मी बिकनीवर बीचवर झोपले होते अन् 70 लोकं माझ्या समोर होती; अभिनेत्रीने सांगितला इंटिमेट सीनचा किस्सा

सयानी गुप्ताने चित्रपट आणि वेब सीरिजमधून आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सयानी तिच्या बोल्ड इमेजसाठी ओळखली जाते.मात्र इंटिमेट किंवा बोल्ड शूट करताना तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागल्याचे तिने सांगितले.

मी बिकनीवर बीचवर झोपले होते अन् 70 लोकं माझ्या समोर होती; अभिनेत्रीने सांगितला इंटिमेट सीनचा किस्सा
Follow us
| Updated on: Nov 30, 2024 | 4:27 PM

बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींना शुटींग दरम्यान अनेक अनुभव येत असतात. त्यात जास्त करून जेव्हा त्यांना एखादा बोल्ड सीन किंवा इंटिमेट सीन शूट करायचा असे तेव्हा तर अभिनेत्री जास्त अनकम्पर्फटेबल असतात. काही वेळेला तर अभिनेत्रींना त्यांच्या सहकलाकारांसोबतच वाईट अनुभव येतात. असेच काही अनुभव अभिनेत्री सयानी गुप्तालाही आले. आणि ते बेधडकपणे सर्वांसोबत शेअरही केले आहे.

सयानी गुप्ताने चित्रपट आणि वेब सीरिजमधून आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सयानी तिच्या बोल्ड इमेजसाठी ओळखली जाते.मात्र इंटिमेट किंवा बोल्ड शूट करताना तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागल्याचे तिने सांगितले. एका मुलाखतीत तिने याबद्दलचा खुलासा केला आहे. अशा बोल्ड सीन्सवेळी नेमक्या कोणत्या अडचणी येतात आणि त्यावेळी एक मुलगी म्हणून तिची काय मनस्थिती असते याबद्दल तिने तिचे अनुभव शेअर केले.

सयानी गुप्ताने सांगितले की, “बदलत्या काळानुसार अनेक गोष्टीत सुधारणा होते. आता इंटिमेट सीन किंवा बोल्ड सीन शूट करताना सेटवर एक इंटिमेसी कोऑर्डिनेटर आणि डायरेक्टर असतात. तेथे अगदी प्रोफेशनल पद्धतीने शूट केले जाते. परंतु बरेच लोक याचा फायदा देखील घेतात.”‘चार मोअर शॉट्स’ या वेब सीरिजमध्ये सयानीने केलेल्या अभिनयाचे सर्वांनीच कौतुक केले होते. या सीरिजच्या शुटींगदरम्यानचा एक किस्सा तिने सांगितला. यात ती सेटवरील सुरक्षेबद्दल बोलली आहे.

सयानी म्हणाली की, “समुद्रकिनाऱ्यावरील वाळूवर मी बिकनीवर झोपले होते असा एक सीन होता आणि माझ्यासमोर क्रूसह जवळपास 70 लोक होते. त्यावेळी मला खूप असुरक्षित आणि अनकम्पर्फटेबल वाटत होतं. सेटवर माझ्या जवळ असा एकही माणूस नव्हता जो मला शॉल देऊ शकेल” असे अनेक सयानीने शेअर केले आहे.

शेवटी सयानी म्हणाली की, “मी इंटिमेट सीनवर संपूर्ण पुस्तक लिहू शकते. लोक म्हणतात की इंटीमेट सीन करणे सिंपल असते कारण ते तांत्रिक पद्धतीने केले जाते. पण तसे नसते.याच्या आडून अनेक लोक याचा गैरफायदाही घेतात.चित्रपटांमध्ये दिसणाऱ्या ग्लॅमरमाचे वास्तव तुम्हाला दिसत नाही. हे कधीकधी खूप कठीण असतं.

दिग्दर्शकाच्या मनात काय आहे आणि त्याला कोणत्या प्रकारचे दृश्य हवे आहे ते पडद्यावर आणणे आव्हानात्मक असते. कोणताही इंटिमेट सीन शूट सोपे नाही तर फार कठीण असतं. त्यामध्ये अनेक समस्याही उद्भवतात.”असं स्पष्ट मत तिने मांडलं आहे.

दरम्यान सयानी गुप्ताच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तिने जॉली एलएलबी 2, जब हॅरी मेट सेजल, आर्टिकल 15 आणि बार बार देखो यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच तिने अनेक बेव सीरिजही केल्या आहेत आणि आताही करत आहेत.

शिंदेंच्या आमदारानं घेतली शपथ पण एकही शब्द वाचता आला नाही?
शिंदेंच्या आमदारानं घेतली शपथ पण एकही शब्द वाचता आला नाही?.
'रवी राणाही आमदारकीचा राजीमाना देतील', नवनीत राणांचं विरोधकांना आव्हान
'रवी राणाही आमदारकीचा राजीमाना देतील', नवनीत राणांचं विरोधकांना आव्हान.
'...हा म्हणजे संविधानाचा अवमान', चंद्रशेखर बावनकुळेंचा 'मविआ'वर घणाघात
'...हा म्हणजे संविधानाचा अवमान', चंद्रशेखर बावनकुळेंचा 'मविआ'वर घणाघात.
निकालानंतर खासगी संस्थेकडून सर्व्हेक्षण, 'सामना'तून थेट आकडेच प्रसिद्ध
निकालानंतर खासगी संस्थेकडून सर्व्हेक्षण, 'सामना'तून थेट आकडेच प्रसिद्ध.
'मी असताना राज ठाकरेंची गरज काय? त्यांना महायुतीत घेतल्यानं नुकसानच..'
'मी असताना राज ठाकरेंची गरज काय? त्यांना महायुतीत घेतल्यानं नुकसानच..'.
'मारकडवाडीचा खरा मास्टर माईंड तर...', राम सातपुतेंनी थेट घेतलं नाव
'मारकडवाडीचा खरा मास्टर माईंड तर...', राम सातपुतेंनी थेट घेतलं नाव.
मनसे कार्यकर्ते ठाकरेंकडे येताच उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोमणा
मनसे कार्यकर्ते ठाकरेंकडे येताच उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोमणा.
राहुल नार्वेकर हेच पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष, बिनविरोध होणार निवड
राहुल नार्वेकर हेच पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष, बिनविरोध होणार निवड.
EVMवर निवडून आलेल्या मविआच्या सर्वांनी राजीनामा द्या, कोणाचं वक्तव्य?
EVMवर निवडून आलेल्या मविआच्या सर्वांनी राजीनामा द्या, कोणाचं वक्तव्य?.
'सांगा काय चुकल?,' फडणवीसांच्या 'त्या' सल्ल्यावर शरद पवारांचा थेट सवाल
'सांगा काय चुकल?,' फडणवीसांच्या 'त्या' सल्ल्यावर शरद पवारांचा थेट सवाल.