Video: याचा अर्थ त्यांचे निधन झाले आहे; धर्मेंद्र यांच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवल्याने चर्चांना उधाण
बॉलिवूड अभिनेता धर्मेंद्र यांची प्रकृती गंभीर असल्याचे म्हटले जात आहे. त्यांच्यावर मुंबईतील ब्रीचकँडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, धर्मेंद्र यांच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. नेमकं कारण काय?

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती गंभीर असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्यावर मुंबईतील ब्रीचकँडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 31 ऑक्टोबर रोजी धर्मेंद्र रुग्णालयात रुटीन चेकअपसाठी दाखल झाले होते. पण आता त्यांची प्रकृती गंभीर असल्याते बोलले जात आहे. धर्मेंद्र यांची पत्नी हेमा मालिनी, मुलगी ईशा देओल, मुलगा बॉबी देओल हे त्यांना पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचले आहेत. दरम्यान, धर्मेंद्र यांच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवल्याचे चित्र दिसत आहे.
धर्मेंद्र यांचा जुहू येथे आलिशान बंगला आहे. या बंगल्याची नेहमीच चर्चा होत असे. आता धर्मेंद्र रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवली असल्याचे दिसत आहे. आज सकाळी धर्मेंद्र यांच्या निधनाच्या अफवा परसल्या होत्या. मात्र, मुलगी ईशाने यावर प्रतिक्रिया देत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. धर्मेंद्र यांच्या घराबाहेरील सुरक्षेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
View this post on Instagram
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
एएनआय या वृत्तवाहिनीने धर्मेंद्र यांच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवताना व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की त्यांच्या घराबाहेर पोलिसांनी बॅरिगेटर लावले आहेत. तसेच हा व्हिडीओ शेअर करत, ‘धर्मेंद्र हे रुग्णालयात उपचार घेत असतान मुंबई पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानी बॅरीगेट लावत सुरक्षा वाढवली आहे’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.
नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया
धर्मेंद्र यांच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवल्याचा व्हिडीओ पाहातचा नेटकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. एका यूजरने ‘सर्वांत हँडसम अभिनेत्याचे निधन झाले, खूप प्रेम’ अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘अतिशय वाईट बातमी समोर येत आहे’ असे म्हटले आहे. तिसऱ्या एका यूजरने, ‘याचा अर्थ त्यांचे निधन झाले आहे’ अशी कमेंट केली आहे. सध्या सोशल मीडियावर अनेकजण धर्मेंद्र यांच्यासाठी प्रार्थना करताना दिसत आहेत.
धर्मेंद्र यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. कुटुंबीयांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली आहे. धर्मेंद्र यांनी बॉलिवूडमधील एक काळ गाजवला होता. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव प्रकाश काैर. त्यांना दोन मुले आणि दोन मुली आहेत. पहिल्या पत्नीला घटस्फोट न देताच धर्मेंद्र यांनी दुसरे लग्न केले. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांना दोन मुली आहेत.
