5 राष्ट्रीय पुरस्कार जिंकले, 72 व्या वर्षी किसिंग सीनमुळे चर्चेत राहिली; ही बॉलिवूड अभिनेत्री कोण?
अशी एक बॉलिवूड अभिनेत्री जिने एनेक सुपरहीट चित्रपट दिले एवढंच नाही तर या अभिनेत्रीला चक्क 5 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. पण एका चित्रपटात 72 व्या वर्षी केलेला किसिंग सीन चांगलाच चर्चेत आला होता. कोण आहे ही अभिनेत्री?

बॉलिवूडमधील अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांच्या चित्रपटांबद्दल आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासोबतच त्यांनी चित्रपटात केलेल्या कामाचीही नेहमी चर्चा होताना दिसते. अशी एक अभिनेत्री जिने तिच्या कारकिर्दीत अनेक सुपरहीट चित्रपट दिले. त्याबद्दल त्या अभिनेत्रीला एक नाही दोन नाही चक्क 5 राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले आहेत. एवढंच नाही तर वयाच्या 72 व्या वर्षी देखील ती तिच्या किसिंग सीनमुळे चर्चेत आली आहे. ओळखली का ही अभिनेत्री कोण आहे ते?
चित्रपटासाठी अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले
या अभिनेत्रीचे नाव आहे शबाना आझमी. शबाना आझमी यांनी 70 ते 80 च्या दशकात अनेक हीट चित्रपट दिले आहे. अनेक चित्रपट तर आजही तेवढ्याच आवडीने पाहिले जातात. त्यांच्या चित्रपटातील अनेक गाणी आजही तेवढ्याच आवडीने ऐकली जातात. त्यांना चित्रपटासाठी अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
शबाना आझमी यांच्या राष्ट्रीय पुरस्कारांबद्दल बोलायचे झाले तर, त्यांना 1975 मध्ये पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. 1974 मध्ये आलेल्या ‘अंकुर’ या चित्रपटासाठी शबाना यांना हा पुरस्कार मिळाला.शबाना आझमी यांना 1983 मध्ये त्यांचा दुसरा पुरस्कार मिळाला. 1982 मध्ये प्रदर्शित झालेल्या अर्थ चित्रपटासाठी शबाना आझमी यांना राष्ट्रीय पुरस्कार पुरस्कार मिळाला आहे.
पुरस्कारांची मालिकाच
त्यानंतर शबाना आझमी यांना 1984 मध्ये तिसरा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यांना हा पुरस्कार ‘खंडहर’ चित्रपटासाठी मिळाला.शबाना आझमी यांना 1985 मध्ये चौथा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. 1984 च्या ‘पार’ चित्रपटासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला.तसेच 1999 मध्ये त्यांना पाचवा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार ‘गॉडमदर’ चित्रपटासाठी होता.अशापद्धतीने त्यांना एकूण 5 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
Shabana Azmi Instagram
View this post on Instagram
किसिंग सीनमुळे चर्चेत आलेली भूमिका
शबाना आझमी या कामयच वेगळ्या धाटणीचे चित्रपट करत आल्या आहेत. आणि आज या वयातही ते चित्रपटांची आवड तशीच जपतात. आणि कॅरेक्टरची काय गरज आहे हे लक्षात घेऊन त्या ते निभावतात. अशीच एक त्यांची भूमिका प्रचंड चर्चेत आली ती त्यांच्या किसिंग सीनमुळे आणि तेही 72 वर्षात. होय, 2023 मध्ये आलेल्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात शबाना यांचा अभिनेते धर्मेंद्र यांच्यासोबत एक किसिंग सीन होता. हा सीन फार चर्चेत आला होता.
या सीनबद्दल जेव्हा त्यांना विचारण्यात आलं होतं तेव्हाही त्यांची भूमिका ठाम होती ती म्हणजे त्यांच्या कथेप्रमाणे त्यांच्या कॅरेक्टरची गरज. त्यांनी फक्त अभिनय केला , ती भूमिका चोख बजावली असं त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे.
