‘आता शुबमनकडून सेंच्यूरी पक्की…’, सारा तेंडुलकरच्या नव्या पोस्टने चुकवला चाहत्यांच्या काळजाचा ठोका

Sara Tendulkar Instagram post : सारा तेंडुलकर हिच्या नव्या पोस्टने वेधलं चाहत्यांचं लक्ष, साराची पोस्ट पाहिल्यानंतर चाहते म्हणाले, 'आता शुबमन याचं काय होणार...' सध्या सर्वत्र सारा हिच्या पोस्टची चर्चा...

'आता शुबमनकडून सेंच्यूरी पक्की...', सारा तेंडुलकरच्या नव्या पोस्टने चुकवला चाहत्यांच्या काळजाचा ठोका
Follow us
| Updated on: Feb 19, 2024 | 8:24 AM

मुंबई | 19 फेब्रुवारी 2024 : भारताचे माजी कर्णधार सचिन तेंडुलकर यांची लेक सारा तेंडुलकर कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील सारा तिच्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. सारा हिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये सारा प्रचंड सुंदर दिसत आहे. सारा हिचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चाहत्यांच्या नजरा देखील सारा हिच्या सोशल मीडिया पोस्टवर येऊन थांबल्या आहेत. सारा हिने पारंपरिक लूकमध्ये एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. साडीच सारा हिचं सौंदर्य फुलून दिसत आहे.

बेबी पिंक रंगाची साडी, दागिने आणि सारा हिच्या दिलखेच अदांनी चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे. साडीत सारा प्रचंड सुंदर दिसत आहे. सारा हिने पोस्ट शेअर करताच फक्त चाहत्यांनीच नाही तर, सेलिब्रिटींनी देखील लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

सारा हिच्या पोस्टवर एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘आता शुबमनकडून सेंच्यूरी पक्की’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘डबल सेंच्यूरी पक्की’, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘सुंदर मुलगी…’ साराच्या व्हिडीओवर अभिनेत्री रवीना टंडन हिची लेक राशा थडानी कमेंट करत म्हणाली, ‘खूबसूरत!!!’ सांगायचं झालं तर, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सारा हिच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

रिपोर्ट्सनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून सारा तेंडुलकर हिचं नाव भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटपटू शुबमन गिल याच्यासोबत जोडलं जात आहे. सोशल मीडियावर सारा – शुबमन यांचे फोटो आणि व्हिडीओ देखील तुफान व्हायरल होत असतात. अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. पण सारा – शुबमन यांनी त्यांच्या नात्याबद्दल अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही.

सचिन तेंडुलकर यांची लेक सारा तेंडुलकर हिने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेलं नाही. पण सारा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा रंगली आहे. सारा अभिनेत्री नसली तरी तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सारा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सारा कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. सारा हिच्या प्रत्येक पोस्टवर फक्त चाहते नाही तर, सेलिब्रिटी देखील लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

Non Stop LIVE Update
तूच नादाला लागू नको... प्रसाद लाड यांच्यानंतर जरांगेंचा कोणाला इशारा?
तूच नादाला लागू नको... प्रसाद लाड यांच्यानंतर जरांगेंचा कोणाला इशारा?.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पवारांना दिलासा, आयोगाकडून मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पवारांना दिलासा, आयोगाकडून मोठा निर्णय.
एकदम जवळून बघा वाघनखं...'tv9 मराठी' वर पहिली झलक, जाणून घ्या वैशिष्ट्य
एकदम जवळून बघा वाघनखं...'tv9 मराठी' वर पहिली झलक, जाणून घ्या वैशिष्ट्य.
'मराठी बोलणार नाही, काय करायचे ते...', व्यावसायिकाला मनसे स्टाईल दणका
'मराठी बोलणार नाही, काय करायचे ते...', व्यावसायिकाला मनसे स्टाईल दणका.
‘लाडकी बहीण, लाडका भाऊ झाले असेल तर लाडक्या नातवांचे पण तेवढे बघा’
‘लाडकी बहीण, लाडका भाऊ झाले असेल तर लाडक्या नातवांचे पण तेवढे बघा’.
कोकणातील 'या' दोन मेडिकल कॉलेजला लाखोंचा दंड, कारण नेमकं काय?
कोकणातील 'या' दोन मेडिकल कॉलेजला लाखोंचा दंड, कारण नेमकं काय?.
शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी, शिवकालीन वाघनखं साताऱ्यात; बघा पहिली झलक
शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी, शिवकालीन वाघनखं साताऱ्यात; बघा पहिली झलक.
जगभरात मायक्रोसॉफ्टचं सर्व्हर ठप्प, 'या' क्षेत्राला बसला मोठा फटका
जगभरात मायक्रोसॉफ्टचं सर्व्हर ठप्प, 'या' क्षेत्राला बसला मोठा फटका.
संभाजीनगरात लाडक्या बहिणी त्रस्त, अर्ज भरण्यास आलेल्या महिलांचा खोळंबा
संभाजीनगरात लाडक्या बहिणी त्रस्त, अर्ज भरण्यास आलेल्या महिलांचा खोळंबा.
महायुतीचे काळे कारनामे..., पवार गटाचं निदर्शन, काळे फुगे लावून डिवचलं
महायुतीचे काळे कारनामे..., पवार गटाचं निदर्शन, काळे फुगे लावून डिवचलं.