AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंबानींच्या कार्यक्रमानंतर शाहरुख खानवर भडकले रामचरणचे चाहते; नेमकं काय आहे प्रकरण?

अनंत अंबानींच्या प्री-वेडिंग कार्यक्रमात शाहरुख खान, आमिर खान आणि सलमान खान या तिघांनी मिळून 'नाटू नाटू' या लोकप्रिय दाक्षिणात्य गाण्यावर डान्स केला. यावेळी स्टेजवर साऊथ सुपरस्टार रामचरणला बोलावताना त्याने एक डायलॉग म्हटला होता. त्यावरून हा वाद सुरू आहे.

अंबानींच्या कार्यक्रमानंतर शाहरुख खानवर भडकले रामचरणचे चाहते; नेमकं काय आहे प्रकरण?
Ram Charan and Shah Rukh KhanImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 05, 2024 | 10:45 AM
Share

मुंबई : 5 मार्च 2024 | अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं प्री-वेडिंग सेलिब्रेशन गेल्या काही दिवसांपासून तुफान चर्चेत आहे. रविवारीच हा तीन दिवसांचा कार्यक्रम संपला. मात्र त्यानंतरही कार्यक्रमाची चर्चा अद्याप सुरूच आहे. गुजरातच्या जामनगरमध्ये हा भव्य कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमादरम्यान घडलेली एक घटना आता प्रकाशझोतात आली आहे. साऊथ सुपरस्टार रामचरणची पत्नी उपासनाच्या मेकअप आर्टिस्टने शाहरुख खानवर आरोप केला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

प्री-वेडिंग सेलिब्रेशनदरम्यान सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान यांनी ‘RRR’ या सुपरहिट चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्यावर डान्स केला. तेव्हा शाहरुखने कार्यक्रमात उपस्थित असलेल्या रामचरणला डान्स करण्यासाठी स्टेजवर बोलावलं. रामचरणला स्टेजवर बोलावताना शाहरुखने मस्करीत त्याला ‘इटली वडा’ असं म्हटलं. त्यावर रामचरण काहीच बोलला नाही. मात्र त्याच्या पत्नीची मेकअप आर्टिस्ट आणि रामचरणचे चाहते चांगलेच भडकले आहेत.

काय म्हणाली मेकअप आर्टिस्ट?

उपासना कोनिडेलाची मेकअप आर्टिस्ट जेबा हासनने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लिहिलं, ‘भेंड इडली वडा रामचरण, कुठे आहेस तू? हे ऐकल्यानंतर मी तिथून बाहेर निघाले. रामचरणसारख्या स्टारसोबत इतकी अपमानकारक वागणूक?’

चाहतेही भडकले

जेबा हासनच्या या पोस्टनंतर रामचरणचे चाहते सोशल मीडियाद्वारे शाहरुखवर राग व्यक्त करत आहेत. ‘एका दाक्षिणात्य दिग्दर्शकाने त्याला त्याच्या करिअरमधील सर्वांत हिट चित्रपट दिला आणि तो रामचरणला इडली-वडा बोलून वर्णभेदी कमेंट करत आहे’, असं एकाने लिहिलं. तर ‘शाहरुखचं हे वागणं योग्य नव्हतं’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ‘रामचरणला इडली-वडा बोलणं हे वर्णभेदी आहे’, असंही अनेकांनी म्हटलंय. दुसरीकडे शाहरुखच्या चाहत्यांनी या संपूर्ण प्रकरणात किंग खानचा बचाव केला आहे. ‘शाहरुखने फक्त त्याच्या चित्रपटातील डायलॉग म्हटलं होतं’, असं त्यांनी म्हटलंय. ‘वन टू का फोअर’ या चित्रपटातील तो डायलॉग होता, असं नेटकऱ्यांनी लिहिलं आहे.

शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटाचं दिग्दर्शन दाक्षिणात्य दिग्दर्शक अटलीने केलं होतं. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली होती. त्यामुळे शाहरुख एखाद्या दाक्षिणात्य कलाकाराला असं कसं बोलू शकतो, असा सवाल नेटकरी करत आहेत. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फंक्शनला बॉलिवूडपासून टॉलिवूडपर्यंत असंख्य सेलिब्रिटी उपस्थित होते.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.