AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shah Rukh Khan: टिळा कुठंय? मला कपाळावर लावायचाय..; शाहरुखचा व्हिडीओ पाहून चाहते म्हणाले, ‘किंग खान मन जिंकलंस’

Shah Rukh Khan: अभिनेता शाहरुख खानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आपण कपाळावर टिळा नाही, असं लक्षात येताच शाहरुख तिथे उभ्या असलेल्या व्यक्तीला टिळा लावण्यास सांगतो.

Shah Rukh Khan: टिळा कुठंय? मला कपाळावर लावायचाय..; शाहरुखचा व्हिडीओ पाहून चाहते म्हणाले, 'किंग खान मन जिंकलंस'
शाहरुख खानImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 23, 2026 | 3:57 PM
Share

Shah Rukh Khan: मुंबईतील प्रसिद्ध ‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी दरवर्षी अनेक सेलिब्रिटी हजेरी लावतात. यंदाच्या गणेशोत्सवात बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानदेखील पत्नी गौरी खान, मुलगी सुहाना खान आणि मॅनेजर पूजा ददलानी यांच्यासोबत बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचला. शाहरुखच्या या भेटीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. मात्र, यातील एका जुन्या व्हिडीओने सध्या पुन्हा सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये शाहरुख खान गणपतीच्या दर्शनासाठी जाताना दिसतो. बाप्पाच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की कपाळावर टिळा लावलेला नाही. त्यानंतर तो तिथे उपस्थित असलेल्या व्यक्तीला टिळ्याबद्दल विचारतो. ‘टिळा कुठे आहे? मला तो लावायचाय…’ अशा आशयाची त्याची प्रतिक्रिया ऐकायला मिळते.

यानंतर त्याला कुंकू देण्यात येतं आणि शाहरुख स्वतःच्या कपाळावर भक्तिभावाने टिळा लावतो. त्याचा हा साधा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आणि आता सोशल मीडियावर पुन्हा चर्चेत आला आहे. या कृतीमुळे चाहत्यांकडून शाहरुखचं कौतुक होत आहे. यंदा लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेल्या शाहरुखने निळ्या रंगाचा पारंपरिक कुर्ता परिधान केला होता. गौरी खान आणि सुहाना खानदेखील पारंपरिक पोशाखात दिसल्या. शाहरुख आणि त्याच्या कुटुंबीयांनी बाप्पाची आरती केली. त्याने जास्वंदाचं फूल आणि दुर्वा अर्पण करत बाप्पाच्या चरणी डोकं टेकवलं. या दर्शनादरम्यान त्याच्या कपाळावर बाप्पाच्या चरणांवरील कुंकूही लावण्यात आलं.

पहा व्हिडीओ-

शाहरुखच्या गणेशभक्तीचा हा क्षण पाहून सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. विशेषतः टिळा लावण्याची इच्छा त्याने स्वतः व्यक्त केल्यामुळे त्याचा हा अंदाज चाहत्यांना भावला आहे. शाहरुख खानच्या घरातील गणेशोत्सवाबाबतही तो याआधी चाहत्यांशी बोलला आहे. 15 सप्टेंबर रोजी ‘AskSRK’ सेशनदरम्यान एका चाहत्याने त्याला घरी गणेशोत्सव कसा साजरा केला जातो, असा प्रश्न विचारला होता. त्यावर शाहरुखने सांगितलं होतं की गौरी आरती आणि पूजा करते, त्यानंतर कुटुंबीय आणि मित्र एकत्र येतात आणि साध्या पद्धतीने हा सण साजरा केला जातो.

शाहरुखचा बाप्पाच्या चरणी भक्तिभावाने नतमस्तक होतानाचा आणि स्वतःहून टिळा लावून घेतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. सुपरस्टारची ही साधी आणि मनापासून केलेली कृती चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे.

Follow Us
शेती जळाली, उत्पन्न बंद…आता शाळेची फी तरी कशी भरायची?
Vidarbha Drought : शेती जळाली, उत्पन्न बंद…आता शाळेची फी तरी कशी भरायची?; दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचा सरकारला आर्त सवाल
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे वसंत डावखरे प्रकरणी निर्दोष, वकील म्हणाले...
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे वसंत डावखरे प्रकरणी निर्दोष, वकील काय म्हणाले?
मोठी बातमी! आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवरील आरोपांवर केंद्रीय निवडणूक..
मोठी बातमी! आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवरील आरोपांवर केंद्रीय निवडणूक आयोगाची भूमिका स्पष्ट
दुष्काळग्रस्त भागांच्या पाहणी दौऱ्यासाठी एकनाथ शिंदेंनी डिफेंडर गाडी..
दुष्काळग्रस्त भागांच्या पाहणी दौऱ्यासाठी एकनाथ शिंदेंनी डिफेंडर गाडी नाकारली, थेट...
सावित्रीबाईंनीही हेच...; चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर ठोंबरे भडकल्या
Rupali Chakankar : सावित्रीबाईंनीही हेच सहन केलं होतं; रुपाली चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर रुपाली ठोंबरे भडकल्या, म्हणाल्या कोणी लिपस्टिक लावली म्हणजे ...
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ आला समोर
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे मागणी
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे यांची मोठी मागणी
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाचा...
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाच्या वाढदिवसाचा व्हिडिओ व्हायरल
मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, वडेट्टीवार काय म्हणाले?
Vijay Wadettiwar : मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, अन् विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय, 17 वर्षांपासून....
Vasant Davkhare Case : 17 वर्षांपासून सुरू असलेल्या मानहानी प्रकरणाचा निकाल! उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय....