AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Suvendu Adhikari Oath Ceremony : सुवेंदू यांचा हा फोटो म्हणजे हिरा पारखण्यातील मोठी चूक, पश्चिम बंगालमध्ये इतिहासाची पुनरावृत्ती

Suvendu Adhikari Oath Ceremony : सुवेंदू अधिकारी यांनी आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ते पश्चिम बंगालमधील भाजपचे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. भाजपच्या राजकीय आयुष्यातील हा आजचा ऐतिहासिक दिवस आहे.

Suvendu Adhikari Oath Ceremony : सुवेंदू यांचा हा फोटो म्हणजे हिरा पारखण्यातील मोठी चूक, पश्चिम बंगालमध्ये इतिहासाची पुनरावृत्ती
Suvendu Adhikari
| Updated on: May 09, 2026 | 11:36 AM
Share

भाजपच्या राजकीय आयुष्यातील आज ऐतिहासिक दिवस आहे. पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदा सत्तेवर आलेल्या भाजप सरकारचा आज शपथग्रहण सोहळा आहे. कोलकाता ही पश्चिम बंगालची राजधानी आहे. तिथल्या ब्रिगेड परेड ग्राऊंडवर आज पहिल्यांदा शपथ ग्रहण सोहळ्याच आयोजन करण्यात आलं आहे. सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.सुवेंदू अधिकारी यांचा शपथविधी म्हणजे एकप्रकारे पश्चिम बंगालमध्ये इतिहासाची पुनरावृत्ती आहे. सुवेंदू यांचं मुख्यमंत्री बनणं हे बरच काही शिकवून जाणारं आहे.’हिरे की परख सिर्फ जोहरी को होती है’, हे हिंदीत एक वाक्य आहे. सुवेंदू यांचा शपथविधीचं दृश्य पाहून त्याची आठवण होते. सुवेंदू यांच्या शपथविधी आधी इतिहासाची पानं चाळली तर याची सुरुवात काँग्रेसपासून होते. पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या मूळच्या काँग्रेसच्या. पण काँग्रेसमध्ये न्याय मिळत नसल्याने त्यांनी स्वत:चा पक्ष काढला. तृणमुल काँग्रेस. रस्त्यावरची लढाई, राजकीय संघर्ष करुन त्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री बनल्या.

आजचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी हे ममता बॅनर्जी यांच्या राजकीय तालिमीत तयार झाले. ते आधी तृणमुल काँग्रेसमध्ये होते. ममता बॅनर्जी यांचा डावा हात मानले जायचे. त्यांनी तृणमुल काँग्रेसमधून मंत्रीपद भूषवलं. पुढे 2020 साली ममता बॅनर्जी यांच्यासोबत मतभेद झाल्याने ते भाजपात गेले. आता त्यांनी भाजपला सत्तेपर्यंत पोहोचवण्यात मोलाचं योगदान दिलं. पक्षाने त्याची परतफेड म्हणून त्यांना मुख्यमंत्री बनवलं. ‘हिरे की परख सिर्फ जोहरी को होती है’ या वाक्याची आठवण होण्यामागचं कारण हेच आहे. ममता बॅनर्जी यांची किंमत काँग्रेसला कळली नाही, तसच पुढे जाऊन ममता यांना सुवेंदू यांची क्षमता लक्षात आली नाही. अमित शाह यांच्यासारखे जोहरीने हिच गोष्ट हेरली आणि भाजपला पश्चिम बंगालमध्ये सत्तेपर्यंत पोहोचवलं.

15 वर्षांची सत्ता उलथवून मिळवलं यश

सुवेंदू अधिकारी यांच्या आजच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन उपस्थित आहेत. त्याशिवाय एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री सुद्धा आले आहेत. आज गुरुदेव रवींद्रनाथ टैगोर यांची जयंती आहे. हाच दिवस भाजपने शपथविधीसाठी निवडला आहे. 294 सदस्यांच्या पश्चिम बंगालमध्ये भाजपने तब्बत 207 जागांवर विजय मिळवला. म्हणजे भाजपकडे जवळपास दोन तृतीयांश जागा आहेत. ममता बॅनर्जी यांची 15 वर्षांची सत्ता उलथवून भाजपने हे यश मिळवलं आहे.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...