Seema Haider : थेट ‘या’ गाण्यावर धमाकेदार डान्स करताना दिसली सीमा हैदर, व्हिडीओ तूफान व्हायरल
सीमा हैदर ही गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. सीमा हैदर ही पाकिस्तानमधून भारतामध्ये दाखल झालीये. सीमा हैदर ही सोशल मीडियावरही सक्रिय असते. सीमा हैदर ही खास व्हिडीओ आणि फोटो शेअर करताना देखील दिसते.

मुंबई : आपल्या प्रेमासाठी पाकिस्तानमधून भारतामध्ये काही दिवसांपूर्वीच सीमा हैदर (Seema Haider) ही दाखल झाली. सध्या सीमा हैदर ही एखाद्या सेलिब्रिटीसारखी झालीये. सर्वत्र फक्त आणि फक्त सीमा हैदर हिच्याच नावाची जोरदार चर्चा आहे. सीमा हैदर ही सोशल मीडियावरही सक्रिय असते. पाकिस्तानमधून सीमा हैदर ही ज्यावेळी भारतामध्ये दाखल झाली. त्यावेळीचे अनेक व्हिडीओही तिने सोशल मीडियावर (Social media) शेअर केले. सीमा हैदर हिचा पती पाकिस्तानमध्ये राहतो आणि ती आपल्या मुलांसोबत भारतामध्ये आलीये.
सोशल मीडियावरच सचिन मीना आणि सीमा हैदर यांची लव्ह स्टोरी सुरू झाली. नेपाळमध्ये आपण सचिन मीना याच्यासोबत लग्न केल्याचा दावा देखील सीमा हैदर हिने काही दिवसांपूर्वीच केला. नेपाळमध्ये काही दिवस हे हाॅटेलमध्ये राहिले. नेपाळमधील अनेक व्हिडीओ सीमा हैदर हिने सोशल मीडियावर शेअर केले. सीमा हैदर हिने हा देखील दावा केला की, नेपाळ मार्गेच आपण भारतामध्ये दाखल झालो.
सीमा हैदर ही नेहमीच सोशल मीडियावर तिचे डान्सचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसले. इतकेच नाही तर सचिन मीना याच्यासोबत धमाल करतानाचे देखील सीमा हैदर व्हिडीओ शेअर करते. नुकताच आता सीमा हैदर हिने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. सीमा हैदर हिचा हा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय.
View this post on Instagram
सीमा हैदर हिने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ती धमाकेदार डान्स करताना दिसत आहे. सीमा हैदर हिचा हा डान्सही काही लोकांना आवडल्याचे बघायला मिळतंय. लोक सीमा हैदर हिच्या या डान्सच्या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत. सीमा हैदर ही तिच्या घरी हा डान्स करताना दिसत आहे. यावेळी काही महिला देखील उपस्थित आहेत.
सीमा हैदर ही ‘मैया रे मोहे ब्याह दे हिंदुस्तान’ या गाण्यावर डान्स करत आहे. यापूर्वीही सीमा हैदर हिचे अनेक व्हिडीओ डान्सचे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सीमा हैदर हिला डान्स करण्यास प्रचंड आवडतो. काही दिवसांपूर्वी एक चर्चा जोरदार रंगताना दिसली की, सीमा हैदर ही बिग बाॅस 17 मध्ये दाखल होणार आहे. बिग बाॅस 17 च्या निर्मात्यांनी तिच्यासोबत संपर्क केला आहे.
फक्त सीमा हैदर हिच नव्हे तर तिच्यासोबत सचिन मीना हा देखील बिग बाॅस 17 मध्ये सहभागी होईल. मात्र, काही दिवसांपूर्वीच सीमा हैदर हिने स्पष्ट केले की, मला द कपिल शर्मा आणि बिग बाॅस 17 ची आॅफर मिळाली आहे. मात्र, या शोमध्ये सहभागी व्हायचे की, नाही यावर मी अजून काही विचार केला नाहीये. मी जर सहभागी होणार असेल तर मी सर्वांना याबाबत सांगेल.
