकल्याच्या आरोपाबाबत...
माझगावमध्ये मोरया गणपती मिरवणुकीत गोंधळ, अंडी फेकल्याच्या आरोपाबाबत मोठी अपडेट समोर
मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला..
मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन,
कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन, वाहतूक ठप्प
शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक? आज...
शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक... आजच्या सुनावणीआधीच वकीलांनी असं काय सांगितलं?
माझ्याकडे 90 टक्के रिस्पॉन्स आहे, पण मी आबांना... लक्ष्मण हाके Video
माझ्याकडे 90 टक्के रिस्पॉन्स आहे, पण मी आबांना... पुन्हा लक्ष्मण हाकेच्या घरातील व्हिडीओ व्हायरल
शिंदेंकडून गणेशोत्सव तर ठाकरेंकडून ईदच्या शुभेच्छा,'मातोश्री' बाहेर...
शिंदे गटाकडून गणेशोत्सव तर ठाकरे गटाकडून ईदच्या शुभेच्छा, 'मातोश्री' बाहेरील त्या बॅनरर्सची तुफान चर्चा
मी राजकारणदेखील सोडायला तयार, फक्त...पंतप्रधान मोदींचं नाव घेत नेता...
मी राजकारणदेखील सोडायला तयार, फक्त... पंतप्रधान मोदींचं नाव घेत बड्या नेत्याचं खुलं चॅलेंज!
मोठी बातमी! पंजाब, UP सह 7 राज्यांमधील निवडणुकीसाठी भाजपच्या...
मोठी बातमी! पंजाब, उत्तर प्रदेशसह 7 राज्यांमधील निवडणुकीसाठी भाजपच्या हालचाली वाढल्या, दिल्लीत...