AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘धुरंधर 2’च्या सक्सेस पार्टीत असं काय घडलं? अभिनेत्रीने थेट रणवीरच्या कानाखाली वाजवली..

'धुरंधर 2'च्या सक्सेस पार्टीत अनेक सेलिब्रिटींची उपस्थिती पहायला मिळाली. मुंबईत पार पडलेल्या या पार्टीत चित्रपटाच्या दोन्ही भागांतील सर्व कलाकारसुद्धा हजर होते. अशातच एका अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

'धुरंधर 2'च्या सक्सेस पार्टीत असं काय घडलं? अभिनेत्रीने थेट रणवीरच्या कानाखाली वाजवली..
Ranveer SinghImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 20, 2026 | 12:31 PM
Share

रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेला ‘धुरंधर 2’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घालतोय. 19 मार्च रोजी या चित्रपटाने जगभरात कमाईचा 200 कोटींचा टप्पा पार केला आहे. यासह आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर 2’ने बॉक्स ऑफिसवर अनेक नवे विक्रम रचले आहेत. कमाईची ही लाट पुढील काही दिवस अशीच राहण्याची शक्यता चित्रपट व्यापार विश्लेषकांकडून वर्तवण्यात येत आहे. या यशानिमित्त मुंबईत ‘धुरंधर 2’च्या सक्सेस पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीला चित्रपटाच्या दोन्ही भागातील सर्व कलाकार उपस्थित होते. ‘धुरंधर’च्या पहिल्या भागात महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेल्या अभिनेत्रीने पार्टीतील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. यातील एका व्हिडीओमध्ये ती चक्क रणवीर सिंहच्या कानाखाली वाजवताना दिसून येत आहे.

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून सौम्या टंडन आहे. ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या सौम्याने ‘धुरंधर’च्या पहिल्या भागात रेहमान डकैत म्हणजेच अक्षय खन्नाच्या ऑनस्क्रीन पत्नीची भूमिका साकारली होती. चित्रपटात जेव्हा रेहमान डकैतच्या मुलाचा मृत्यू होतो, तेव्हा त्याची पत्नी त्याच्या कानाखाली वाजवते. दिग्दर्शक आदित्य धरने तो सीन अस्सल वाटला पाहिजे असा आग्रह धरल्यामुळे सौम्याने अक्षयच्या क्लोज-अप शॉटदरम्यान खरोखरच त्याच्या कानाखाली वाजवली होती. हाच सीन आता तिने ‘धुरंधर 2‘च्या सक्सेस पार्टीत रणवीरसोबत रिक्रिएट केला आहे. अर्थात ती त्याच्या खरोखर कानाखाली वाजवत नाही तर फक्त तसा अभिनय करते.

या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये सौम्याने लिहिलं, ‘चित्रपटाच्या स्क्रिनिंगनंतरच्या आफ्टर पार्टीत धुरंधर्ससोबत खूप धमाल केली. बॉक्स ऑफिसवर इतिहास रचल्याबद्दल सर्वांना शुभेच्छा. हे शक्य करणारे आदित्य धर आणि धुरंधर रणवीर सिंह (ज्याने माझ्या हाताने कानाखाली वाजवण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि नंतर मला थप्पड क्वीनचा टॅग दिला)’, अत्यंत प्रतिभावान यामी गौतम, मला कास्ट करणारे मुकेश छाब्रा, राइझिंग स्टार सारा अर्जुन यांना खूप सारं प्रेम.’ सौम्याने तिच्या या पोस्टमध्ये संगीत दिग्दर्शक शाश्वत सचदेव, अभिनेत्री क्रिस्टल डिसूझा, आयेशा खान, मानव गोहिल, गायक जुबिन नौटियाल यांनाही शुभेच्छा दिल्या आहेत. या सर्वांसोबत तिने फोटोसुद्धा शेअर केले आहेत.

Follow Us
आळंदीमध्ये वारकरी वाद चिघळला! विकास लवांडे यांच्यावर शाईफेक
आळंदीमध्ये वारकरी वाद चिघळला! विकास लवांडे यांच्यावर शाईफेक.
'मी व्हिडीओच शेअर करणार...' 2020 मधील एक घटना सांगत संजय राऊतांचा मोठा
'मी व्हिडीओच शेअर करणार...' 2020 मधील एक घटना सांगत संजय राऊतांचा मोठा.
अजबच! लग्नसोहळ्यात बूट चोरीचा खेळ पडला महाग....
अजबच! लग्नसोहळ्यात बूट चोरीचा खेळ पडला महाग.....
मुलींचे नको तसले व्हिडीओ काढायचा अन्... निदा खानला आसरा देणाऱ्या MIM..
मुलींचे नको तसले व्हिडीओ काढायचा अन्... निदा खानला आसरा देणाऱ्या MIM...
मोठी अपडेट! चौकशी दरम्यान भोंदू खरात चवताळला, चक्क... नेमकं काय घडलं?
मोठी अपडेट! चौकशी दरम्यान भोंदू खरात चवताळला, चक्क... नेमकं काय घडलं?.
आमच्या घराघरात वाढते मराठी? सर्वात जास्त विद्यार्थी मराठी विषयात नापास
आमच्या घराघरात वाढते मराठी? सर्वात जास्त विद्यार्थी मराठी विषयात नापास.
पेट्रोल-डिझेलनंतर आता सीएनजी महाग; सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले
पेट्रोल-डिझेलनंतर आता सीएनजी महाग; सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले.
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग.....
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग......
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री.
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?.