Kartiki Gaikwad | लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी ‘लिटिल चॅम्प’ कार्तिकी गायकवाड थेट ‘वर्षा’वर!

कार्तिकीच्या लग्नासाठी मुख्यमंत्र्यांना खास निमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे आता कार्तिकीच्या लग्नांत ठाकरे परिवार हजेरी लावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Kartiki Gaikwad | लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी ‘लिटिल चॅम्प’ कार्तिकी गायकवाड थेट ‘वर्षा’वर!

मुंबई : ‘सारेगमप’ फेम गायिका कार्तिकी गायकवाडने (Kartiki Gaikwad) आज (12 नोव्हेंबर) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी कार्तिकी तिच्या वाढदिवशीच ‘वर्षा’वर पोहोचली होती. यावेळी कार्तिकीसोबत तिचे वडील गायक-संगीतकार कल्याणजी गायकवाड देखील उपस्थित होते. कार्तिकीने वडिलांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत, लग्नाचे निमंत्रण दिले आहे (SaReGaMaPa little Champ Fame Singer Kartiki Gaikwad Meets CM Uddhav Thackeray).

कार्तिकीच्या लग्नासाठी मुख्यमंत्र्यांना खास निमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे आता कार्तिकीच्या लग्नाला ठाकरे परिवार हजेरी लावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कार्तिकीच्या लग्नाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नसली, तरी ती डिसेंबर महिन्यात लग्नबेडीत अडकणार असल्याचे म्हटले जात आहे.

लॉकडाऊनमध्ये झाला साखरपुडा

लॉकडाऊन दरम्यान ‘सारेगमप लिटिल चॅम्प’ची विजेती ठरलेली पार्श्वगायिका कार्तिकी गायकवाडचा साखरपुडा पार पडला आहे. पुण्याचा व्यावसायिक रोनित पिसे याच्यासोबत कार्तिकी लगीनगाठ बांधणार आहे. ‘घागर घेऊन’, ‘नवरी नटली’ यासारख्या खर्ड्या आवाजातील गाण्यांनी रसिकांना वेड लावणारी चिमुरडी कार्तिकीच अनेकांच्या स्मरणात आहे. परंतु लॉकडाऊनच्या काळातच म्हणजे जुलै महिन्याच्या सुरुवातीला कार्तिकीचा शुभविवाह ठरला आणि साखरपुडाही पार पडला होता (SaReGaMaPa little Champ Fame Singer Kartiki Gaikwad Meets CM Uddhav Thackeray).

कार्तिकीने सोशल मीडियावर साखरपुड्यातील काही फोटो शेअर करत चाहत्यांना ही सुखद बातमी दिली होती. मोजके नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत रविवार 26 जुलैला साखरपुडा संपन्न झाला होता.

(SaReGaMaPa little Champ Fame Singer Kartiki Gaikwad Meets CM Uddhav Thackeray)

इंजिनिअर असणार कार्तिकीचा भावी जोडीदार

कार्तिकीचा भावी जोडीदार रोनित पिसे पुण्याचा राहणारा असून इंजिनिअर आहे. त्यालाही संगीताची आवड आहे. तो उत्तम तबलावादक आहे. त्यामुळे कार्तिकी-रोनित यांच्या संसारात सूर-तालाची साथ असेल, यात शंका नाही.

गायकवाड कुटुंब आळंदीत राहत असून कार्तिकी आपले वडील आणि गुरु कल्याणजी गायकवाड यांच्या संगीताचा वारसा चालवते. जवळपास 12 वर्षांपूर्वी सारेगमपच्या ‘लिटिल चॅम्प’ पर्वातून कार्तिकीचा प्रवास सुरु झाला. दरम्यानच्या काळात तिने अनेक मैफिली आपल्या दमदार आवाजाने गाजवल्या आहेत. भक्तीसंगीत ते लावणी अशा हरतऱ्हेची गाणी कार्तिकीच्या गळ्यात शोभतात.

(SaReGaMaPa little Champ Fame Singer Kartiki Gaikwad Meets CM Uddhav Thackeray)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *